नशिबावर विश्वास ठेवून स्वतःचे अजून किती नुकसान करणार ???
खूप लोकं आपल्या अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडताना दिसतात. माझ्या नशिबात हेच नाही अणि आसंच आहे, मला संधीच मिळाली नाही वगैरे वगैरे कारणं सांगत बसतात.
पण खरंच परिस्थिती, नशीब, संधी पुर्णपणे कारणीभूत आहेत! का ती एक सोयीस्कर पळवाट आहे!
मला काय वाटतं, कदाचित नशिबाने जे पाहिजे ते मिळालं नसेलही, पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणे हे तर माझ्याच हातात आहे. का मी सगळा दोष परिस्थिती, नशीब, संधी ह्या वर ढकलून मोकळा होऊ. मग जे आहे ते सुद्धा आनंदाने उपभोगता येणार नाही.
आयुष्यात जसे आनंदाचे प्रसंग येतात तसेच दुःखाचे प्रसंग पण येतात. त्या वेदनादायी आठवणी मी मागेच सोडून द्यायच्या का कायम बरोबर घेऊन आयुष्य काढायचे, हे मलाच ठरवावे लागेल ना!
कदाचित आजचं सुख वेगळे असेल. ते माझ्या आयुष्यात छान, चांगल घडवेल. कालच्या दुःखाच्या प्रसंगाचे ओझे मी आज बाळगले तर माझा आज पण वाया जाईल आणि हा आनंद मला कधी कळणारच नाही.
माझ्या हातून काल झालेल्या चुकांचा राग मी आज पण मनात तसाच ठेवू का त्या चुकांमधून योग्य तो धडा घेवुन पुढे जायचे, हे सुद्धा माझ्या हातात आहे. मी तेच ते उगाळत बसलो तर माझेच नुकसान जास्त होणार आहे. शेवटी मी माणूस आहे, चुका होणारच. पण म्हणून सारखी अपराधीपणाची भावना घेवून जगण्यापेक्षा स्वतःला माफ करणं अणि हा एक अनुभव घेवून पुढे जाणं हे श्रेयस्कर.
इतरांच्या अर्थहीन बोलण्याचा विचार करून चिंता करत बसायची का अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून माझे काम करायचे, हे माझ्याच हातात आहे. दोन्ही बाजूने बोलणारे लोक असतात. ते म्हणतात ना की, काही केलं तरी टीका होणार अणि नाही केलं तरी टीका होणार. अशा वेळी अर्थहीन, घातक बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे जाणे हे केंव्हाही चांगले.
माझ्या भावना न बोलता, लपवून, दाबून टाकायच्या का त्या योग्य ठिकाणी बोलून मन हलकं करायचं, हे देखील मीच ठरवणार. अव्यक्त भावनांचा अविवेकी उद्रेक करण्यापेक्षा त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणे मला आवडते.
शेवटी काय! परिस्थिती कधी अनुकूल असते तर कधी प्रतिकूल. पण परिस्थितीवर दोषच देत बसलो तर ती कधी अनुकूल आहे हे कळणार नाही.
नशीब पण आपल्या हातात नाही. पण जर पूर्ण प्रयत्न केले नाहीत तर नशीब सुद्धा साथ देत नाही. अणि कधीकधी भगीरथ प्रयत्नाने नशिबावर सुद्धा मात करता येते.
संधी काय कुणाला मिळते, कुणाला नाही. ती मोठी संधी असेल किंवा छोटी असेल पण मिळालेल्या संधीच सोनं करणं आपल्याच हातात आहे ना!!!
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.
खुपच छान
Sundar
Sundar ☺️?☺️
Very inspiring, thank you so much.