Skip to content

या दलदलीच्या नात्यात एकतर लग्नसंस्था संपवावी नाहीतर घटस्फोट सोप्पा व्हावा.

या दलदलीच्या नात्यात एकतर लग्नसंस्था संपवावी नाहीतर घटस्फोट सोप्पा व्हावा.


हर्षदा पिंपळे


लग्न अर्थात विवाह म्हणजे भारतीय संस्कृतीत एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो.मुला-मुलींची शिक्षणं संपली की लग्नाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर हमखास मांडला जातो.कुणाची लग्न मनाविरुद्ध होतात तर कुणाची अगदी त्यांच्या मनाप्रमाणे होतात.

जेव्हा एखादी गोष्ट व्यवस्थितरित्या साध्य होते तेव्हा त्या गोष्टीवर सहसा कुणीही आक्षेप घेण्याचा प्रयत्न करत नाही. मुळातच तशा शंका -कुशंका उद्भवतच नाही. परंतु जर का गोष्टी टिकायलाच तयार नसतील तर त्यावर निःशंकपणे आक्षेप हा घेतला जातो.का?कोणामुळे?कशासाठी?असे प्रश्न सहजच त्यावेळी समोर येतात.

अगदी बरोबर यासारखच लग्नाच आहे. संसार सुरळीत चालला तर आनंदी आनंद असतो.पण जर संसार काही सुरळीतपणे चालत नसेल तर क्षणाक्षणाला स्वतःवरच शंका येऊ लागते.कोणत्या ना कोणत्या कारणावरून जोडप्यांमध्ये वादविवाद वाढत असतात. हल्ली तर क्षुल्लक गोष्टींवरून खटक्यांच प्रमाण हे वाढलं आहे. नात्यातील समजूतदारपणा कुठेतरी कमी होताना दिसतोय.

“विट आलाय या नात्याचा…कधी एकदाचं वेगळ होता येईल काय माहीत” अशी वाक्य हल्ली सर्रासपणे आपल्या कानावर पडताना दिसतात.

अशावेळी मनात प्रश्नांची सरबत्ती चालूच राहते.गोष्टी इतक्या टोकाला जाऊन बसतात की थेट लग्नसंस्था किंवा लग्न ठरवणाऱ्यांना दोष द्यायला मन धजावत नाही.अशावेळी या लग्नसंस्थाचा जन्म कशाला झाला हाच मोठा प्रश्न पडतो.या लग्नसंस्था नसत्या तर आज ही वेळ आलीच नसती वगैरे वगैरे वाटत रहातं.अशावेळी निव्वळ लवकरात लवकर घटस्फोट व्हावा असं वाटत रहातं.पण घटस्फोट मिळणं काही सोपी गोष्ट नाही.

घटस्फोटासाठी किती नी काय काय करावं लागतं.त्यात दोघांना घटस्फोट हवा असेल तर एकवेळ घटस्फोट थोडा तरी सोपा जातो.पण जर दोघांपैकी कुणा एकालाच घटस्फोट हवा असेल तर गोष्टी अधिकाधिक अवघड होऊन बसतात.आज घटस्फोटाची मागणी केली आणि अर्ध्या तासात तिला मंजुरी मिळाली असं काही होत नाही.

एक क्षणभरही जोडीदारासोबत राहण्याची इच्छा नसताना केवळ घटस्फोटासाठीही कितीतरी वेळ हा जोडीदारासोबत घालवावाच लागतो.खरच तुम्हाला घटस्फोट हवाय का..? तुमचे वाद सामंजस्याने निवळू शकत नाही का..?इतके दिवस एकत्र राहिलात नं… मग आता नातं का नकोय..? असे प्रश्न ऐकून ऐकून डोकेदुखी अजून वाढायला लागते.आणि त्यात एखादं अपत्य असेल तर नानाविध प्रश्न उभे राहतात.

कधी एकदा या नात्यातून मोकळं होतोय असं वाटतं असतं.कुठल्यातरी मोठ्या पेचात अडकलोय अशी भावना निर्माण होत जाते.अशावेळेस काय करावं काहीच कळत नाही.क्षणाचा विलंब न होता घटस्फोट मंजूर व्हावा असं वाटत राहतं.यामध्ये केवळ दोघांची नाही तर दोन्ही कुटूंबांची फरफट होत असते.

कारण लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींच नसतच.तर लग्न आलं म्हणजे दोन कुटूंब त्यावेळी जोडली जातात. त्यामुळे दोन्ही कुटूंबाची फरफट होणं साहजिकच आहे.आणि अशावेळी यामध्ये नोकरी ,कुटुंब आणि स्वतःच आयुष्य कुठेतरी होरपळून जाता कामा नये असच वाटतं.पण कुठेतरी विचार करता यामध्ये उरलेल्या आयुष्याची कळत नकळतपणे एक वेगळीच दशा होत असते.

अशावेळी घटस्फोट लवकर मिळत नसेल तर सगळं काही अवघड होऊन बसतं.एका घटस्फोटामुळे सगळं काही अडून राहतं.अशावेळी लग्नसंस्था तरी संपवाव्या किंवा घटस्फोट तरी सोपा व्हावा असं वाटणं अगदीच साहजिक आहे.

पण ….मुळातच लग्नसंस्था ही दोन कुटूंब जोडण्याच काम करत असते.आणि अशातच जर लग्न टिकतच नसतील तर थेट जोडपी कोर्टाची पायरी चढायला सुरुवात करतात. लग्नसंस्था ते कोर्टापर्यंतचा प्रवास खरच इतका सोपा असतो का…? तुम्ही म्हणत असाल घटस्फोट लवकर मिळत नाही वगैरे वगैरे. पण विचार करा…कुणालाही कोणतही नातं तुटावं असं अजिबात वाटत नाही. पुन्हा एखादं सोल्युशन काढून नाती टिकवू शकत नाही का…?

ह्याचा विचार एखाद्या समुपदेशकाला नक्कीच करावा लागतो. त्या दोघांनी उगाचच क्षुल्लक कारणांवरून थेट विभक्त व्हावं असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे ते तुमच समुपदेशन करणं स्वाभाविक असतं.कुठलाही समुपदेशक तुमची नाती पुन्हा कशी एकत्र बांधली जातील याचाच विचार करतात. कारण लग्नापासून ते विभक्त होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नसतो हे समुपदेशकही जाणत असतात.

त्यामुळे एकतर लग्नाचा निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. कारण विचार करायच स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कुठलीही लग्नसंस्था तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही.आणि छोट्या छोट्या कारणांवरून जर पटत नसेल तर त्यावर उपाय म्हणून थेट विभक्त होण्याचा मार्ग निवडू नका.सोडवली तर नात्यांची कोडी सुटतात.नाहीतर कितीही काहीही केलं तरी ती अवघड वाटतात.

त्यामुळे घटस्फोट मिळणं हे सहजासहजी सोपं नाही.घटस्फोट सोपा व्हावा असा विचार करण्याऐवजी नाती कशी सहज सोपी होतील याकडे लक्ष द्या.कारण लग्नसंस्था संपवणं आणि घटस्फोट सोपा होणं हे काही त्यावरील बेस्ट options नाहीत. So…. विचार करा…आणि नंतर निर्णय घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “या दलदलीच्या नात्यात एकतर लग्नसंस्था संपवावी नाहीतर घटस्फोट सोप्पा व्हावा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!