आपला सहवास समोरच्या व्यक्तीला कैद वाटू लागला की त्या व्यक्तीला मुक्त करणे दोघांच्याही हिताचं!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
माणूस नेहमी कोणाच्या ना कोणाच्या सहवासात असतोच आणि जस जस वय वाढेल तस अधिकच आपल्याला कोणाच्या तरी सहवासाची गरज भासू लागते. मग ती आपली चांगली मैत्रीण असेल, मित्र असेल कोणीही, पुढे जाऊन होणारा जोडीदार असेल. आपल्यासोबत कोणीतरी असाव ज्याच्याकडे आपण आपली सुख दुःख हलकी करू शकतो, ज्याच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो, प्रसंगी भांडू ही शकतो, अशी एकतरी व्यक्ती आपल्या जीवनात असते.
पण जरी ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली आपलं नातं कितीही घट्ट असेल तरी आपण दोन वेगळी माणसं असतो. आपला स्वभाव, आवडी निवडी, विचार पद्धती सर्व वेगळं असतं. बरेचदा आपण एखाद्या माणसाशी जोडले जातो याच कारण आपलं कुठेतरी एकमत होत असत बऱ्याच गोष्टी जुळत असतात. पण, पण फक्त त्या काही प्रमाणात. पूर्णपणे नाही.
त्यामुळे असे प्रसंग येतात जिथे मतभेद होतात, वाद निर्माण होतात. कारण दोघांचं व्यक्तिमत्व वेगळं असत. त्यांची म्हणून एक वेगळी identity असते आणि माणूस आपल्या कितीही जवळचे असलं तरी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिला तिची जागा देणं, स्पेस देणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं असत.
नेमके हेच होताना दिसत नाही. अनेक कॉलेजवयीन जोडपी जी एकत्र असतात, ज्यांच्यात प्रेमाचं नातं असत, त्यांच्यामध्ये प्रेमासोबत अजून एक गोष्ट येते ती म्हणजे हक्क गाजवण.
जेव्हा आपण एखाद्याच्या निकटच्या सहवासात असतो, जेव्हा आपण त्या व्यक्तीला आपलं मनात असतो तेव्हाच आपण त्या माणसाला काही सांगतो, ऐकावं अशी अपेक्षा करतो, मन मोकळं करायला सांगतो आपण मन मोकळं करतो. कारण यात आपलं प्रेम, काळजी असते. त्यामुळे अस वाटण स्वाभाविक आहे. पण जर याचा अतिरेक झाला तर या गोष्टी नुकसान करतात.
मग ते प्रेम राहत नाही, ती काळजी राहत नाही तर याच रूपांतर दुसऱ्याच गोष्टीमध्ये होत. जेव्हा आपण अतिप्रमाणात त्या माणसावर हक्क गाजवतो, प्रत्येक गोष्ट सांगावी, ऐकावी असा अट्टाहास धरतो तेव्हा त्या व्यक्तीला कैदी झाल्यासारखं वाटत. मुलामुलींच्या मध्ये तसच नवरा बायको मध्ये हे पाहायला मिळत. दिवसभर कोणा कोणाला भेटली, कोणाशी बोललास इथपासून मला न सांगता कशी काय गेली यावरून बोलणं होत.
आपण स्वतःहून आपल्या माणसाला हे सर्व सांगणं वेगळं आणि आपल्याकडून हिशोब मागितल्यासारखं विचारण वेगळं असत. अश्यावेळी समोरची व्यक्ती नात्यात खुश राहत नाही. कोणत्या तरी दबावाखाली असल्यासारखी वागते आणि यातून नात्यावर परिणाम होतो. ती एकटीच नाही तर दोघांनीही त्याचे परिणाम भोगावे लागतात.
जरी माणसांचे विचार, स्वभाव वेगळे असले तरी त्यांना न बदलता स्वीकारण्याचा स्वभाव काही जणांचा असतो. पण काहीजणांना ते जमत नाही. नेमके समोरच्या माणसाला जे जमत नाही, जे करायची त्याची इच्छा नाही तेच करायला सांगितले जाते.
आताच्या काळात लहान वयात मुल, मुली बाहेर पडून नोकरी करतात, यात एकटही राहावं लागतं. त्यामुळे स्वतःहून सगळी कामं करावी लागतात. त्यात जेवणही आल. त्यामुळे बऱ्याच मुलांना हल्ली जेवण करता येत.तरी यात काही अपवाद असतात. म्हणजे काही मुलांना जेवण बनवता येत नाही. घर आवरता येत नाही. मुलींच्या बाबतीत ही अस होत.
अशावेळी त्याचसोबत जे आहेत त्यांनी त्या एका गोष्टीवरून त्यांना बोलणं, तिच गोष्ट जबरदस्तीने करायला लावणं या गोष्टी उलट्या परिणाम करतात. बऱ्याच मुलींकडून अपेक्षा केली जाते की लग्नानंतर तिने फक्त घर सांभाळाव. आता ज्या आधीपासून काम करत असतात, बाहेर वावरलेल्या असतात त्यांना अस सांगणं एकसारखं त्यांच्याकडून हिशोब मागणं, नजर ठेवल्यासारखी करण.
अश्या वागण्यामुळे नवरा जरी असला तरी त्याचा सहवास पण त्रासदायक वाटतो. आपण कुठेतरी अडकून पडल्याची भावना येते. हे मुलांच्या बाबतही होत. काही मुली ओव्हर पोसेसिव असतात. त्यातूनही समस्या निर्माण होतात. त्या व्यक्तीला आहे तस न स्वीकारल्याने, अती हक्क गाजवल्याने या गोष्टी होतात आणि जर आपण एखाद नात निभावत असू तर ते योग्य रीतीने जपता आल पाहिजे.
चुका होतात त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण तरीही अनेक गोष्टी अश्या असतात जिथे दोघांचे मार्ग बदलत असतात. जिथे धड आपली बदलायची तयारी नसते, ना त्या व्यक्तीला आहे तास स्वीकारण्याची तयारी असते अश्या वेळी समोरच्याला आपला सहवास कैद वाटत असेल ज्यातून दोघांनाही त्रास होत असेल तर अश्या नात्यातून बाहेर पडण चांगलं असतं.
याचा अर्थ असा नाही की छोट्या छोट्या गोष्टीवरून नात तोडल पाहिजे. ते टिकविण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण काही ठिकाणी प्रयत्न करूनही जर आपल्या लक्ष्यात येत असेल की हे पुढे जाऊ शकत नाही. जर समोरच्या माणसाला आपला सहवास नको असेल, त्रासदायक वाटत असेल तर त्यातून त्या माणसाला मोकळं होण आणि आपण स्वतःही बाहेर पडलेले फायद्याचं ठरतं. फक्त हा निर्णय मनात कोणताही वैरभाव, राग न ठेवता, परस्पर समज्यांस्याने घेता आला पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

अप्रतिम लेख आहे, copy होत नाही का, खूप प्रेरणादायी लेख आहे हा 👌
छान
एक दम छान अनुभव आहे