आपण केलेल्या मॅसेजचा किती वेळात रिप्लाय येतोय, यावरून आजकालची नाती ठरवली जातीये.
प्रीती लांडगे.
सारेच काही ऑनलाइन झाले आहे. तसेच आजकाल काही प्रमाणात नात्याचे ही झाले आहे. एखाद्याची काळजी वाटणे वगळे आणि काळजी घेणे वेगळे असते. ही काळजी कधी पझेसीव च रुप घेते ते कळत नाही. म्हणून मग किती वेळेत मेसेजचा रिपलाय येतो त्यावर नाती ठरत जातात. आजकाल कस सगळ फास्ट हवे आहे. 2 मिनिटात. 2 मि.मै मैगी तस 2 मिनीटात मेसेजला रिपलाय हवा किंवा फोन आणि रिलेशनशिप किंवा लग्न आणि नाही पटल की, घटस्फोट सगळे अगदी दोन मिनिटात होते आहे. आणि हे बघायला पण मिळत आहे.
थोड जरा वेगळ्या नजरेने ही बघू मी कामावर असेल किंवा महत्त्वाचे कामाचे मेसेज असतील तर लगेच रिपलाय देणे किंवा येणे आवश्यक आहे किंवा असते.
परंतु नात्यामध्ये ही असच हव हे काही बरोबर नाही. कोणतही नाते फुलायला वेळ लागतो. आणि त्यावरच या मेसेजच रिपलाय येणे ही अवलंबून असते. आणि खूप चांगले नाते तुमचे असेल तर तुम्हाला मेसेजची गरजही नसते. परंतु आजकालच्या जगात सारेकाही या मेसेज वरून ठरवले जात आहे. आणि नात अस मेसेजच्या रिपलाय वरून नाती ठरवता येत नाहीत.
परंतु आजकाल असे बघायला मिळत आहे. आणि तुम्ही खरच प्रामाणिकपणे रिलेशनशिप मध्ये असाल आणि एकमेकांवर खरे प्रेम करत असाल तर रिपलाय कितीवेळेत आला यावरून तुम्ही नात्याची ओढ नाही ठरवू शकत. तुमच्या मनाचे कनेक्शन जर जबरदस्त असेल तर तुमचे मनच तुम्हाला एकमेकांचे संकेत देईल किंवा सांगेल की आता काहीतरी कामात आपला माणूस आहे. तर त्याला नको वेठीस धरायला अस तुमचे मन सांगते तुम्हाला आणि नक्कीच तुम्ही समजूतदार असाल तर किती वेळाने रिपलाय आला आहे याला म्हत्व देणार नाही तर रिपलाय आला आहे. हे तुमच्यासाठी म्हत्वाचे असते.
परंतु समोरील व्यक्तीने ही आपला पार्टनर समजून घेतो म्हणून दर वेळी अस करणे बरोबर नाही नाहीतर खरच यावरून नाते ठरवेले जाईल. कारण समोरच्याचे तुमच्यावर प्रेम आहे. म्हणूनच तो तुम्हाला मेसेज करत आहे. हे तुम्ही लक्षात ठेवले पाहीजे आणि वेळ मिळताच मेसेजचा रिपलाय दिला पाहिजे. जरी यावरून नाते ठरत जात नाही अस जरी मी म्हटले तरी तुमची ही जबाबदारी आहे. की आपला रिपलाय वेळ मिळाला की पाठवून देणे.
आताच्या या जगात मुले- मुली हे सतत मोबाईल च्या दुनियेत असतात. त्यान स्वतःची स्वतःला देखील गरज असते हे समजत नाही. स्वतःच्या मनात एखाद्या प्रश्न आला तर त्याचे उत्तर आतुन येई पर्यंत यांना वेळ नसतो. मग मेसेज च्या रिपलाय च्या वेळेच काय घेऊन बसायचे. साधी गोष्ट आसे मेंदू तुम्हाला एखादा मेसेज पाठवतो तर तुमची घडणारी कृती ही रिपलाय असते. यर त्याला सुध्दा वेळ लागतो. का रिपलाय नाही म्हणून स्वतःचे स्वतःशी असलेले नाते बाजूला करता का नाही ना काही वेळ घेता किंवा वेळ लागतो तसेच या मेसेज च्या रिपलायचे आहे. जरा थांबा वाट बघा लगेच त्याच्यावरून नाते ठेवायचे की नाही हे ठरवु नका. परंतु हा एखाद्या उगाच तुमच्या सोबत टाईमपास म्हणून हे करत असेल तर नक्की त्या नात्या बदल ठरवा.
एखादा खरच प्रामाणिक आहे त्याच्या कामात व्यर्ग आहे. आणि तुम्हाला आतुन अस वाटत असते की हा खरच माझ्या पार्टनर कामात असेल म्हणून रिपलाय नाही करु शकत तर तिथे समजून घ्या त्याला वेळ द्या आणि जेव्हा बोलाल भेटाल तेव्हा या सगळ्या गोष्टी क्लियर करा. मग तुम्हाला वेळेवर नाती नाही ठरवावी लागणार तर मिळणारा प्रत्येक वेळ हा त्या नात्याला द्याल तुमची सर्व कामे संभाळून. प्रत्येकाला आपल्या कामाची जबाबदारी लक्षात येईल. आणि तो फ्रि झाला की तुम्हाला मेसेज करेलच आणि हा त्याने मेसेज केला म्हणून त्याने लगेच रिपलाय आला पाहिजे असा आग्रह धरू नये दोघांनी एकमेकांचा आदर करावा आणि राखावा.
पुढे जाऊन खरच तुमचे नाते दृढ असेल खरे असेल तर या मेसेज आणि रिपलायची तुम्हाला गरजच भासणार नाही. तुमचे एकमेकांचे मनच तुमच्यासाठी मेसेज आणि रिपलाय ठरतील आणि मग कशाला कितीवेळाने रिपलाय आला यावर नाते ठरवावे लागेल. नाही कारण तुम्ही एकमेकांचे प्रामाणिकपणे नाते निभावत आहात हे तुमचे मनच तुम्हाला सागेल कारण सगळ्यात आधी तुमचे नाते तुमच्या मनाशी असते आणि तुमच्यात आधी मेसेज रिपलायची देवाणघेवाण सुरू अहते मग तुमच नात्यात येते. आणि अशा नात्यात अडकूच नका जे तुमच्या रिपलायवर अवलंबून आहे.
आहो बाळ जन्माला यायचे असेल तर नऊ महिने वाट बघावी लागते. येथे ही तेच आहे नव नात जन्माला येत आहे तर त्याला वेळ लागणारच येथे 2 मिनिटात सगळे हवे अस म्हणून कसे चालेल. तर प्रत्येक नात्याला वेळ द्या. आणि रिलेशनशिप मध्ये असाल तर थोडा जास्त वेळ द्या बघा अंदाज घ्या आणि खरच समोरचा मुद्दाम तुम्हाला त्रास देण्यासाठी अस करत असेल, फसवत आहे अस तुम्हाला आतुन वाटत असेल तर मग थांबा नका त्या नात्यात अडकून राहू. परंतु या सगळ्याचा विचार करा तुम्हाला आतुन काय रिपलाय येतो आहे त्याचा अंदाज घ्या आणि पाऊल उचला किंवा ठरवा तुमच्या नात्या बद्दल.
आणि हो नाते कोणतेही असले ना किंवा कोणी फोन केला तर समोरून उचला नाही, रिपलाय दिला नाही तर थांबा ना वाट बघा तोही कामात असेल गाडीवर असेल काही करत याचा विचार करा तो त्याचे काही काम ऑनलाईन करत असेल तर तो नाही रिपलाय देऊ शकणार आणि आता खूप सगळी कामे ऑनलाइन आहेत तर तुम्हाला थोडा धिर धरावा लागेल. संयम हवाच, विश्वास हवाच हाच स्वभाव तुमचे नाते घट्ट करेल.
आणि तुम्हाला ऐवढेच काम आहे का रिपलाय आला की नाही बघायचे हे एक व्यसन झाले आहे ते वेळीच सोडा प्रत्येक गोष्ट प्रमाणात हवी, समोतल हवा तर कोणतेही कम निट होते आणि नातेसंबंध ही निट रहातात किंवा विकसित होतात. या सगळ्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता त्यापेक्षा तो वेळ सार्थकी लावा या नात्या समजूतदार पणा कसे वाढेल एकमेकांना कसे समजून घेता येईल. याचा विचार करा अभ्यास करा म्हणजे मग रिपलाय च्या वेळेची गरज भासणार नाही. आणि एक लक्षात ठेवा माझे नाते, माझे नातेवाईक हे सारे क्षणाचे आहे नातेवाईक नाही तर नाते – वाईट म्हणजे कशात ही तुम्ही गुतंता तर ते थोडे तरी बाधते. मग ते रिपलायचे नाते असो वा माणसाचे आधी स्वतःचे नाते स्वतःशी घट्ट ठेवा मग बाकी नाते आपोआप घट्ट होतील. आणि तरी ही नाही झाले तर समजूतीने बाजूला व्हा, शांतपणे त्या नात्याला विराम द्या.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप छान लेख आहे अगदी वास्तव परिस्थिती मांडली आहे .आपण एखादया गोष्टीवर खुप लवकर प्रतीक्रिया देत असतो., ती प्रतीक्रिया जर विचार करून दिली तर नाती तुटली जाणार नाहीत.
खुपचं छान आहे आजची परिस्थीती आहे तशी जशी हित सांगितले आहे. छान आहे लेख
छान लेख आहे अगदी खरं आहे आणि वस्तुस्थिती ची जाणीव करून देणारा लेख आहे
It helps how to develop best relationship……
खुप छान वाटला लेख अतिशय सुंदर त्यातुन बोध नक्कीच घ्यावा असं वाटतं
खरच खुपच छान