लग्नाआधी स्त्री ने ठेवलेले शरीर संबंध याचा तिच्या पावित्र्याशी काही संबंध आहे का?
सोनाली जे
शरीर संबंध म्हणले च की आपल्याला काही मर्यादा दिसू लागतात. ते केवळ नवरा आणि बायको यांचेच असे शिक्कामोर्तब केले गेले आहे. आणि भारतासारखा संस्कृती, रीती, रिवाज ,मर्यादा , लज्जा या गोष्टींचा प्रभाव जास्त असताना शरीर संबंध हे नवरा बायको नात्या पुरते मर्यादित ठेवले जातात.
लग्नाआधी स्त्री ने ठेवलेले शरीर संबंध याचा तिच्या पावित्र्याशी काही संबंध आहे का? असे बरेचवेळा विचार केले जातात. पण पुरुष काय मग ? त्याने लग्नाआधी काही केले तरी चालते का ? तो पवित्र आहे का नाही याचा विचार येतो का कुठे ? नाही ना ??
लग्नाआधी स्त्री ने ठेवलेले शरीर संबंध याचा तिच्या पावित्र्याशी काही संबंध आहे का?
स्त्री बाबत शंका ही का घेतली जाते ? कारण लग्नानंतरच्या पहिल्या संबंधात जी स्त्रीची नैसर्गिक शारीरिक रचना असते त्यानुसार काही गोष्टी घडत असतात. ते सर्वांना माहिती. ती गोष्ट जर नाही घडली तिच्या बाबत तर आपल्या बायको ने लग्नाआधी काही संबंध ठेवले आहेत हा मोठा अविश्वास ..गैरसमज नवऱ्याच्या मनात येतो आणि मग घरचे ही संशय घेतात.
पण आजकाल मुली ही अनेक गोष्टी करत असतात. Cycling , मैदानी खेळ , जिमनॅस्टिक , अनेक प्रकार ज्यात नकळत नाजूक आणि नैसर्गिक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो ही बाब कोणीच लक्षात घेत नाही.
हा एक विषय वेगळा झाला.
पण…पण ..खरेच जर ..
लग्नाआधी स्त्री ने ठेवलेले शरीर संबंध याचा तिच्या पावित्र्याशी काही संबंध आहे का?
भारतीय संस्कृती प्रमाणे पती हाच परमेश्वर असे मानले जाते. त्यामुळे लग्नाआधी इतर कोणाशी किंवा लग्नानंतर नवरा सोडून इतर कोणाशी शरीर संबंध ठेवणे हे आपल्या संस्कृती मध्ये अपवित्र मानले गेले आहे . सांगायचे झाले तर सत्यवान आणि सावित्री यांची जी कथा आहे. त्यात सावित्री ही आपल्या पतीशी एकनिष्ठ आणि एवढी पवित्र होती की तिने त्या जोरावर सत्यवानाचा प्राण परत आणला.
त्याचमुळे लग्नाआधी स्त्री ने ठेवलेले शरीर संबंध याचा तिच्या पावित्र्याशी संबंध मानला जातो. अशा संबंधांना चांगले तर समजतच नाहीत. पण संस्कृती , समाज , कायद्याच्या हे विरोधात आहे.
तसे विचार केले तर लग्नाआधी स्त्री ने ठेवलेले शरीर संबंध हे दोन प्रकारात मोडू शकतात.
१. एखाद्या वेळेस अनुभव म्हणून , किंवा चुकून कोणी फायदा घेतला असेल तर. तर खरे तर ही गोष्ट नक्कीच माफ करण्याची आहे . कारण यात तिचा दोष नाही.
२. लग्नाआधी त्या स्त्री चे वारंवार इतर कोणाशी किंवा इतर अनेकांशी शरीर संबंध येत असतील. जसे त्या गोष्टीची चटक लागणे म्हणा , जसे वैश्या काही कारणास्तव या गोष्टी करतात. तसे काही असेल तर मात्र नक्कीच पावित्र्यता पेक्षा चारित्र्यहीन समजले जाते.
पावित्र्य हे एक मानसिक समाधान मानले जाते ना ! अर्थात मंदिर , मशीद , देवूळ असेल , चर्च इथे. पावित्र्यता राखणे ही जरुरी आहे. तिथे वातावरण च तसे असतें . पूजा , पाठ , मंत्रोच्चार , उदबत्ती ,धूप याचा सुगंध यातून ते वातावरण पवित्र असतें . तिथे गैर काही खपवून घेतले जात नाही. तसेच आपले शरीराची पावित्र्यता राखणे म्हणजे काय ? तर आपले शरीर म्हणजे कोणी यावे आणि त्याला वापरू द्यावे असे नाही ना ?
आपल्या शरीराची काळजी घेताना , पावित्र्य राखताना आपण त्यापेक्षा जास्त मनाची काळजी घेत असतो. कुलूप जसे त्याच्याच किल्लिने उघडले जाते तसे शरीर ही म्हणले तरी चालेल. यात एकनिष्ठता ही मनाने आली. तुमचा मनावर, बाह्य आकर्षण यावर किती नियंत्रण आहे हे समजते. आणि त्यातून तुम्ही शरीरावर किती कंट्रोल करू शकता हे ही.
हा शरीरावरचा कंट्रोल एवढ्याच करिता असतो, की जग फसवे आहे , आयुष्यात शरीर संबंध हाच उद्देश ठेवून जवळ येणारे पुरुष , स्त्री हे एकच पार्टनर सोबत समाधानी असतील असे नाही ना ? यातून जर अनेक ठिकाणी संबंध असतील तर काही रोगांना आपणहून किंवा नकळत किंवा भावना आणि शरीराच्या आकर्षणाच्या ओढी मध्ये मोठी चूक करणे झाले ना ?
तसे ते लग्नाआधी स्त्री ने ठेवलेले शरीर संबंध याचा तिच्या पावित्र्याशी काही संबंध आहे का?
तर हो एक तर विचार करा तुमचा नवा कोरा शर्ट , किंवा ड्रेस एखाद्याने / एखादीने वापरला आणि मग तुम्हाला वापरण्यास दिला तर ? एक तरी नव्या कोऱ्या ड्रेस ची घालण्यात ली मजा , उत्साह गेलाच , परत तो वापरून झालेला , मळका , दुसऱ्याच्या शरीरावरचा मग घाम असेल इतर किटाणू तो आपण तसाच घालणे मनाला पटते का ? नाही ना ? आपण तो स्वच्छ धुवून वापरतो. किंवा मग स्वतः नवीन वापरतो.
तसेच आहे दुसऱ्यांनी वापरलेले शरीर .. त्यातून transfer होणारे शरीरातील द्रव , काही रोग असतील , किंवा वापरलेली ती भावना ही मनाला मग ते मलिन . त्यातून काही आजार झाले तर ही भीती ही मनाला त्रासदायक ठरते. अगदी एकदाच चुकून जरी वापरले कोणी तरी मनात शंका निर्माण होत राहते की नक्की किती वेळा वापरले गेले असेल. आणि त्यातून संबंध ही तसे शंका कारक निर्माण होतात. त्यामुळे खरे सुख , समाधान , शांती यापासून दूरच राहावे लागते.
खरे तर एकदा नकळत झालेली चूक असेल किंवा कोणी गैरफायदा घेतला असेल तरी मोठ्या मनाने माफ करणारे पुरुष ही आहेत.
लग्नाआधी स्त्री ने ठेवलेले शरीर संबंध याचा तिच्या पावित्र्याशी काही संबंध आहे का? हा विषय का येतो तर स्त्री बाबत पुरुष खूप चोखंदळ असतात की तिचे कौमार्य भंग तर नाही ना झाले ? आणि ते समजते ..
आजकाल इतके आकर्षण , सोशल मीडिया , भावनिक जवळीक त्यातून शारीरिक जवळीक ही होत असते. काही वेळेस हे आकर्षण स्त्री ला ही रोखू शकत नाही. बंधन घालू शकत नाही. कधी कळत नकळत ती पुढे जाते. तर कधी कोणी तिला समजण्याच्या आत फायदा घेते.
पुरुषांच्या बाबतीत काही समजण्याचा प्रश्न येतच नाही. त्यांनी काही केले तरी त्यांना पवित्र वगैरे काही नियम , बंधने नाहीतच.
कसे आहे मुद्दाम जर वारंवार शरीर संबंध स्त्री कडून केले गेले तेही एक किंवा अनेक पुरुष तर ते आरोग्य दृष्ट्या नक्कीच घातक आहे.
पण पूर्वी पासून भारतात आपण शारीरिक संबंध किंवा त्याशी related गोष्टी वर मोकळेपणाने बोलत नव्हतो. किंवा त्याची आरोग्यदृष्ट्या कारणे ही वडीलधाऱ्या मंडळींना जमत नव्हते. म्हणून पवित्र , अपवित्र या गोष्टींचा पगडा वाढला. त्यातून तरी का होईना मनावर बंधन राहील हाच हेतू असे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

मला हा लेख एकतर्फी वाटला ,खुप गोष्टी पुरुषी मानसिकतेतून लिहिल्या सारख्या वाटल्या.
छान
विचार चांगले मांडलेत,पण एकाच बाजूने ,दुसरी बाजू म्हणजे पुरुष सत्ताक संस्कृतीबाबत थोडं दिपमध्ये जायला हवे होते,
खूपच छान
Good very nicely explained this article
वेगळेपणा वाटत नाही