
तुम्हाला आनंद आवडतो का ?
(पुणे)
माझ्या ह्या प्रश्नावर मला लोक म्हणाली “काय वेड्या सारखे प्रश्न विचारताय राव … आनंद कुणाला आवडत नाही ” मग मी विचारलं की तुम्हाला दुःखात व एकांतवासात राहणं आवडत का ? हा काही प्रश्नं आहे का ? म्हणून परत मला लोकांनी मूर्खात काढलं ! मग मी हे लोकांना विचारायचं सोडून स्वतः वर प्रयोग सुरू केला …
जीवनात जेव्हा जेव्हा वादळ आली, संकट आली, तेव्हा तेव्हा मी एकांतात राहू लागलो … अनेक कठीण प्रश्नांची उत्तरं दिली मला ह्या एकांतवासाने … जीवनाचे खरे पहलू उकलून दाखवलेत ह्या एकांतवासाने … खर तर अशा प्रसंगी आपणास आवश्यकता असते ती आपल्या माणसाच्या सोबतीची, आपल्या हित चिंतकांची, जे आपणास मार्ग दाखवू शकतात, धीर देऊ शकतात, पण खूप विचारा अंती माझा विचार थोडा बदलला, मी विचार केला की आपल्या माणसांना जर वाईट प्रसंगी सल्ला विचारला की मी नक्की काय करू ? तर कदाचित मला माझ्या उणिवा दाखवल्या जाणार व मला जे सोल्युशन हवं ते कदाचित मिळणार नाही, मग मी अस ठरवलं की प्रत्यक्ष ह्या नियतीशीच संपर्क करावा कारण ही नियतीच तर जगात सगळ्या गोष्टी घडवून आणते चांगलं, वाईट … झाला विचार पक्का, मग प्रश्नं होता की ती भेंटणार कुठं ? शोध सुरू झाला, अनेक मंदिरात गेलो फुल वाहली, नारळ वाहल, मंदिराला फेऱ्या मारल्या, हस्त रेश्या बघितल्या, धातूची अंगठी बनवून घातली, पण ती नियती मला कुठेच दिसली नाही, नंतर मला कळलं की ती एकांतातच भेटते, आणि मग जस जसे एकांतवासात राहू लागलो ती साक्षात प्रगट होत असे… अशा प्रकारे मला ह्या एकांतवासाची सवय झाली, ह्या एकांतवासात साक्षात नियती माझ्याशी संवाद साधू लागली …
जेव्हा जेव्हा मी स्वतःला संपवण्याचा विचार केला, तेव्हा मला ह्या नियतीने माझ्या कानात सांगितले की ” तू आहेस कुठं, तुझी निर्मितीच झाली नाही तर तू काय संपवणार ? हे शरीर … ते तर तसं ही संपणारच आहे, संपवायचं असेल तर तुझ्या मनातील भीती तू संपव, तुझ्या आयुष्यातील नकारात्मक एनर्जी संपव, तुझ्या न संपणार्या अपेक्षा संपव , इव्हढ्या लवकर आयुष्याच्या अडचणींना कंटाळलास ?
मी उत्तर दिलं ” होय मी कंटाळलोय हे रोज रोज चे प्रॉब्लेम फेस करून मी जीवनालाच कंटाळलोय” मग नियतीने मला जगातील काही अशी लोक दाखवली की त्यांची परिस्थिती ही तर माझ्या पेक्षाही अत्यंत वाईट होती … नियती माझ्याकडे हसत म्हणाली हे बघ तुला पायात घालायला शू नाही म्हणून दुःखी आहेस ना ? आणि या व्यक्तीला बघ याला तर पायच नाहीत तरीही तो आनंदी, हा बघ याला डोळे नाहीत पण चष्म्या विकतोय आणि हा मल्टिफ्लेक्स थिएटर मध्ये सिनेमा बघण्यासाठी रडत सुध्दा नाही, हा बघ याला ऐकायला येत नाही पण बाजारात हेडफोन विकतो कानाला लावून, तो तो बघ पोट भरण्यासाठी उंच तारे वरून चालतो कधी कोसळणार सांगता येत नाही तरीही चेहऱ्यावर हास्य” ही ताई एकेकाळी हीचा चेहरा सुंदर होता, बॉयफ्रेंड ने असिड टाकून विद्रुप केला, पण तिने जगणे सोडले नाही, हा जो वेडसर दिसतोय ना तो खूप शिकलाय, पण एवढे कष्ट करून, एवढी फी भरून ज्या मेंदूत ज्ञान साठवलं तो मेंदूचं आता काम करीत नाही, याच IAS बनण्याचं स्वप्न होत, पण सगळं संपलं !
आता तुला खात्री झाली असेल की वाईट प्रसंगात जगणारा तू एकटा नाही जगात, अनेक आहेत .
तुझी परिस्थिती ह्याच्या सारखी आहे का ? नक्कीच नाही, तू ह्याच्या पेक्षा खूप सुखी आहेस … मी बोललो …अरेच्या खरंच की, मी उगाच त्रागा करून घेतोय, पण मला कळत नाही की जगात एवढी लोक दुःखात आहेत, अडचणीत आहेत मग मला कशी दिसली नाहीत ? कारण नियतीने सांगितले की ” तू नेहमी आपल्यापेक्षा पैशाने व कर्तृत्वाने मोठया अश्या लोकांना जाहिरातीत, टीव्ही वर झळकताना बघत असतो, तू चित्रपट बघतो तेथे तेथील जग तुला चकचकीत दिसत, ऑफिस मध्ये जातो तेथे जग तुला आर्टिफिशल स्वरूपात दिसत, तू लग्न करतोस तेथे तुला मोठी स्वप्न दाखवली जातात, तू मुलीला कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊन देतोस तेथे तुला स्वप्न दाखवली जातात, मुलाचे कॉलेज संपले की त्याला खूप मोठी ऑफर आय. टी कंपनीतून येणार अशी स्वप्ने गृहीत धरतोस, तू एखादी आथिर्क गुंतवणूक करतोस, तेथे तू मोठं होण्याचं स्वप्न पाहतोस ! एकंदरीतच तू प्रत्येक क्षणी स्वप्नमयी जगात जगात असतो, तुला स्वप्ना सोबत खेळायची सवय झाली, आणि ही स्वप्न साकार झाली नाही तर मग तुझ्या सारखी लोक निराश होतात व आपण ह्या पृथ्वीवरील सर्वात दुःखी व्यक्ती आहोत असा समज करून घेतात
” मग मी नियतीला बोललो की मग याचा अर्थ मी कुठलीच स्वप्न बघूच नाहीत का ? नियती उत्तरली ” स्वप्न बघणे वाईट नसत पण त्यास वास्तवाची जोड हवी, अपयश पचवण्याची ताकद हवी, हे बघ खरं म्हणजे जीवन एक खेळ आहे गेम आहे, त्यात तुम्ही आपापले डाव लावलेले असतात, आता प्रत्येक डावात हुकुमाचा एक्काच निघेल हे तर मी स्वतः नियती सुध्दा सांगू शकत नाही ” डाव जिंकला तर ठीक, हरला तर … मी पुन्हा विचारलं ” हरला तर काय ? नियती बोलली … परत पुढचा डाव खेळण्यास सज्ज व्हावे, आणि हा डाव जो पर्यंत श्वास सुरू असतो तो पर्यंत कधीही खेळता येतो, त्यामुळे जर स्वप्ने पाहणार असाल तर डाव खेळावाच लागेल आणि डाव खेळलात तर हार किंवा जित ह्या पैकी काहीतरी होणारच … आता याला आपण जीवनाच्या समस्या म्हणाल का ? तुम्ही स्वतः च्या जीवना वर ज्या कारणाने नाराज होता त्या मुळात समस्या नाहीतच, त्या तर तुमच्या अवाजवी अपेक्षा आहेत … कधी पूर्ण होतील तर कधी होणार पण नाही हे वास्तव स्वीकारून जो आनंदी राहतो, प्रयत्नशील राहतो तोच खर जीवन जगतो… म्हणुन सांगते नियतीला गृहीत धरू नका … नियतीचे नियम पाळा व जीवन सुखी करा, एवढ बोलून ती नियती माझ्या समोरून गायब झाली कायमची …
आता मी तिला रोज शोधतोय पण माझ्या एकांतवासात ती पुन्हा आजपर्यंत आली नाही … ह्याच उत्तर मला सापडेना की नियती माझ्यावर नाराज तर झाली नसेल ना ? अस वाटलं, नंतर मला कळलं की ती मनाने सुखी व आनंदी माणसाच्या सानिध्यात परत कधीच येत नाही, म्हणजेच आता मला जीवनाचा अर्थ कळला… माझ्या अपेक्षा मर्यादीत झाल्यात त्या सोबतच माझा एकांतवास पण संपला …
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
online counseling घेऊन दिलेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

