तुटेल की काय वारंवार या भीतीने जोडून राहण्यात काहीही अर्थ नसतो.
हर्षदा पिंपळे
‘विवाह’ जितका जिव्हाळ्याचा विषय तितकाच हल्ली गुंतागुंतीचा होत चाललेला विषय म्हणजे ‘वैवाहिक आयुष्य’…
प्रत्येक जोडप्याला वाटतं की इतर जोडप्यांप्रमाणे आपलही वैवाहिक आयुष्य हे सुखी समाधानी असावं.परंतु आजमितीला परिस्थिती लक्षात घेता कितीतरी जोडपी ही असमाधानी वैवाहिक आयुष्य जगताना दिसतात.परंतु हे वैवाहिक आयुष्य असमाधानी असण्यामागे निश्चितच काही कारणं आहेत.
सुखी-समाधानी वैवाहिक आयुष्य हे केवळ नवरा-बायकोच नाही तर घरातील संपूर्ण कुटूंबावर अवलंबून असते. कारण कळत नकळतपणे घरातील प्रत्येक गोष्टीचा, वातावरणाचा परिणाम हा नवरा-बायकोच्या वैवाहिक आयुष्यावर होत असतो.त्यामुळे संपूर्ण घरातील वातावरण जर निरोगी आणि आनंदी असेल तर निश्चितच कोणत्याही जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यावर त्या वातावरणाचा सकारात्मक परिणाम होतो.
जितकं वातावरण सकारात्मक तितकाच वैवाहिक आयुष्याचा प्रतिसाद हा सकारात्मक स्वरूपाचा असतो.परंतु हाच प्रतिसाद नकारात्मक असेल ,वातावरण हवं तितकं निरोगी नसेल तर त्याचा परिणाम थेट नकारात्मकपणे वैवाहिक आयुष्यावर होतो.यामुळे सुखी-समाधानी असलेली वैवाहिक आयुष्यही कधीकधी उद्ध्वस्त होतात.
आता असमाधानी वैवाहिक आयुष्यामागे जी काही कारणं आहेत थोडा त्यांचा आढावा घेऊयात.यामध्ये साधारणपणे —-
*एकमेकांना पुरेसा वेळ न देणे.
*एकमेकांकडून खूप अपेक्षा करणे.
*आर्थिक परिस्थितीचे अयोग्य नियोजन असणे.
*जबादाऱ्यांमध्ये सामंजस्य नसणे.
*इतरांच्या हस्तक्षेपाचा अतिरेक असणे.
*शारीरिक आणि मानसिक आपुलकीचा अभाव.
*सतत एकमेकांच्या बोलण्यावर टीका करणे.
*मोकळ्या व अर्थपूर्ण सुसंवादाचा अभाव असणे.
*कुटुंबातील नकारात्मक वातावरण.
*सतत एकमेकांविषयी तक्रारी करणे.
*लैंगिक समाधान नाही अशी भावना असणे.
इतकच नव्हे तर कधीकधी काही कमतरता असल्यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊन कित्येक वैवाहिक जोडपी असमाधानी आयुष्य जगताना दिसतात.
आता पहा यांसारखी विविध कारणे वैवाहिक आयुष्य असमाधानी असण्याला कारणीभूत असतात. खरतरं या परिस्थितीला कधी कधी जोडपी स्वतः तर कधी कधी उद्भवणारी परिस्थिती कारणीभूत ठरते.परंतु ईतकं सगळं घडत असताना काही असमाधानी वैवाहिक जोडपी आयुष्य जसं आहे तसं जगत असतात.इतकं सगळं जर वैवाहिक आयुष्यात घडत असेल तर ते नातं तुटण्याची भीती काही प्रमाणात का होईना पण असतेच.ती भीती आपण सहजासहजी नाकारूच शकत नाही. परंतु काही बरीच जोडपी आपलं नातं तुटेल की काय या भीतीमुळे अनेकदा एकमेकांशी जोडून राहतात. आहे तसं असमाधानी आयुष्य जगत राहतात.
पण असं एखाद्या भीतीमध्ये गुंतून राहून आयुष्य जगणं कितपत योग्य आहे….? अशा नात्याला काही अर्थ आहे…?? तर साहजिकच असे प्रश्न आपल्याला पडू शकतात. तर आपण पाहिलं की अनेकदा या असमाधानी वैवाहिक आयुष्याला भोवतालची परिस्थिती जबाबदार असते.आणि याच परिस्थितीमुळे नातं तुटेल ही भीती मनात घर करून राहते.आणि हीच भीती मनात धरून ही जोडपी एकमेकांशी जोडून रहायचा प्रयत्न करतात.
सांगायचा उद्देश इतकाच की एखाद्या भीतीमध्ये गुंतणं शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्यासाठी अजिबात योग्य नाही. या भीतीमुळे ताणतणाव अधिकाधिक वाढतच राहणार आहे. आणि यामुळे वैवाहिक आयुष्य काही समाधानी होणार नाही.
त्यामुळे अशा भीतीने जोडून राहण्यापेक्षा आपलं वैवाहिक आयुष्य असमाधानी का आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न करा.त्यावर काही solutions आहेत का हेही तपासून पहा.तुटेल की काय ही भीती मनातून काढून टाकून तेच नातं समाधानी होऊन जास्तीत जास्त टिकेन असा विचार करून पहा.एकमेकांशी संवाद साधून सहकार्याने निर्णय घेण्याचा प्रयत्न करा.एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो मोकळ्या संवादाने स्पष्ट करून घ्या.शक्य होईल तितका एकमेकांना वेळ द्या.एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
असं असमाधानी आयुष्य जगणं ढासळत जाणाऱ्या ‘शारीरिक’ आणि ‘मानसिक’ संतुलनाला कारणीभूत ठरते. मानसिकता बिघडत जाते आणि शरिरावर याचा परिणाम सहज होतो.जगणं मिळमिळीत होऊन त्यातील हास्य कमी होत जातं.त्यामुळे भीती काढून टाकून समजून उमजून, संवाद साधून यावर मार्ग काढा.वैवाहिक आयुष्य सुखी-समाधानी होण्यास सहाय्य होईल.भीतीने जोडून राहण्यात काही अर्थ नाही. भीतीने अस्वस्थता निर्माण होऊन नातं सुखी-समाधानी-निरोगी होण्याचे chances कमी असतात. आणि मग अशा नात्याला काही तितकासा अर्थ उरत नाही. भीतीने जोडून न राहता मोकळेपणाने बोलून मनापासून एकत्र राहण्यात आनंद आहे.यामुळे गोष्टी स्पष्ट होऊन पुढचे मार्ग निवडण्यास योग्य तो निर्णय घेता येईल.आणि अशाने वैवाहिक आयुष्याचा समतोलही व्यवस्थित रित्या टिकून राहील.
So…think about it…एकमेकांना समजून घ्या.exact समस्या काय आहे..? अडथळे कोणते आहेत..? हे शोधण्याचा प्रयत्न करा.वेळ द्या. संवाद साधा.कोणता मार्ग निवडायचा ते ठरवून घ्या.शक्य असल्यास समुपदेशनाचा विचार करा.
शेवटी जोडलं गेलं तर ते मनापासून जोडलं गेलं पाहिजे. मनात कोणतीही भीती बाळगून नव्हे.आणि मार्ग हा शोधला तर नक्की सापडतो.तो शोधण्याचा प्रयत्न करा.जोडलं गेलेलं टिकवणही आपल्याच हातात असतं.त्यामुळे आपल्याच समाधानी वैवाहिक आयुष्यासाठी आपण इतकं तर करूच शकतो नं…..???
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप अवघड आहे नातं टिकवून ठेवणे