(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)
डिप्रेशन ही सर्वच मनोविकारांमध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसून येणारी एक विकृती आहे. डिप्रेशन हा मनोविकार आत्ताच्या जगात इतका सर्रास पहावयास मिळतो की अनेकदा त्याला मनोविकारांमधील थंडी, ताप असेच संबोधले जाते.
केस : अनिल हा एक २५ वर्षीय अविवाहित तरुण असून नुकतेच वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्याने आपले MBBS कसेतरी वडिलांच्या दबावाखाली काठावर पूर्ण केले. अनिलची खरी कला ही संगीतात आहे. तो उत्कृष्ट गायक व गिटार वाजवतो. तसेच कॉलेजमधले सांस्कृतिक कार्यक्रम त्याने पुष्कळदा गाजविले आहेत. आपला स्वतःचा Music Band असावा आणि आपले एखादे गाणे संगीतसृष्टीत यावे, हे त्याचे स्वप्न आहे. परंतु घरातुन त्याच्या या कलेला फारशी कोणीही किंमत देत नाही. याउलट अनिलने आपले क्लिनिक पुढे चालवावे अशी भयंकर अपेक्षा त्याच्या वडिलांची आहे. पण अनिलला त्यामध्ये काहीही रस नाही. अनिल हा हळव्या मनाचा असल्याने वडिलांना प्रचंड घाबरतो. वडिलांच्या दबावाखाली येऊन तो क्लिनिकला जाऊ लागला. याच निराशेने कित्येकदा त्याने पेशंटला चुकीची औषधे लिहुन दिली. आज अनिलला क्लिनिकमध्ये सहा महीने होत आले. यादरम्यान त्याच्यात बरेच बदल घडून आले. आजकाल अनिल एकलकोंडा सारखा वागतो, कोणाशीही फारशे संबंध ठेवत नाही, डोक्याला हाथ लाऊन बसलेला आढळतो, वेळेवर जेवत नाही, तासंतास एकटा खोलीत घालवतो, social media वर चमकणारा अनिल आता मित्रांचे फोनही उचलत नाही, गिटारकडे चुकुनही मान वळवत नाही. वडिलांच्या सतत वाढणा-या अवास्तव अपेक्षांमुळे अनिलला एक मानसिक आजार जडला होता आणि तो म्हणजे डिप्रेशन ! आपण कुचकामी आहोत, आपले जीवन व्यर्थ आहे अशा अनेक विचारांनी ६८ वजनाची आकर्षक शरीरयष्टी असणारा अनिल आता ४६ वर येऊन पोहोचला होता. अशा या अनिलच्या आजारामागे कुठेतरी आपल्याच अवाजव अपेक्षा आहेत हे त्याचे वडील स्वीकारतील का ? आणि संगीताची आवड असणा-या अनिलच्या हातात धुळीत पडलेली गिटार देऊन “तु पुन्हा नविन सुरुवात कर” असे म्हणतील का ? कोण जाणे !
लक्षणे :
१) डिप्रेशनने पीडित व्यक्तीला सतत उदास, खिन्न, हताश व हतबल झाल्यासारखे वाटते. कुठल्याच गोष्टीत त्याला रस वाटत नाही व कोणतीच घटना त्याला आनंद देत नाही.
२) झोप लागायला खुप वेळ लागणे, झोप लागलीच तर मधेच जाग येणे व मग पुन्हा झोप न लागणे, असे प्रकार दिसतात. तर काही केसेसमध्ये झोपेचे प्रमाण वाढल्याचेही दिसून येते.
३) भूक न लागणे, जेवणात रस न वाटणे व एकुणच चव कमी होणे.
४) बसणे, उठणे, चालणे, बोलणे यासारख्या एकुण सर्वच हालचाली मंदावतात. शिवाय सतत दमल्यासारखे वाटू लागते.
५) अशा व्यक्तींचा स्वतः बद्दल व भविष्यकाळाबद्दल नकारात्मक दृष्टिकोण असतो. जसे, मी सगळ्यातच कमी पडतो, मी कायम अपयशीच ठरणार, सर्व समस्या अशाच चालु राहणार, ह्यातून काही मार्ग निघुच शकणार नाही, यापुढे तर परिस्थिति आणखी बिकट होत जाणार ई.
६) मन एकाग्र न करता येणे, स्मरणशक्ती कमी होणे, एकुणच कोणतेही बौद्धिक काम करण्याचा वेग कमी होणे.
७) काही गंभीर केसेसमध्ये व्यक्तीला सतत मृत्यूचे किंवा आत्महत्येचे विचार येऊ लागतात.
डिप्रेशन का येते ?
डिप्रेशन ही मनोविकृती होण्यामागे विविध मानसशास्त्रज्ञांनी विविध कारणे दिली आहेत. काही मानसशास्त्रज्ञ डिप्रेशनचा त्या व्यक्तीच्या बालपणाशी सबंध जोडतात. बालपणी जर त्या व्यक्तीची आई (किंवा इतर खुप जिव्हाळ्याची व्यक्ती) काही कारणाने त्याच्यापासून दूर गेलेली असेल व याबद्दल त्या व्यक्तीच्या मनात खुप खंत व दु:ख दडून राहिले असेल तर मोठेपणी कुठल्याही तणावपूर्ण परिस्थितीत अशा व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकते. याखेरीज आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीच्या मृत्यूचे कटू सत्य न पचवता आल्यामुळेही डिप्रेशन येऊ शकते. काही मानसशास्त्रज्ञ नकारात्मक विचारसरणी ही डिप्रेशनला कारणीभूत मानतात. अशा विचारसरणीची माणसे सतत स्वतःला दोष देतात. कुठल्याही परिस्थितीचे केवळ वाईट पैलूच लक्षात घेतात व भविष्याकडे एकुणच निराशावादी दृष्टिकोनातुन पाहतात. कोणतीही तणावपूर्ण परिस्थिति उद्भवली तर आपण यातून काही मार्गच काढू शकणार नाही, आपण पूर्णपणे हतबल आहोत, अशी या लोकांची ठाम समजुत असते, अशा या त्यांच्या नकारात्मक विचारांमुळे ते आणखीनच हताश होतात व कालांतराने डिप्रेशनच्या गर्तेत सापडतात. याशिवाय काही मानसशास्त्रज्ञांचे असे म्हणने आहे की कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती उद्भवली की अशा व्यक्ती सतत इतरांकडे आधार व मदतीची अपेक्षा करतात. इतरंकडून प्रेम व सहानुभूती मिळवायला या व्यक्ती नाना त-हेचे त्रास होत असल्याचे सांगून दुस-याला भंडावून सोडतात. इतरांकडून हवी ती प्रतिक्रिया मिळाली नाही की अशा व्यक्ती नैराश्येच्या गर्तेत आणखी खोल जाऊ लागतात व हे चक्र असेच चालू राहते. याखेरीज स्वतःकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न होऊ शकल्यामुळे काहींना डिप्रेशन येऊ शकते (जसे अनिलच्या बाबतीत झाले). जनुकीय अभ्यासातून (Biological Study) असे लक्षात आले आहे की, डिप्रेशन ही मनोविकृती अनुवंशिक असु शकते. शिवाय काही केसेसमध्ये मेंदूतील काही रसायनांच्या (सेरोटोनिन) कमतरतेमुळे डिप्रेशन येऊ शकते. थोडक्यात डिप्रेशन होण्यामागे एकच कारण नाही. म्हणुनच प्रत्येक केसेसमध्ये अचूक कारण शोधणे महत्वाचे ठरते. कारण योग्य उपचार त्यावरच अवलंबुन असतात.
उपचार :
मानसशास्त्रामध्ये डिप्रेशन या मनोविकृतीवर अनेक शास्त्रीय पद्धतीचे उपचार सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये Psychoanalytic Therapy, Cognitive Therapy, Behavioral Therapy, Somatic Therapy ई. हे प्रमुख उपचार पद्धती असून यातील ठराविक मुद्दे म्हणजे –
१) व्यक्तीच्या मनात दडलेल्या तीव्र भावना व संघर्ष जाणीवेच्या पातळीवर आणून व्यक्तीला त्या भावनांशी सामोरे जायला लावणे.
२) व्यक्तीचा स्वतःकडे, परिस्थितीकडे, भविष्याकडे व एकुणच जगाकडे बघण्याचा दृष्टिकोणात बदल करण्याचा प्रयत्न केला जातो.
३) व्यक्तिमध्ये असलेल्या चांगल्या गुणांची, त्याच्या प्लस पॉइंटची जाणीव करुन देणे. एखाद्या कठीण परिस्थितीचे सकारात्मक पैलू लक्षात आणून देणे, व्यक्तीला असलेल्या ठाम नकारात्मक समजुती कितपत ग्राह्य आहेत हे तपासून पहायला लावणे.
४) बाग काम करणे, आवडीची खरेदी करणे, छंद वर्गाला जाणे, मित्रमंडळीत मिसळणे, चित्र काढणे, योगा करणे, डांस करणे, लिखाण करणे, पुस्तके वाचणे, गाणी ऐकणे ई छंद जोपासण्यास प्रोत्साहीत केले जाते.
टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते
My spouse and I stumbled over here coming from a different website and thought I may as well check things out. I like what I see so i am just following you. Look forward to looking at your web page for a second time.
This actually answered my problem, thank you!
For every situation of mind, at every age group,there will be some confusion, some mistakes happen in life.
As per this there are lot of catagarisation takes places in mental disorders…some are at primary while some are at hight stage.
Can you plz tell that what is the healthy stage of mind. Is there any person available who is completly helthy in terms of mental diseases.
I read all the topic related to mental diseases.
I found all situations are almost so common for all . I mean every person should go through it at least at primary stage.
Is there any device that can help us to find out that we are normal or not.
Kindly share stories of normal persons life, how do they live healty and mentaly stable life.
Try to introduce some great persons who live there life with mentally stable and always in comfort zone.
Is there any person like this?
I think no….?
Kindly reply on it.
Very nice
Nice
Mast
Khupch chhan vatla got important information.
खुपच छान
खुप छान.
धन्यवाद !
nice