आजारी बायका नवऱ्याने घेतलेल्या काळजीने पटकन बरे होतात..
गीतांजली जगदाळे
महिला जेव्हा आई,मुलगी,पत्नी,बहीण,आणि मैत्रीण या कोणत्याही भूमिकेत असतात तेव्हा अगदी अशक्य गोष्टी ही शक्य करून दाखवतात. पण त्याहून जास्त भारतीय महिला काही औरच!! त्यांच्याबद्दल विशेष कौतुक वाटण्याचं कारण म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या या महिला अजून ही कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पार्टनरपेक्षा जास्त उचलताना दिसतात, ते ही बऱ्याचदा विनातक्रार.
इथे मला तुलना करायची नाहीए, पण हे सत्य आहे. बाहेर नौकरी करून देखील घर सांभाळणं हा खूप अवघड टास्क आहे. पण हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की आपल्या कुटुंबाबद्दल असणार प्रेम आणि माया या पोटी हे सगळं केलं जात.
महिलांचे हक्क, समानता या सगळ्या गोष्टी माहित असून आणि त्या पटून सुद्धा काही महिला त्याबद्दल बंड न पुकारता विनातक्रार सगळी कामे अगदी प्रेमाने करत राहतात. महिलांचा मूळ स्वभाव हा जास्त करून इमोशनल असतो, म्हणजेच मानसिक सुख,समाधान, काळजी, प्रेम ,आदर या गोष्टी त्यांना जास्त महत्वाच्या असतात. आणि पुरुष हे प्रॅक्टिकल असतात.
निर्णय घेताना याची प्रचिती आपल्याला बघायला मिळते. आता या दोन्हीमध्ये अपवाद नक्कीच आढळतात. पण जास्त प्रमाण हे असं पाहायला मिळत. आणि त्यामुळेच महिलांना प्रेमाचे दोन शब्द देखील खूप महत्वाचे वाटतात. जस आईला तिने केलेल्या पदार्थाचं कौतुक ऐकून समाधान मिळत, आणि बायकोला, ती आपल्यासाठी करत असलेल्या गोष्टींची जाणीव तिच्या कुटुंबियांना/ नवऱ्याला आहे हे बघून समाधान मिळत.
आणि त्याचप्रमाणे जेव्हा बायको आजारी पडते, तेव्हा नवऱ्याने तिची काळजी करणं, डॉक्टरकडे घेऊन जाणं आणि emotionally तिच्यासाठी उपस्थित असण्यानेच ती अर्ध्याहून जास्त बरी झालेली असते. आता आजारपणात आपल्या पार्टनर साठी available असणे हे आपण आपले कर्तव्यच जरी समजत असलो तरी बायकोच्या दृष्टीने ते खूप महत्वाचे ठरते.
नवऱ्याची अशी काळजी आणि प्रेम बघून बायकांना ते खूप आत स्पर्श करून जातं. कदाचित तुम्ही पुरुष ती बरी झाल्यावर हे सगळं विसरून ही जाताल, पण बायको नवऱ्याने इतकी आपुलकीने घेतलेली काळजी कधीच विसरत नाही. तिला फक्त आनंद आणि समाधानच मिळत नाही, तर शब्दांपलीकडे असणार सुख मिळून गेल्यासारखी ती होते.
कारण मुळातच महिलांना मग ती कोणत्याही भूमिकेत का असेना, ती तुमच्यासाठी करत असलेल्या गोष्टींची तुम्हाला जाणीव आहे हे एवढंच तिच्यासाठी पुरेसं असतं. तुम्ही तिला देत असलेल्या भेटवस्तूंपेक्षा जास्त महत्वाचं आणि तिला जास्त आनंद देणारं म्हणजे तिची काळजी करणं,तिला जपणं, ती करत असलेल्या गोष्टींची कदर करणं हे होय.
आजारपण शरीराचं जरी असलं तरी मानसिकरित्या खुश असलेला माणूस कोणत्याही आजारपणातून recover होण्याचे चान्स जास्त असतात. कारण मानसिक शक्ती ही शारीरिक शक्तीपेक्षा कधीही जास्त मोठी असते.
भारतीय व्यवस्थापनात तर अनेक प्रकारच्या महिला पाहायला मिळतात. काही गृहिणी ज्यांनी २४/७ स्वतःला कुटुंबासाठी वाहून घेतलेलं असत,तर काही बाहेर जॉब सांभाळून घर, मुले, नवरा अशा बऱ्याच गोष्टी सांभाळत असतात. पण किती मोठं आश्चर्य आहे नाही? संपूर्ण जग सांभाळायची ताकद असणारी स्त्री, तिचा आनंद तो कशात असावा? फक्त आपल्या जोडीदाराच्या काळजी करण्याने, मायेने जवळ घेण्याने सगळं काही हरायला ती तयार असते.
स्त्रियांची सायकॉलॉजि आणि पुरुषांच्या सायकॉलॉजि मध्ये खूप फरक आहे. हे दोघेही वेगळ्या पद्धतीने काम करतात. आणि त्याचमुळे स्त्रियांना पुरुष असे का असतात असा प्रश्न पडतो आणि पुरुषांना तर स्त्रिया कॉम्प्लिकेटेड च वाटतात. संपूर्ण जग जिंकण्याची ताकद असणाऱ्या महिला, सगळ्या जगाशी लढतील , पण त्यांना मानसिकरीत्या गरज असते ती आपल्या पार्टनर ची.
काही लोकांना वाटतं की स्त्रियांना आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पुरुषांची गरज असते. पण तसं सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे खूप मोठे surprises आणि गिफ्ट्स पेक्षा ही जास्त महत्वाचं स्त्रियांसाठी दुसरं काहीतरी असतं,आणि ते म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींत त्यांचा आनंद दडलेला असतो.
आणि त्यामुळेच आपली काळजी करणाऱ्या पार्टनर मुळे त्या फक्त आजारपणातून लवकर बऱ्याच होत नाहीत तर त्याबदल्यात कितीतरी अवघड गोष्टी आपल्या पार्टनर साठी आपल्या कुटुंबासाठी न मागता ही करत असतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khub chhan as watal ki mazya war kela ahi me pan 18 years job kela Atta Mala back pain Zala ahi khub strugal kela g me
Chan