इथे कित्येक पुरुषांना रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते…
टीम आपलं मानसशास्त्र
स्त्री आणि पुरुष हे नैसर्गिकरित्या आकर्षण आहे. अनेकवेळा यापूर्वीही आपण यावर बोललो आहोत . लोहचुंबक जसे विरूद्ध पोल कडे attract होते तसे स्त्री पुरुष ही नैसर्गिकच विरूद्ध लिंगी व्यक्ती कडे आकर्षित होत असतात.
बरेचवेळा कसे होते की लग्नापूर्वी , लग्न झाल्यावर सुरुवातीला जी प्रेयसी , बायको असते ती बराच वेळ आपल्या पुरुषाला , लग्नापूर्वी प्रियकर असेल तोच लग्न झाल्यावर पती असेल तर त्याला भरपूर वेळ देत असते.
पण कालांतराने होत काय जाते की जबाबदाऱ्या , कर्तव्य वाढत जातात, घरातले आवरणे , साफ सफाई स्वच्छता , स्वैपाक , बाहेरून काही घेवून येणे , पुढे pregnancy , बाळंत पण , मुलंच्या जबाबदाऱ्या , शिक्षण , अभ्यास यात स्त्री अडकत जाते आणि तेवढा पुरेसा वेळ आपल्या पती ला देवू शकत नाही. तर काही वेळेस delivery नंतर तिच्यात होणारे शारीरिक बदल हे पुरुषांना नकोस होतात. त्यांचे तिच्याकडे आकर्षण नाहीसे होते.
स्त्री ही स्वतः वर , शरीरावर बराच कंट्रोल ठेवू शकते. परंतु पुरुषाचे तसे होत नाही. त्याचे ऑफिस , व्यवसाय यातून तो मोकळा झाला की त्याला त्याच्या शरीराची , त्याच्या गरजांची आठवण येतेच आणि त्या नैसर्गिक गरजा वेळेत पूर्ण व्हाव्या ही इच्छा असते. आणि पूर्ण नाही झाल्या तर बेचैन , चिडचिड , वाद होणे, व्यसनाधीन मग दारू असेल किंवा बाई बाटली असेल, हस्तमैथुन असेल अशा गोष्टीत तो अडकतो.
पुरुषाच्या शरीराची रचना , त्याची गरज , ही स्त्री पेक्षा जास्त असावी. आणि ती एवढी strong की तेव्हा ती पूर्ण करण्याकरिता तो काही ही करेल.
अर्थात असेही पुरुष आहेत जे स्वतः वर कंट्रोल करणारे आहेत.
आपण थोडा वेगळा विषय अभ्यासू : इथे कित्येक पुरुषांना रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते…
काय कारणं असतील बरे याची :
१. जसे वर म्हणले तसे की शरीराच्या गरजा त्या त्या वेळीं पूर्ण होणे पुरुषाच्या दृष्टीने गरजेचे. आणि त्या करिता जेव्हा जी स्त्री उपलब्ध असेल ती. असेही असेल . म्हणून ही रोज नवीन स्त्री म्हणले तरी चालेल.
२. नावीन्य : पुरुषांना काही तरी सतत नावीन्य पाहिजे असते. तोचतोचपणा नको असतो. त्यातून नवीन स्त्री कडून काही नवीन अजून चांगला अनुभव येईल ही अपेक्षा असते.
३. शारीरिक आकर्षण , फिगर : , स्वभाव , सहवास मग ऑफिस असेल , येत जाता असेल. नवनवीन स्त्रीच्या शरीराचे आकर्षण , तिच्या फिगर चे आकर्षण असते. त्यातून ही रोज नवीन स्त्रीकडे आकर्षित होवून ती पाहिजे असे होते.
४. past experience : एका स्त्री बरोबर संबंध आल्यावर काही वेळेस past experience चांगला नसतो. त्यामुळं तिच्या सोबत तर परत नकोच पण इतर स्त्री सोबत ही करताना त्याला थोडी भीती असते. किंवा मागचा अनुभव आठवत असतो.
तर याउलट एखादा अनुभव खूप चांगला असतो. पण ते पुढे त्या स्त्रीकडून continue केले जात नसेल .किंवा हा पुरुष म्हणून ही तिच्या कोणत्या जबाबदाऱ्या , भावनिक , नैतिक , सामाजिक , कायदेशीर गोष्टी म्हणून अडकून पडण्यापेक्षा रोज नवीन स्त्री परवडली असेही होत असेल.
५. काही वेळेस पुरुष स्वतः कमी पडत असेल : आपली बायको असेल , किंवा इतर स्त्री सोबत पुरुष कमी पडत असेल तर त्याच्या मनात एक न्यूनगंड निर्माण होत असेल आणि तो दूर करण्यासाठी , आपला स्वाभिमान , पुरुषत्व जपण्यासाठी ही पुरुषाला रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते…
६. पॉर्न व्हिडिओज : सोशल मीडिया , मित्रांची संगत आणि फुस यामधून ही काही गैरसमज निर्माण होत असावेत . त्यामुळे ही विविधता आणावी या हेतूनं पुरुषाला रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते…
आता परवा एक मुलगी आली होती . तिच्या वडिलांना घेवून . तिची आई expire झाली. दुसरे लग्न ही केले वडिलांनी. पण तरीही रोज नवीन बाई कडे पैसे टाकून जातात. खूप पैसे उधळतात. ही मुलगी आणि अजून एक मुलगा आधीच्या बायको पासून . नंतरच्या बायको पासून दोन मुले त्यांनी मात्र यांच्याकडून घर , शेती , पैसा काढून घेतला. पाहिल्या बायकोची ही मुलगी आणि मुलगा यांना मात्र फारसे काही दिले नाही. आणि आहे ते आता असे रोज नवीन बाई वर उधळतात. पैसे शेतीतून येत असेल तरी बँक बॅलन्स रिकामा होतो .
तुम्हीच समजवा. तेव्हा तिच्या वडिलांशी बोलले. ते म्हणाले पहिली बायको गेली म्हणून दुसरी केली. मुले आहेत दोघींची . पण ह्या दुसऱ्या बायको कडे गेलो की ही देते शारीरिक सुख पण त्या बदल्यात प्रत्येक वेळी पैसे , मुलांच्या करिता काही मागून घेते. नाही म्हणले तर गावभर बोंबाबोंब करते. केवळ शरीर पाहिजे जबाबदाऱ्या घेत नाही. अशी बदनामी गावभर करते. गावात यांना तसे खूप respect आहे.
खानदानी श्रीमंती आहे. Politics मध्ये आहेत. डायरेक्टर , आहेत बऱ्याच कंपनी चे. आणि पूर्वी लोकांना ही खूप मदत केली आहे . अजून करतात. त्यामुळे लोकांना आदर आहे. पण या बायको मुळे बरेचवेळा काही ना काही बाहेरून कानावर येते.
त्यापेक्षा या मुलीचे वडील आपल्या गरजा भागविण्यासाठी रोज नवीन स्त्री शोधतात. पेक्षा पैसे दिले की सगळे मिळते बायका ही तयार होतात. त्या तात्पुरत्या सुखातून शांतता , सुख तरी मिळतें . आणि परत बायको ला पैसे द्यायचे त्यापेक्षा रोज नवीन स्त्री सोबत सहवास ही मानसिकता. आणि भावनिक , कायदेशीर , नैतिक गुंतागुंत ही नाही.
जसे की ” रात गई बात भी गई ” .
हे वातावरण दूषित होण्याची मानसशास्त्रीय कारणे काय असावीत :
१. कोणत्याही पुरुषाला रखरखी स्त्रिया नको असतात. त्यांना सुख , शांतता आणि शरीर सुख आणि त्यातून मिळणारी शारीरिक शांतता , तृप्तता या सोबत मानसिक शांतता ही पाहिजे असते.
जेणे करून पुरुषांना असलेला कामाचा ताण , स्ट्रेस , प्रवासाचा असेल, आर्थिक , सामाजिक. , कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना होणारी कसरत असेल , कर्ज फेड करायची असेल किंवा गुंतवणूक असेल , भविष्याचे विचार , दैनंदिन खर्च भागवताना होणारी धावपळ असेल .
या सगळ्यातून कुठे तरी सुटका हवी असतें . आणि शारीरिक सुख ही त्यातून नैसर्गिकरीत्या तणाव रहित करत असते. मन आणि शरीर हलके करत असते. म्हणून ते याचा विचार करतात ते सुख मिळावे म्हणून धडपड करतात. अशावेळी जर जोडीदार रखरख करणारी असेल तर मात्र त्रास कमी होण्याऐवजी मानसिक त्रास अजून वाढतो. आणि तो कमी करण्याकरिता मग रोज नवीन स्त्रीकडे आकर्षण निर्माण होते. नवीन स्त्री पाहिजे असते. ज्यात भावनिकदृष्ट्या कुठे गुंतागुंत नको , जबाबदाऱ्या घ्यायला नकोत . कायदेशीर रित्या कुठे अडकून पडायला नको. पण शरीरसुख मात्र पाहिजे. ही मानसिकता असते.
२. संगतीचा परिणाम : काही मित्रांची संगत लाभते. जे केवळ आपल्या आनंदाचा सुखाचा विचार करतात. त्यातून एखाद्या वेळी अनुभव घेण्यास काय हरकत असे करत वेगवेगळे अनुभव घेतले जातात. काही वेळेस force केले जातात. तर काही वेळेस त्याच्या पौर्युष्या ला आव्हान केले जाते. त्यातून रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते…
मग मी कुठे कमी नाही हे सिद्ध करण्याची मानसिकता तर समोर येते.
३. वातावरण दूषित होण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्य , जॉइंट family मधून nuclear फॅमिली मध्ये रुपांतर. यात आई वडील , नवरा बायको दोघेही कामा करिता बाहेर असतात. त्यात त्यांच्या रोज जास्त वेळ कामानिमित्ताने संपर्कात येणारे त्यांच्या समवेत ही बरेचवेळा आकर्षण निर्माण होवून मग पुढची स्टेप घेतली जाते .
तर इकडे आई वडील नोकरी करणारे असतील तर मुलांना मैदान रिकामे मिळते. त्यांच्यावर कोणाची बंधने नसतात. त्यामुळे स्वातंत्र्याचा जरा जास्तच उपभोग घेतात. अशी मुले मुली मग रोज कोणी ना कोणी शोधात असतात. किंवा संपर्कात असणाऱ्या सोबत बिनधास्त रोज नवीन टेस्ट म्हणून त्याकडे बघत असतात. ही मनोवृत्ती बहुदा तरुण पिढीत आढळते.
आता प्रश्न राहिला की असंच सुरू राहिलं तर पुढे काय होऊ शकतं : त्याचे परिणाम काय होतील :
१. लग्न या सारखी विवाह संस्था धोक्यात येईल. मुलांची मनोवृत्ती बिघडू लागली. रोज नव्या टेस्ट ची सवय लागली की मुलांना लग्नासारखे , नात्यासारखे बंधन नकोस होईल. त्यात विनाकारण गुंतून पडणे वाटेल.
मुले ही तर खूप पुढची गोष्ट झाली. कदाचित वंशवृद्धी खुंटेल. आणि ही तरुण पिढी मोकाट सुटेल.
२. व्यसनाधीन : रोज नवी स्त्री . जर एखादे दिवशी नाही मिळाली .. कोणत्या स्त्रीने विरोध केला तर अस्वस्थ होतील , बेचैन होतील. हे सुध्दा व्यसनच झाले. आणि जर नाही मिळाले तर कदाचित दारू किंवा ड्रग सारख्या व्यसनात गुंतवून ही घेतील.
३. स्त्री अत्याचार अजून वाढतील : कारण कितीही विचार बदलत गेले तरी भारतीय स्त्री ही मर्यादा , संस्कार यात वाढलेली असते. सगळ्याच स्त्रिया रोज नवीन पुरुषाला स्वीकारणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी नकार दिला तर स्त्रीवर अत्याचार वाढतील , कधी इमोशनल गोष्टी करून गोड बोलून मुलींना पटविले जाईल. तर कधी त्यांच्या मनाविरुद्ध ही करतील. आणि हे अत्याचार करताना पुरुषांना काही गैर ही वाटणार नाही.
४. पैशकरिता काही चांगल्या स्त्रिया ही आपली पातळी सोडतील. त्यांना सहज आणि थोड्या वेळात पैसै मिळविण्याचे साधन होईल.
आजपर्यंत पैसे मिळविण्याकरिता शरीर विक्री करणारा वेगळा वर्ग होता . त्यांना नाव ही वैश्या. त्यांचा area ही वेगळा. पण पुढे जर असे कोणी ही काही पैसे मिळविण्याकरिता करू लागले तर स्त्री कडून ही पुरुषांना प्रोत्साहन दिले जाईल .तर कधी त्यांना आपल्याकडे मोहित करण्याकरिता स्त्रिया ही कोणत्याही पातळीवर जातील.
पुरुषांना मोहित करणारे कोणी असेल तर ते नक्कीच पाघळणारच. तशी त्यांची ओढ आपोआप वाढून दुसऱ्या स्त्रियांना वापरून घेण्याची मनोवृत्ती वाढणारच.
५. कायदा , समाज , नैतिकता याची बंधने तर राहणं शक्य नाहीच.
६. स्वतः चा पार्टनर नसेल तर काळजी घेणारे ही कोणी नसेल त्यामुळे एकाकीपणा वाढेल.
७. जसे एकाकीपणा , स्वैराचार आणि मनमानी करण्याचा स्वभाव वाढेल .तसे घरी किंवा बाहेर मोठ्यांना respect किंवा त्यांची भीती ही, बंधने ही राहणार नाहीत.
८. मनोवृत्ती बिघडेलच पण रोज नवे पार्टनर मूळ शारीरिक व्याधी ही वाढतील आणि त्यात शरीर ही त्रास सहन करेल आणि पैसा ही खर्च त्यामुळे अजून असुरक्षितता वाढेल. शरीर स्वस्थ नसेल तर मन ही स्वस्थ नसते.
अर्थात प्रत्येकाने आपल्यावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असते. काही वेळेस कायदा , विवाह बंधने , कुटुंब यात सुरक्षितता असते. निरोगी समाज आणि निरोगी स्वास्थ्य राखणे जरुरी असते. त्यामुळे इथे प्रत्येक पुरुषाला रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते…तरी प्रत्येकाने स्वतः वर कंट्रोल ठेवणे जरुरी असते.
आपण भारतासारख्या संस्कारी , रूढी परंपरा जतन करणाऱ्या देशात राहतो. त्यामुळे केवळ आपलाच विचार न करता आपल्या कुटुंबाचा , स्त्री चा , देशाचा ही विचार करणे जरुरी असते. हे वातावरण दूषित होण्याची मानसशास्त्रीय कारणे प्रथम दूर करावीत. त्याचे होणारे परिणाम ही कसे होतील आणि त्यावर कशी बंधने घालता येतील हे महत्वाचे. किंवा त्या परिणामाचा विचार गांभीर्याने करणे जरुरी आहे. समाजाचा घटक म्हणून आपले ही काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवणे महत्वाचे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup chhan