शरीसंबंध ठेवण्या संबंधीची अपेक्षा अपूर्ण राहिल्यास आपल्या मानसिकतेत कोणते मोठे बदल होतात?
टीम आपलं मानसशास्त्र
शरीर संबंध ठेवणे हे भारता सारख्या देशात दोनाचे चार झाल्यावर म्हणजेच विधिवत लग्न झाल्यावर आपण जसे म्हणतो ना की गाडी चालवण्याचा परवाना , licence मिळाले तसे.
अर्थात आता बऱ्याच गोष्टी बदलत आहेत त्यामुळे लग्नापूर्वी , शाळा , कॉलेज ,ऑफिस येथे ही आकर्षणातून बरेचवेळा शरीरसंबंध ठेवले ही जातात.आपण साधारणपणे सर्वांच्या बाबत आज हा विचार करूयात की, पण प्रत्येकाच्या शरीसंबंध ठेवण्या संबंधीची अपेक्षा अपूर्ण राहिल्यास आपल्या मानसिकतेत कोणते मोठे बदल होतात?
१. निराशा : बरेचदा शरीर संबंध ठेवण्या संबंधीची वरिष्ठ , मित्र मैत्रिणी किंवा भाऊ , बहीण , जवळची नातलग व्यक्ती यांनी काही माहिती सांगितली असते.तर कधी मित्र मैत्रिणी यांच्या सोबत उपलब्ध असलेली पुस्तके , व्हिडीओ या माध्यमातून माहिती मिळते.
आणि जे ऐकले , बघितले तसेच काही असावे असे आपले स्वप्न असते. इच्छा असतें . पण प्रत्यक्षात मात्र शरीर संबंध ठेवताना काही तरी वेगळेच घडते. आपल्या अपेक्षेनुसार काही घडत नाही.
काही वेळेस दोघांच्या मध्ये मन आणि शरीर ही तेवढे जवळ आले नसते त्यामुळे एकदम च शारीरिक संबंध चांगल्या प्रकारे निर्माण होत नाहीत. काही तरी अपूर्ण आहे, कमतरता आहे किंवा अजून काही तरी पाहिजे असे वाटत असतें. यातून निराशा येते.
तर बरेचदा पहिला अनुभव असा आला म्हणजे पुढेही असेच होणार , घडणार असे गृहीत धरले जाते. आणि निराशा येते. औदासीन्य येते नात्यात. संबंधात. आणि पुढच्या वेळी अंतर निर्माण होते.
२. दुरावा : जर शरीसंबंध ठेवण्या संबंधीची अपेक्षा अपूर्ण राहिल्यास आपल्या मानसिकतेत बदल होतोच निराशा , औदासीन्य येतेच..पण अंतर निर्माण होते आणि त्यातून दुरावा ही येतो.आधीचे अनुभव बघता नकोच ती जवळीक म्हणून दुरावा निर्माण होतो.
३. चिडचिड , अस्वस्थता :शरीसंबंध ठेवण्या संबंधीची अपेक्षा अपूर्ण राहिल्यास मनातून काही तरी राहिले आहे ही जाणीव होवून , म्हणून सततची चिडचिड , उगीच राग राग होतो, शरीर आणि मन दोन्ही ही अस्वस्थ होते.
४. एकलकोंडी : बरेचदा शरीसंबंध ठेवण्या संबंधीची अपेक्षा अपूर्ण राहिल्यास स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कोणी ही किंवा दोघेही स्वभावाने एकलकोंडी होत जातात . कोणाच्या मध्ये मिसळत नाहीत. जोडीदार ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाहीत.
५. कामात एकाग्रता होत नाही: लक्ष सतत ते अपूर्ण राहिलेल्या संबंधाबाबत विचार करण्यात असते . असे का होते. किंवा अजून पूर्णत्व येण्याकरीता काय केले पाहिजे हे विचार मनात सतत येत असतात. लक्ष विचलित होत असते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा घरी सुधा मनाची एकाग्रता होत नाही. आणि यातून तुमच्या कामावर ही परिणाम होतो.
६. जोडीदारांना टाळण्याची इच्छा , सवय लागते : शरीसंबंध ठेवण्या संबंधीची अपेक्षा अपूर्ण राहिल्यास एकमेकांविषयी थोडी नकारात्मकता निर्माण होते. आणि असे अर्धवट , अपूर्ण संबंध ठेवण्यापेक्षा ते एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करतात. मग बोलणे तुटक असते . जवळ येण्यापासून ही मनातून तयारी नसते. पण काही वेळेस नकार देवू शकत नाही केवळ म्हणून इच्छे विरूद्ध जवळीक साधली जाते.
पण शक्यतो मग काही तरी कामात गुंतवून ठेवणे , नाही तर जवळ जायचे नाही. अगदी जोडीदाराला गाढ झोप लागल्यावर मग झोपायला जायचे . किंवा लगेच गाढ झोप लागली असे सोंग घ्यायचे. जेणेकरून जेवढे टाळता येईल तेवढे टाळायचे ही मानसिकता निर्माण होते.
७. दुसरे पर्याय शोधणे , मार्ग शोधणे. शरीसंबंध ठेवण्या संबंधीची अपेक्षा अपूर्ण राहिल्यास पर्यायी मार्ग शोधणे अगदी पुरुष, स्त्री मग हस्तमैथुन असेल किंवा बाहेर सुख शोधण्याचे पर्याय ही .कारण पूर्णत्व पाहिजे असते.
८.. जोडीदाराला आपण जबरदस्ती करत आहोत अशी ही मानसिकता निर्माण होते. जसे शरीसंबंध ठेवण्या संबंधीची अपेक्षा अपूर्ण राहिल्यास ज्या कोणाची इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा दोघांची ही अपूर्ण असेल तर मनातून उत्साह ही नसतो आणि शरीर ही तसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जो जोडीदार जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो त्याला जर थंड प्रतिसाद मिळाला तर आपसूकच आपण जबरदस्ती करत आहोत अशी मानसिकता निर्माण होते.
९. व्यसनाकडे कल : शारीरिक संबंध अपूर्ण असतील तर त्यातून relief मिळण्याकरिता बरेचदा व्यक्ती व्यसनाकडे वळण्याचा विचार करतात. दारू असेल , सिगारेट , बाहेर ख्याल. असे कोणत्या तरी व्यसनाकडे वळण्याचा विचार मनात येतो आणि बरेचदा कृती ही घडते.
१०. आत्महत्या : शरीर संबंध व्यवस्थित नसतील , घरातून पाठिंबा नसेल , घटस्फोट घेवू शकत नसेल , तर या अर्धवट , अपूर्ण आयुष्यात, संबंधात जगण्यापेक्षा आत्महत्या करून सगळ्यातून मुक्त होण्याचे विचार ही केले जातात. आणि बरेचदा करतात ही..
शरीरसंबंध पूर्णत्व येण्यासाठी , आनंद , परमोच्च सुख मिळण्यासाठी यात केवळ शरीराची जवळीक नसते. तर शरीर आणि मन ही तेवढेच एकरूप असेल तर समाधान आणि सुख ही मिळते. आणि एकमेकांच्या मध्ये चांगले संबंध ही प्रस्थापित होतात.
जेव्हा सुख ,समाधान , शारीरिक संबंध आणि मानसिक संबंध यात शांतता असेल तेव्हा एकमेकांचा विचार, काळजी घेतली जाते. तेव्हा एकमेकांच्या गरजा काय हे पण समजून घेतले जाते. एकमेकांच्या आवडी निवडी ही समजून त्याप्रमाणे वागले जाते.
आणि याउलट जर शारीरिक संबंधांमध्ये अपूर्णता असेल तर मानसिक सबांधांमध्ये ही अपूर्णता येते. सततची भांडणे , राग , चिडचिड , नात्यात तणाव निर्माण होतो. एकमेकांच्या बद्दल विचार ही केला जात नाही. एकमेकांची केअर तर मग दूरची गोष्ट. दैनंदिन जीवन ही सुखी समाधानी राहत नाही.
बरेचदा मग घराबाहेर राहण्याची मनोवृत्ती निर्माण होते. मित्र , मैत्रिणी , पार्टी यात नाही तर मग ऑफिस मध्येच कामात गुंतवून ठेवले जाते.
शेवटी शरीर आणि मन हे दोन्ही ही एकरूप असतील तर शारीरिक आणि भावनिक , मानसिक संबंध ही चांगले निर्माण होतात. त्यात अतूट बंध निर्माण होतो. नसेल तर मात्र अपूर्ण आहोत असे वाटत राहते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

वास्तव ,समोर ठेऊन छान चर्चा केली आहे.सुंदर
खुप खुप छान
खुप छान माहिती..
Very nice