Skip to content

बायकोचा कंटाळा का येतो ? याची महत्वाची ६ कारणे वाचूया.

बायकोचा कंटाळा का येतो ? याची महत्वाची ६ कारणे वाचूया.


टीम आपलं मानसशास्त्र


असे म्हणतात की स्त्री शिवाय घराला घरपण येत नाही. अर्थात स्त्री घरासाठी भरपूर कष्ट ही घेत असते. तिच्यामुळे शिस्त ही लागते. स्वच्छ्ता , टापटीप , स्वैपाक , घरातल्यांची काळजी आणि येणारी जाणारी आप्तेष्ट , शेजारी यांची ही काळजी , नाते संबंध टिकवून ठेवत असते.

तरी ही बरेचदा पुरुषांना बायकोचा कंटाळा का येतो ? याची महत्वाची ६ कारणे वाचूया.

१. बायकोची शिस्त :- कधी त्याविरुद्ध कायम आराम करणाऱ्या स्त्रिया

नोकरी करून घर सांभाळणारी बायको असो अथवा केवळ home maker असो. बायको ही स्वतः सोबत सगळ्यांना शिस्त लावत असते.
जसे अगदी सकाळी उठण्या पासून तीचे जणू घड्याळ काट्यावर काटे ठेवून असते. त्यात बरेचदा पुरुष सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा करतात. आपल्या भारता सारख्या देशात तसे पुरुष फारसे घरकाम करत नाहीत. आजकाल अर्थात विभक्त कुटुंब पद्धती , दोघे नोकरी करणारे , मुलांना सांभाळणारे त्यामुळे केवळ ऑफिस सोडून बऱ्याच जबाबदाऱ्या पुरुष ही उचलतात. पण जिथे अजून ही पुरुषांनी काही करायचे नाही . अशा ठिकाणी त्यांना फारसे काही काम नसते.

बायकांना मात्र भरपूर काम असते. सकाळीं उठल्यापासून अंथरुन व्यवस्थित घडी करण्यापासून , मग यात पुरुषांना ही सवय लावली जाते. कधी कंटाळा केला तर त्यावर परत बायकोची बोलणी खावी लागतात.

बायकांना मुळात टापटीप , स्वच्छता यांची आवड असल्याने वस्तू जाग्यावर नीट नेटक्या ठेवणे , कपडे जागच्या जागी घड्या करून त्याही कशा ही घड्या चालत नाहीत. अशा अनेक गोष्टी ची सततची शिस्त पुरुषांना आवडत नाही. कधी सुट्टीच्या दिवशी आरामात उठावे. लोळत पडावे. अशी त्यांची इच्छा बायको ची अती शिस्त आणि वेळच्यावेळी कामे होणे याची सवय. कारण त्यांना दिवसभरात अनेक कामे असतात. त्याचा कंटाळा येतो पुरुषांना ..आणि त्यामुळे बायकोचा ही कंटाळा येवू शकतो.

तर याउलट काहीच न करणाऱ्या स्त्रिया ही असतात. सवय नसते. करण्याचा कंटाळा , रोज उठून त्याच गोष्टी करण्याची आवड नसणे. स्वैपाक आवड नसणे . लाडावून ठेवलेली .. बाकीच्यांनी करावे हिने आयते खावे अशी वृत्ती असते. मग सगळ्या सुख सोयी पाहिजेत. वॉशिंग मशीन असेल तरी कपडे कोण वाळत टाकणार. बाई नाही तर इतर कोणी करावे अशा cool वृत्तीच्या ही बायका असतात. सतत बाईच्या हातचा स्वैपाक , पार्सल , बायकोचा आराम ..तिला जमत नाही होत नाही या कारणानं ही नवरा बायकोला कंटाळतो.

काही बायका फ्रीडम देणाऱ्या ही असतात. तशी बायको जास्त करून आवडते पुरुषांना आणि तिचा कंटाळा ही येत नाही.

२. मुलांचा अभ्यास आणि वळण :

बरेचदा मुलांच्या अभ्यासावरुन बायको सतत कटकट करत असते.मुलांच्या मागे असतेच. कधी गोड बोलून , कधी चिडून , रागावून , मुलांचा अभ्यास वेळेत होण्याकरिता , अभ्यास करण्याकरिता , पाढे असतील , किंवा देवाचे स्तोत्र पठण असेल , युनिफॉर्म नीट ठेवणे असेल , किंवा पुस्तके नीट वापरणे आणि नीट ठेवणे . खेळायला जाताना बजावून सांगत असते एवढ्याच वेळात ये. त्यामागे कारण हे असते की ती जसे अनेक गोष्ट ठराविक वेळेत करत असते तीच सवय मुलांना लागावी. सगळा वेळ खेळण्यात गेला असे नको व्हायला. कोणता वेळ कोणत्या गोष्टी करिता योग्य वापरावा याकरिता सतत बायको मुलांच्या मागे लागत असते.

पुरुष सतत हेच सांगत असतात. करेल ग थोड्या वेळाने, खेळू देत मुलांना सारखे मागे लागू नकोस. पण बायको तशी ढील देत नाही मुलांना कारण तिला मुलांना घडवायचे असते. त्याकरिता शिस्त , वळण लावत असते. पण पुरुष हाच विचार करतो की घरी आले की सततची कटकट असते ही बायकोची मुलांच्या मागे हात धरून लागली असते. बरेच वेळा मुलांच्या मुळे पुरुषांना ही ऐकून घ्यावे लागते. त्यामुळं ही बायकांचा कंटाळा येतो.

३. बायको बरेचवेळा पुरुषांचा मूड समजून घेण्यास कमी पडते. : –

बायकांचे काम हे दिसत असते. पुरुषांचे ऑफिस मधले काम बऱ्यापैकी मेंदूचे , बुद्धी चे असते. पुरुष ऑफिस मध्ये काम करून मानसिक स्ट्रेस घेवून खरेच दमतात. अशावेळी घरी आल्यावर , रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी त्यांना खरेच रिलॅक्स व्हायचे असते. बरेचदा बायको ने शेजारी बसावे थोड्या मोकळेपणाने बोलावे. आपले ऐकून घ्यावे. कधी वेगळे काही वातावरण असावे.

विनोद ,जोक्स , मित्र मैत्रिणी घरी यावेत किंवा आपण त्यांच्या सोबत जावे . फ्रेश मुड , रिलॅक्स व्हावे , नवीन जुन्या विषयावर चर्चा ज्यातून उत्साही होतील . पण घराबाहेर , मित्र मैत्रिणी यांच्यात जास्त वेळ असतात. तेच प्रिय, त्यांच्यात नक्कीच काही तरी असेल म्हणून असा संशय ही बायको घेत असते.

तर कधी मानसिक त्रास कमी करण्याकरिता शारीरिक संबंध हे रिलॅक्स होण्याचे , उत्साही होण्याचे मार्ग म्हणता येतील किंवा बदल म्हणता येतील . त्यात कधी रोमान्स आणि शारीरिक संबंध . बायको आपल्या सतत जवळ असावी असे वाटत असते. पण बायको तिच्या कामाच्या नादात बरेचवेळा हे नवऱ्याचे मूड लक्षात च घेत नाही. बरेचवेळा तिच्या लक्षात येत नाहीत किंवा मग ती सारखे सारखे या गोष्टी करिता तयार ही नसते. तिची तशी मानसिकता नसते. घरातल्या जबाबदाऱ्या , मुले , वडीलधारी मंडळी यांचे ही विचार असतात.

काही वेळेस आपणहून बायको या गोष्टी करिता मूड निर्मिती करिता प्रयत्न करते.पण प्रत्येक वेळी नवऱ्याची ती अपेक्षा तिला सांभाळणे जमत नाही. आणि भारतीय स्त्री ही मर्यादाशील असल्याने तिला जरी इच्छा असेल तरी ती लाज , कोणी काय म्हणेल यामुळे तेवढे मोकळेपणाने वागत नाही. याचमुळे बायको आपला मुड ही सांभाळू शकत नाही म्हणून पुरुष बायकोच्या त्याच त्याच वागण्याला ही कंटाळतात.

४.पुरुषांना कायम नावीन्य पाहिजे असते.

पुरुषांना बायको ने सतत फ्रेश , छान आवरले असलेले , कपडे ही एकदम आकर्षक घालावे हे वाटत असते. याशिवाय शारीरिक संबंधांमध्ये ही काही नावीन्य बायको कडून अपेक्षित असते. परंतु बरेचवेळा बायको घरात बिझी असतें . नोकरी करून दमून आली असेल तर कंटाळा करते. आवरण्याचे कष्ट घेत नाहीत. दिवसभर घातलेले तेच कपडे किंवा सुटसुटीत गाउन वर असते. पण तोच स्वैपाक करताना आणि तोच बेडरूम मधल्या रोमँटिक वातावरणा मध्ये ही हे बघून पुरुषांना ते आवडत नाही. शिवाय शारीरिक संबंध यात ही एक कर्तव्य म्हणून करायचे त्यात नावीन्य काहीच नसेल तर पुरुष बायकोला कंटाळतात.

अगदी पुरुष थोडे वातावरण निर्मिती करण्याकरिता गजरा , कधी परफ्यूम अपेक्षित असतात. तर काही वेळेस ते बायकोला थोडे उत्तेजीत करण्याकरिता तसे व्हिडिओज बघायला सोबत बोलावतात तेव्हा बायको ना इच्छेने हे सगळे करते किंवा टाळते. किंवा त्यातून काही चांगले घेणे ही टाळते. पुरुषाला बायको मध्ये काही नावीन्य न दिसल्याने ही बायकोचा कंटाळा येतो.

५. सतत बायकोच्या मनाप्रमाणे , मुड प्रमाणे करणे :

सतत बायको जसे म्हणेल तसेच वागायचे , तिचा मूड जसा असेल तसे इतरांनी वागायचे. बरेचवेळा असे होते की काही मासिक त्रास ही असतात तेव्हा तिला त्रास होत असेल तर इतरांनी सतत तिला सहानुभूती दिली पाहिजे.

ती म्हणेल तसेच नवऱ्याने वागले पाहिजे. तरी नवरा बायकोला विश्रांती मिळावी , थोडा बदल मिळावा म्हणून कधी पिकनिक ला घेवून जात असतो . तर कधी सिनेमा , कधी तिला स्वैपाक आणि इतर कामातून सुट्टी म्हणून बाहेर जेवायला घेवून जात असतो.
तरी तिला समाधान , शांतता नसते. जे मिळाले , दिले , केले त्याचे समाधान नसते.

कधी ती इतरांच्या बरोबर तुलना करत असते. हे नाहीत नाही म्हणून , तर कधी जे मिळते त्याची कदर नसते. सतत तिच्या मुड प्रमाणे सगळ्यांनी वागले पाहिजे नाही तर चिडचिड , भांडणे होत राहते. कधी कोणत्या गोष्टीने बायकोचा चांगला मुड खराब होतो हे नवऱ्यानं सांगता येणे अवघडच आहे. थोडे जरी मनाविरुद्ध झाले तरी मुड जातो. पण याचे कारण घडाघडा मोकेळे पणाने न बोलणे . हे मुख्य कारण. कधी नवरा समजून घेत नाही , कधी वेळ देत नाही हे कारण तर कधी मोठ्या अपेक्षा वस्तू , साड्या , दागिने न घेणे हे असते.
पण सतत असे अचांनक मुड जाणारी बायको असेल तर नवरा कंटाळतो बायकोला हे नक्की.

६. आपलेच खरे हे मत. प्रत्येक वेळेस पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न ? काही खास तारखा न विसरणे.

प्रत्येक बायको आपलेच खरे असे मत असणारी. मग सासू सासरे घरी असतील ते खूप चांगले असतील तरी मनात कोणीतरी सांगितलेले की त्यांच्याबद्दल एक अंतर ठेवले जाते. खरे तर सासू साऱ्यांना ही आई वडिलांच्या सारखा जीव लावला तर पाहिजे असतोच की. पण सून म्हणून ती आई वडिलांच्या जागी त्यांना accept करत नाही. आपलेच खरे . मग स्वतः चूक असेल तरी माझे बरोबरच तुम्ही चुकीचे असे च वागणारी.

बायकोच्या आवडी निवडी जपायच्या ,, प्रत्येक तारखा लक्षात ठेवायच्या. बायकोला हे आवडते ते करायचं. ते नावडत मग ते करायचे नाही. अगदी मग स्वैपाक असेल तरी बायको तिला आवडेल तेच करणार. एखादी गोष्ट नवऱ्याला खूप आवडत असेल आणि तिला इतरांना आवडत नसेल तर ती त्या गोष्टी करणार च नाही. पदार्थ असेल किंवा इतर काही.

नवऱ्याने त्याच्या प्रचंड कामाच्या व्यापातून वाढदिवस , anniversary , काही खास दिवस विसरता कामा नयेत. मग त्यातून शुभेच्छा आणि भेट वस्तू ही त्याच दिवशी ..नंतर दिले तर नाही चालणार. त्यावरून वातावरण दूषित होणार.

एकमेकांचे विचार करण्यापेक्षा , सोई सवडीने तो दिवस सुट्टी दिवशी साजरा केला तर नाही चालणार. तो दिवस म्हणजे तोच. याव्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचे कायम एकमेकांच्या जवळ येताना , वातावरण निर्मिती , मुड creation , शारीरिक जवळीक ही पुरुषांनीच पुढाकार घेवून करायची ही अपेक्षा बायको ची. मान्य आहे स्त्री मर्यादा. पण नवरा बायको मन शरीर यांनी एकरूप झाल्यावर ही त्याने पुढाकार घ्यावा ही का अपेक्षा ? त्याने काही केले नाही तरी आवड नाही .माझ्या करिता वेळच देत नाही असेही . आणि जास्त जवळीक केली सतत तरी दुसरे काही सुचत नाही असा शिक्का नवऱ्यावर.

अशा वेळी नवऱ्याला समजतच नाही की बायकोसोबत नक्की कसे वागायचे , काय करायचे नक्की की ती कायम सकारात्मक राहील , उत्साही राहील , सगळ्या गोष्टीत साथ देईल.

या शिवाय आर्थिक तजवीज , भविष्यकालीन तरतुद , बचत , mediclaim , दैनंदिन खर्च , गृहकर्ज , हप्ते याची तजवीज ही त्याने करायची .यात आजकाल काही स्त्रिया स्वतः कमावत्या आहेत. तरी बहुतेक सर्व ठिकाणी या जबाबदाऱ्या पुरुषाने उचलायच्या . अगदी बायको ला कुठे जायचे तर ड्रायव्हर म्हणून ही आपणच . आणि मदतनीस म्हणून ही आपणच तत्पर राहायचे.

काही वेळेस पुरुष हुशार असून , शिक्षण असून ही नोकरी नसते , आर्थिकदृष्टया कमकुवत असतो. तरी सगळ्या जबाबदाऱ्या त्यानं च पार पाडायच्या या अपेक्षा बायको कडून असतात. त्यातून वाद , भांडणे होतात. अशा वेळेस बायकोच्या त्याच वागण्याचा कंटाळा येतो नवऱ्याला.

बायकोला कोणत्या बौध्दीक गोष्टी , नवीन स्किल develop करायला सांगितली किंवा रोजच्या स्वैपाक करण्यात काही बदल , सूचना दिल्या तरी तिला ते जमत नाही. खपत नाही. तिचा इगो दुखावला असे होते. नवीन शिकणे दूर पण नवऱ्याची सांगण्याची तळमळ ही लक्षात घेतली जात नाही. त्याची कामे त्यानेच करावीत वर हा attitude. यातून बरेचवेळा पुरुष बायकोच्या अशा स्वभावाला कंटाळतो.

खरे तर पुरुष बायकोला का कंटाळतो ..हा प्रत्येक व्यक्ती ला येणारा वेगळा अनुभव आहे. प्रत्येक नवऱ्याच्या बाबतीत त्याच्या बायकोचा अनुभव वेगळा.

पण नवरा आणि बायको यांच्यात कंटाळा येण्याची कारणे म्हणजे सततचा तोचतोचपणा , समजून न घेणे , अती शिस्त, आपले च खरे , एकमेकांच्या आवडी निवडी , गरजा लक्षात न घेणे , काही वेळेस संशय घेणे , वेळच देत नाही. आता मुले आल्यावर माझी गरज संपली असे ही सतत बोलणारी बायको असते.

रख रख करणारी बायको कोणाला आवडत नसते. पुरुष जे जसे वागतील तसे शांतपणे accept करणारी बायको असेल तर पुरुष खुश.
पण सर्व बाजूने विचार करणारी , शिस्त प्रिय , मर्यादा ठेवणारी काही चांगले गुण असतील तरी काही दोष असतात. स्पष्ट बोलणारी , काही वेळेस तिच्या ही मर्यादा संपतात. Office , घर , काम , स्ट्रेस , जाण्या येण्याची सोय. त्यात जाणार वेळ , energy, मुले , घर यात अनेकवेळा तिला तिच्याकडे बघण्यास वेळ मिळत नाही.

पण बरेचवेळा समजून घेणारा नवरा असतो. तर कायमच काही ना काही चालू असते. कधी दीर्घकालीन आजारपणे , मायग्रेन सारखी दुखणी ,कॅल्शियम,. हिमोग्लोबीन कमी असणे त्यातून बायकांच्या तब्येतीची तक्रार , बायकोची तीच तीच रड म्हणून पुरुष कंटाळतात.

नवरा आणि बायको यांच्या एकमेकांकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्याचा स्वीकार करणे जमत नाही हे सगळ्यात मोठे कारण आहे की एकमेकांचा कंटाळा किंवा एकमेकांपासून दूर राहण्याचे.

आपले म्हणले की आपले ही समर्पण भावना नसते. मग काही गुण आणि दोष हे प्रत्येक व्यक्ती मध्ये असणार हा विचार नसतो. सर्वगुण संपन्न व्यक्ती कोणी नसते. आणि आपल्या सारखेच व्यक्तिमत्त्व , विचारसरणी , आवडी निवडी बायकोच्या असणार असे नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून एकमेकांना सांभाळून , समजून घेवून वागणे महत्वाचे असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “बायकोचा कंटाळा का येतो ? याची महत्वाची ६ कारणे वाचूया.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!