Skip to content

अनेक स्त्रियांबद्दल किंवा पुरुषांबद्दल सतत निर्माण होणारं आकर्षण ही समस्या असू शकते का?

अनेक स्त्रियांबद्दल किंवा पुरुषांबद्दल सतत निर्माण होणारं आकर्षण ही समस्या असू शकते का?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आताच्या काळात प्रेमाची नाती अगदी शाळेत असल्यापासून सुरू होतात. अनेक लहान मुल मुली ज्यांना प्रेमाचा नीट अर्थ पण समजेलेला नसतो ती आम्ही रिलेशन मध्ये आहोत म्हणून सांगतात. कारण ते वयच तस असत. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होण्याची ती सुरुवात असते. जी पौगंडावस्थेत सुरू होते. ज्याला किशोर वय देखील म्हटल जात. या वयात आकर्षण वाटणं साहजिक आहे. पण या आकर्षणाला मुल प्रेम वैगरे मानून बसतात तिथे खरी समस्या आहे.

कारण यातील खूप कमी नाती अगदी बोटावर मोजण्याइतकी नाती तशीच राहतात. बाकी नाती लगेच तुटतात. याच कारणच हे आहे की ते फक्त आकर्षण असत. हे झालं मुलांच्या बाबतीत. त्यांचं ते वय असत. तिथे त्यांना तेवढी जाणीव नसते. जी करून देणं गरजेचं असत. त्याच पद्धतीने त्यांना त्याबद्द्ल योग्य ते शिक्षण देणं ही गरजेचं असत.

वयानुसार मुलामध्ये मैच्युरिटी येत जाते. पण काही लोकांमध्ये मात्र हे तसच राहत. अनेक स्त्रियांबद्दल किंवा पुरुषांबद्दल सतत आकर्षित होतात. पण हे आकर्षण निर्माण होणे ही समस्या होऊ शकते.

ही समस्या असण्याची अनेक कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे, यांना प्रेम आणि आकर्षण यामधील फरकच माहीत नसतो. दुसरे या आकर्षणातून जी नाती तयार होतात ती फार काळ टिकत नाहीत. कारण आकर्षण हे बरेचदा वरवरच्या गोष्टींबद्दल असत. समोरची व्यक्ती कशी दिसते, तिचे कपडे, राहणं, पैसा यावरून पण आकर्षण निर्माण होत.

पण खरच ती व्यक्ती कशी आहे. तिचा स्वभाव, तीच मन जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच जात नाही. फक्त आता आवडते म्हणून एकत्र अस ते नात होऊन जात. आपल्या आजूबाजूला पण अशी काही लोक असतात जी भेटू तेव्हा नवीन माणसासोबत दिसून येतात. अश्या लोकांमध्ये मुळातच चंचलता असते. मन स्थिर नसतं. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये one night stand हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. हे सर्व तात्पुरत्या स्वरूपात निर्माण झालेल्या आकर्षणाचेच परिणाम असतात. ज्यातून अनेक समस्या उद्भवू शकतात.

नात टिकत तर नाहीच पण सतत बदलत पण राहत. आणि हे आकर्षण त्यातून मिळणारा सहवास ते तात्पुरतं मनाला चांगलं वाटत. पण यातून निष्पन्न काहीच होत नाही. कारण शेवटी आयुष्य जगायला आपल्याला कोणतरी अशी व्यक्ती हवी असते जी आपल्याला कायम सोबत करेल. आपल्याला समजून घेईल, सुख दुःखात साथ देईल, जी फक्त आपली असेल. हेच नेमके जेव्हा आपण अनेक लोकांबद्दल आकर्षित होतो तेव्हा होत नाही. ते फक्त वरवर राहत. त्यामुळे जरी आता आपण कोणासोबत असलो तरी आपण आयुष्यभर त्याच्या सोबत राहत नाही. आपण एकटेच पडतो.

कारण सोबत राहण्यासाठी त्या व्यक्तीला जे समजून घेणं आहे, ओळखण आहे ते यात नसत. यात फक्त उथळपणा असतो.
म्हणूनच प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजून घेणे त्यानुसार वागणे खूप आवश्यक आहे. जो विश्वास प्रेमात असतो, जे भावबंध, जी माया त्यात असते ते आकर्षणात असत नाही. आपण बरेच कपडे विकत आणतो. ते जोपर्यंत नवीन असतात, छान दिसतात तोपर्यंत आपल्याला आवडतात आणि नंतर जुने झाले की आपण त्यांना फेकून देतो. तरी त्यातला एखादा तरी असा कपडा असतो जो आपण अगदी चिंध्या झाल्या तरी फेकत नाही. आपल्या सोबत ठेवतो. कारण त्याच्याशी आपली काहीतरी आठवण, भावना जोडली गेलेली असते. हाच फरक आहे प्रेम आणि आकर्षण मधला.

म्हणून सतत नवीन स्त्री किंवा पुरुषाकडे आकर्षित न होता प्रेम आणि आकर्षण यातला फरक नीट समजून घ्या. आणि असं नात बनवा जे आयुष्यभर टिकेल आणि साथ देईल. ते खरं नात असेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अनेक स्त्रियांबद्दल किंवा पुरुषांबद्दल सतत निर्माण होणारं आकर्षण ही समस्या असू शकते का?”

  1. छान लेख आहे.
    आपण एक अबोल्या विषयावर हात घातलाय, पण जे समाधान व्हायला पाहिजे ते केलं नाही असं मला वाटतं.
    कारण प्रस्तावना छान लिहिलंय, विषायाची मांडणी देखील छान केली, पण शेवट गुंडाळला.

    पहा आणखीन काही या वर प्रकाश टाकला तर बरे होईल.

हा लेख आपल्याला कसा वाटला ???

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!
%d bloggers like this: