हस्तमैथुन आणि गैरसमज.. ते केल्याने कमजोरी येते का ? स्त्रियांनी सुद्धा हे करावं का ?
टीम आपलं मानसशास्त्र
शरीर शास्त्र आणि मन म्हणजेच मानसशास्त्र याचा खूप निकटचा संबंध या प्रश्र्नाशी निगडित आहेत. हस्थमैथुन आणि गैरसमज.. ते केल्याने कमजोरी येते का ? स्त्रियांनी सुद्धा हे करावं का ?
ती एक नैसर्गिक गोष्ट आहे सर्व स्त्री पुरुष करत असतात…
आपण भारतासारख्या थोड्या मर्यादाशील देशात राहतो. जिथे शारीरिक संबंध, हस्त मैथुन अशा गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा अजूनही केली जात नाही. आपली संस्कृती , संस्कार , रीती , मर्यादा , पिढीमधील अंतर यामुळे कोणाला जाणून घेण्याची इच्छा असेल किंवा कोणाला खरेच काही माहिती आपल्या शरीराच्या काही नैसर्गिक गरजा असतात. आणि त्या त्यावेळी पूर्ण होणे हे सगळ्यात गरजेचे असते.
मध्यंतरी एक लेख वाचला होता . psychology संदर्भात च. त्याचा आधार घेवून थोडी माहिती देते.
बायको : सकाळी गरम चहाचा कप आणून ठेवते. आणि म्हणते . अहो, या शब्दातच काही तरी सांगायचे हे समजले.
बायको : – जरा लक्ष ठेवा चिरंजीवांकडे ,
अहो : का काय झाले .?
बायको : टेबल वर पसरलेले वर्तमानपत्र असते त्यावर घाईघाईने चिरंजीवांच्या बेड वरच बेडशीट आणून ठेवते. त्यावर पडलेल्या डागा कडे लक्ष जाते.
आणि मग सगळ्या गोष्टी लक्ख प्रकशात येतात.
कसे बोलावे हा विचार करत असताना समीर चे मित्र सगळे चांगले ओळखीचे ..गप्पा टप्पा , त्यांना विचारावे म्हणून गेलो . त्यात आमोद ला हाक मारली. बियर घेणार का? झाले दोघे मिळून बसलो. त्याला स्पष्ट विचारले काय रे तुला कसे समजले ? कोणी सांगितले ? काही नाही हो काका मित्र सांगतात. समीर ला ही सांगतील किंवा सांगितले असेल. मला तर माझ्या मित्रांनी सांगितलं.
शेवटी काही नाही स्वतः बोलायचे ठरविले. समीर अरे ज्या त्या वयात जी ती माहिती होणे गरजेचे असते. अपुरे ज्ञान, किंवा अज्ञान सर्वात वाईट.
ते मुद्दाम ठेवलेले कालचे बेडशीट दाखवून बाबा म्हणाले हे बघ हे असे का ? तेव्हा समीर म्हणाला की आजोबांनी सांगितले की हस्तमैथुन वाईट. म्हणून ते न केल्याचा हा झोपतला परिणाम.
तेव्हा वडील सांगतात समीर ला हा गैर समज मनातून काढून टाक. योग्यवेळी , योग्य प्रमाणत ती गोष्ट करणे गरजेचे. फक्त त्याच्या आहारी जावू नकोस.
साधारणपणे ज्या वयात सेक्स आणि हस्तमैथुनाबद्दल कुतुहल जागृत होते, प्रश्न पडायला लागतात त्या वयापासूनच त्यांची उत्तरं देण्यासाठी कोणी उपलब्ध नसते. त्यामुळे अयोग्य व्यक्तींना प्रश्न विचारलं जाणं आणि चुकीची उत्तरं मिळण्याचा धोका जास्त असतो.
त्याचे परिणाम काय होतात ?
१. पॉर्न बघण्याची सवय लागते का ? त्याचे परिणाम काय होतात .
बरेचदा लागू शकते. चोरुन व्हिडिओज बघितले जातात.
२. मुली असतील तर मासिक पाळी दरम्यान करावे का ? त्याचे परिणाम ?
३. ही गोष्ट करताना सेक्स चे विचार मनात किती येतात ? का येतच नाहीत. बहुदा लहान वयात येत नाहीत. केवळ नैसर्गिक आनंद आणि गरज पूर्ती करणे यावर लक्ष केंद्रित असते.
४.ही गोष्ट केल्यावर काही मानसिक न्यूनगंड निर्माण होतो का ? स्वतः सतत guilt feel करून घेतले जाते का ? बरेचदा सुरुवातीला होते. मुले असोत अथवा मुली. नंतर सवय झाली की काही वाटत नाही. पण कधी कोणी बघेल ही भीती असते.
म्हणून बरेचदा घरी एकटे राहण्याची संधी शोधली जाते. स्तमैथुनाबद्दल उघड बोललं जात नसल्यामुळे चुकीच्या कल्पना, अफवा, भीती पसरवणारे विचार, अयोग्य मार्गदर्शन यांचा धोका जास्त असतो. त्यामुळे व्यक्तीचा गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त असते.
हस्तमैथुन म्हणजे काय?
हस्तमैथुन याचा अर्थ व्यक्ती आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून ‘शरीर’सुखाचा आनंद घेते. हस्तमैथुन करताना व्यक्ती काही कल्पना डोळ्यांसमोर आणून, शारीरसुखाचा विचार करून स्वतःला उत्तेजित करून वीर्यस्खलन करतात. प्रत्येक व्यक्ती ही प्रक्रीया वेगवेगळ्या पद्धतीने करते.
याला हस्तमैथुन अशी एक संज्ञा वापरली जात असली तरी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून वीर्यस्खलन करतात. त्यामुळे हस्तमैथुन संकल्पनेतील हाताचा वापर प्रत्येक व्यक्ती करेलच असे नाही.
Freud या मानसशास्त्रज्ञांनी जसे pleasure principal सांगितले आहेत. तसेच हस्तमैथुन यात ही self pleasure आहे.
१. हे कधी करावे वाटते,? आणि का करावे वाटते ?
वयात आल्यानंतर आपल्यात harmonal बदल घडून येत असतात. हे सगळे नैसर्गिक बदल घडतात.
हस्तमैथुन करताना मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं द्रव्य स्रवतं. मेंदूमध्ये चांगली हार्मोन्स स्रवत असतात.
यातून शरीराच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करणे हा हेतू असतो. जर ती गोष्ट केली गेली नाही तर मन आणि शरीर सतत अस्वस्थ होत राहते. अगदी साधे उदाहरण पाण्याचे पिप भरायला लावले. ते पूर्ण भरले . किंवा पूर्ण भरून वाहू लागले तर आपण काय करतो ? एक तर नळ बंद करतो किंवा जास्तीचे पाणी काढून टाकतो. तसेच ही नैसर्गिक क्रिया आहे.
यात शरीरात हार्मोन्स , द्रव निर्मिती ही होतच राहणार . पण ती वेळीच काढून , बेचैन अवस्था , मन आणि शरीर यावरचे ताण दूर करून रिलॅक्स फील होण्याकरिता , ताणतणाव असेल त्यातून मुक्तता मिळविण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. ज्यातून आनंद आणि सुख निर्मिती होते.
२. परत परत का करावे वाटते : तर नैसर्गिक आहे. Consumption झाले तर creation हे होणारच. त्यामुळे ती गोष्ट परत परत करण्याची नैसर्गिक गरज भासते.
३. स्त्री पेक्षा पुरुशाचे प्रमाण करण्यात जास्त असते. कारण नैसर्गिक आहे. आणि पुरुष ही गोष्ट सहज रित्या करू शकतात. स्त्री तिच्या मर्यादा , लाज , संकोच यामुळे स्त्री मध्ये हे प्रमाण कमी असते.
हस्तमैथुन आणि गैरसमज.. ते केल्याने कमजोरी येते का ?
१. हस्तमैथुनामुळे कोणतेही शारीरिक नुकसान होत नाही. त्यामुळे प्रजननावर, वीर्यनिर्मितीवर परिणाम होत नाही .
२. हस्तमैथुनामुळे प्रतिकारक्षमतेवर आजिबात परिणाम होत नाही. कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा येत नाही.
३. हस्तमैथुनातून वीर्य जातं आणि त्यामुळे रक्त कमी होतं व शेवटी प्रतिकारक्षमता कमी होते असा एक गैरसमज असतो . तसे काही होत नाही.
४. कितीहीवेळा हस्तमैथुन केलं तर चालतं का? किंवा रोज, आठवड्यातून, महिन्यातून कितीवेळा हस्तमैथुन केलं तर योग्य असे प्रश्न उपस्थित होतात.
कितीवेळा करावं हा त्या व्यक्तीनुसार बदलत असतं. इथं आकड्याला महत्त्व नाही. प्रत्येक व्यक्तीची हस्तमैथुनाची पद्धत वेगळी असते तसंच ते कितीवेळा करावं हेसुद्धा बदलतं. मात्र त्याचं व्यसनात रुपांतर होत असेल म्हणजेच त्याचा तुमच्या रोजच्या जगण्यात, एकाग्रतेत, अभ्यासात, कामात अडथळा येत असेल तर मात्र त्यावर विचार व्हायला पाहिजे.
हे इतर कोणत्याही बाबतीत लागू होते. कोणतीही सवय किंवा व्यसन तुमच्या आयुष्यात अडथळा निर्माण करत असेल तर ती समस्या होऊ शकते तसंच हस्तमैथुनाच्या बाबतीतही आहे.”
स्त्रियांनी सुद्धा हे करावं का ?
बहुतांश लोकांना हस्तमैथुन फक्त पुरुषच करतात असं वाटत असतं. पण हा मोठा गैरसमज आहे.
भारतीय स्त्रियांना आपण हस्तमैथुन करतो हे सांगण्यात लाज , संकोच किंवा अपराधी वाटतं.आणि आजपर्यंत भारतात तसे या गोष्टीवर मोकळेपणाने बोलले जात नाही त्यामुळे काही गोष्टी लपून च केल्या जातात.
स्त्रियांमध्ये हस्तमैथुनामुळे वाईट काही होत नाही. उलट शरीरात मूड चांगला करणारी संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. तुम्हाला लैंगिक आजार होत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे यात गरोदरपणाचा धोका नसतो.”
आता मासिक पाळीत करावे का ?
तर तेव्हा नैसर्गिक इच्छा झाली तर करावे पण काळजी घेवून करावे. कारण मुळात तेव्हा काही नैसर्गिक रक्तस्त्राव बाहेर येत असतात. त्याची काळजी घेणे जरुरी.
Periods पूर्वी शरीर जड वाटणे, छाती भरून येणे, मानसिक तणाव, नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे आणि मूड बदलत रहाणे याचाही अनुभव काही महिलांना येतो.
मासिक पाळी सुरू होईपर्यंत प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते.
त्या हार्मोन्सचा मेंदूवर परिणाम होत असल्याने महिलांच्या वर्तणुकीत फरक होऊ शकतो.
उलट या काळात स्त्री ला उत्कट इच्छा होत असते. कारण या सगळ्यातून तिला रिलॅक्स होण्याकरिता हस्तमैथुन मदतच करते.
विवाहित जोडप्यांनी हस्तमैथुन करावे का?
१. तर नक्कीच करावे. आधी एखाद्या जोडीदाराला तृप्ती मिळाली असेल तर त्याने आपल्या जोडीदाराला हस्तमैथुन याच्या आधारे तृप्ती मिळूवून देण्याकरिता प्रयत्न करणे यात गैर काहीच नाही.
२. काही वेळेस मर्यादा , pregnancy , जोडीदाराला दीर्घकालीन आजार असतील तर नक्कीच यातून आनंद मिळविणे आणि गरज पूर्ती करणे योग्य.
हस्तमैथुन आणि गैरसमज.. ते केल्याने कमजोरी येते का ? स्त्रियांनी सुद्धा हे करावं का ?
हस्तमैथुन याकडे चुकीच्या नजरेनं बघू नये. ही नैसर्गिक गोष्ट आहे. हे सर्वांनीच लक्षात घ्यावे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

USEFUL INFORMATION
How nc
Nice