Skip to content

बायकोची साथ का गरजेची असते ??

बायकोची साथ का गरजेची असते ??


प्रीती विजया लांडगे


कारण तीच एक अशी साथ असते. जी आयुष्यात आपल्याला एकतर पुढे घेऊन जाते किंवा मागे म्हणून ही साथ खूप महत्त्वाची दोघांनी एकमेकास पुरक असाव एकमेकांसाठी जगाव उगाच जगायच म्हणून जगू नये अनेक संकटे आली तरी तुम्ही हिम्मत हरत नाही भकंमपणे उभे राहाता कारण कळत नकळत तुमची अर्धांगिनी तुमच अंग बनून तुम्हाला साथ देत असते आत्मिक बळ देते.

एक साध उदाहरण देते खूप वादळ आले पाऊस पाणी झाला खूप प्रमाणात तर मोठ मोठे वृक्ष कोलमडून पडतात परंतु एक वेली कधी तुटून पडत नाही ति खूप चिवट असते. अगदी तशीच तुमची बायको तुम्हाला या वेली प्रमाणे तुमची साथ देते. म्हणून तीची साथ गरजेची असते. आणि मनापासून एकमेकांना जर साथ दिलीत तर एक आदर्श जोडी म्हणून इतरांना ही प्रेरणा मिळती.

फक्त तुमच्या आवाजानेच तुमच्या नात्याची ताकद समोरच्याला समजून जाईल. म्हणूनच एकमेका साह्य करु अवघे धरू सुपंथ हे फक्त बाहेरच्या जगात वारताना नाही वापरायचे. तर दोघांनी एकमेकांच्या आयुष्यात वापरून एकमेकांला सोबत करायची असते.

आंबट, गोड, तिखट सगळे प्रसंग येणार परंतु तुम्ही एकमेकांची साथ सोडू नका आणि अशा प्रसंगी ची तिची खरी ओळख करते, ताकद कळते आणि तिची मजबूत आपल्याबद्दलची पकड ही कळते. म्हणून ही साथ अशी कायमस्वरूपी हवी असेल तर तीचा आदर करा तीच्या भावनांची कदर करा आणि सुखसंवाद तीच्यासाठी साधा

तेव्हा ही साथ अशीच कायम तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यात, आरोग्य, पैसा, आणि नाते हे तीन घटकच खूप महत्त्वाचे असतात आणि यांनेच आपन कधी निराश, उदास होतो तर खूप आंनदी होतो म्हणून म्हणून नात्यांचा विचार करा त्यावरती काम करा एकमेकांची मन सांभाळा बाकीच्या दोन गोष्टी आपोआप सुधारतात आणि जेव्हा जशी साथ हवी तशी तेव्हा तेव्हा मिळते.

कोणीही अनुरूप नसते तुम्हाला ते अनुरूप करावे लागते तुमच्या जोडीलारात जी कमी आहे ती तुम्ही भरुन काढायची त्याला त्या कमतरतेची जाणिव न होऊ देता हळूवारपणे त्याला सोबत करणे म्हणजे अनुरूप असणे होय. तिचा किंवा त्याचा आधार बनने किंवा एकमेकांना आदर देणे/करणे म्हणजे अनुरूप असणे होय. आणि यासाठीच बायकोची काय किंवा नवर्याची काय दोघांचीही साथ गरजेची असते.

आणि ही साथ जर पक्की असेल ना तुम्ही आयुष्यात कितीही वादळे येऊ द्या तुम्ही हिम्मतीने आणि आनंदाने लढता. पडलेल्या माणसाला हात देऊन त्याच्या जिवनाचा आलेख उंचवण्यासाठी गरज असते तीची ती सोबत असेल तर तुम्हाला हरण्याची भिती नसते.

तुमच्या प्रत्येक कामात तीची सोबत आणि साथ नकळत साथ मिळते म्हणून तुम्हीही तिच्या सोबत तिला हव तेव्हा असणे तिला वेळ देणे हे ही तितकच महत्त्वाचे असते. म्हणून बायकोची साथ गरजेची असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

7 thoughts on “बायकोची साथ का गरजेची असते ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!