Skip to content

मुलं जर अभ्यास करायला तयार होत नसतील तर असे काही बदल करुन पहा…

मुलं जर अभ्यास करायला तयार होत नसतील तर असे काही बदल करुन पहा…


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


वर्षा शंतनु च्या, तिच्या मुलाच्या बाबतीत पुरती हैराण होऊन गेली होती. कंटाळली होती. शंतनु तिसरीत होता. दिवसभर त्याच्या मागे मागे करायला लागायचं. सारखं त्याला अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून ओरडाव लागायचं.

पण तो मात्र काही केल्या ऐकत नसे. या सगळ्यात वर्षाची दमछाक व्हायची. कारण घरातली सर्व कामं, त्याला आवरून शाळेत पाठवा, आल्यावर परत त्याच्या खाण्यापिण्याच बघा. तरी तो घरी आल्यावर लगेच बाहेर खेळायला पळायचा. हाक मारून मारून बोलवून त्याला अभ्यासाला बसवावे लागे. त्याला प्रेमाने, लाडाने, सांगून झाले, रागवून, ओरडून, मारून झालं.पण नाही.

जितका तो खेळात रमत असे तितका तो अभ्यास करायला तयार होत नसे. त्यामुळे शांतनु चा अभ्यास आणि त्यासाठी त्याला तयार करण हा वर्षाच्या पुढे यक्षप्रश्न होऊन राहिला होता.

वर्षाप्रमाणे अनेक घरात अस होताना दिसत. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत हे हमखास होतेच. अनेक आया यामुळे त्रस्त असतात. त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात पण रोज कसरत करायला लागत असते. पण हे असं किती दिवस करायचं, मारून मुटकून गणपती किती काळ चालणार हाही प्रश्न येतो. म्हणूनच मुलं जर अभ्यासाला तयार होत नसतील तर नेहमी पेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे काही बदल करायला पाहिजेत.

१. ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टी अभ्यासात आणण्याचा प्रयत्न करा: आपण ऐकतो की बरेचदा माझ्या मुलाला किंवा मुलीला अभ्यास करावासाच वाटत नाही त्यांची इच्छाच नसते किंवा त्याच्या मनच नसतं, अभ्यासाला सांगितलं की तोंड वाकड करतात. तर इच्छा कमी किंवा जास्त किंवा नसते असं नाही तर ते दुसरीकडे शिफ्ट झालेली असते.

त्यामुळे जेव्हा मुल अभ्यासाला तयार होत नाही तेव्हा त्याला सारखं तु का तयार होत नाही, का आवडत नाही हे विचारण्यापेक्षा तुला काय करायला आवडतं हे विचारा तर नेमके त्याला कशाची इच्छा आहे हे समजेल. लहान मुलांना जास्त करून खेळायला आवडत याचं कारण काढून घेतला म्हणजे त्या खेळायला का आवडतं असं विचारलं तर लक्षात येईल की खेळांमध्ये मजा असते नवीन काहीतरी असतं.

आता तुम्हाला हीच मजा हेच नवीनपण अभ्यासात आणायच आहे आणि त्या पद्धतीने अभ्यास तयार करून मुलांना करायला द्यायचा आहे. त्यांच्या अभ्यासाची तयारी वाढेल. थोडक्यात त्यांना ज्या गोष्टीचा आनंद मिळतो तो आनंद अभ्यासात मिळवून द्यावा लागेल. म्हणून अभ्यास कंटाळा न ठेवता जास्तीत जास्त क्रिएटिव पद्धतीने करायला दिला तर ते करतील.

२. अभ्यास करण्याची पद्धत फक्त एकच ठेवू नका: आता सर्व अभ्यास ऑनलाइन घेतला जातो तसंच हे टेक्नॉलॉजी च युग आहे. त्यामुळे मुलांना शिकवला जाणारा अभ्यास हा व्हिडिओमध्ये तसेच नेटवर पण मिळतो. यामुळे अभ्यास जास्त जास्त ऑडिओ-व्हिज्युअल तसेच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून घ्या. मुलांना फक्त पुस्तकातून अभ्यास न करायला होता त्याच कन्सेप्ट त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून शिकवा.

एखादी कन्सेप्ट समजावताना वेगवेगळे instrument वापरा. हल्ली गणित शिकवण्यासाठी विविध नवनवीन गेम आले आहेत ते तयार करा. त्यातून शिकवा. तसंच रोल प्ले मधून बऱ्याच गोष्टी समजतात. तो करा. अशाप्रकारे तुम्हाला जितकं वेगळं आणि नवीन करता येईल तितकं करा.

३. तुमचा समान सहभाग ठेवा: बऱ्याच वेळा पालक मुलांना अभ्यासाला बसून आपल्या कामाला निघून जातात पण असं करू नका. तुम्ही त्यांच्या अभ्यासात समान सहभागी व्हा. याचे दोन फायदे आहेत. तुम्हाला त्यांची ग्रास्पिंग पॉवर, तसंच ते कशा पद्धतीने अभ्यास करतात हे समजेल, त्यांची प्रगती समजेल तसेच तुम्ही समान भाग घेऊन त्यांचा वेगवेगळ्या गोष्टींतून अभ्यास घेतला तर त्यांची आवड वाढून ते सुद्धा सहभाग घेतील. त्यांना एकट वाटणार नाही. अभ्यासाला तयार होतील.

४. अभ्यास करायला तुम्ही फक्त मदत करायची आहे त्यांचा अभ्यास तुम्ही करायचा नाही: अनेक जण मुलांचा अभ्यास स्वतः पूर्ण करतात किंवा त्यांच्या बरेचसे म्हणजे असे की आर्टच्या गोष्टी असतील किंवा इतर अनेक गोष्टी असतील तर स्वतः कम्प्लीट करून टाकतात. मुलांना करायला सांगतात पण नाही केला तर स्वतःच करतात. त्यांना जमणार नाही असं वाटून पण तेच करतात. पण अश्याने मुलाच नुकसान होऊ शकत. त्यांना जर तो अभ्यास दिला आहे याचा अर्थ त्याचं वय लक्षात घेऊनच तो दिला आहे.

असं केल्याने मुलांची प्रवृत्ती अशी होते की आपण अभ्यास नाही केला तरी आई बाबा करून देतील. त्यातून ते दुर्लक्ष करतात. म्हणून भलेही मुले 4 मधील दोन गणित सोडवू दे त्याला सोडवायला लावा. कुठे अडचण आली तर समजून आपण त्यांचा अभ्यास त्याला करू द्या.

५. Change talk, बोलायची पद्धत बदला: मुलांना अभ्यास करायला बसवण्यासाठी ओरडलच पाहिजे असं नाही. तर इथे आपल्या बोलण्याची पद्धत बदलली पाहिजे. आपण अनेकदा अभ्यास केला तर त्याचा काय फायदा होईल व नाही केला तर काय नुकसान होईल याच पद्धतीने बोलतो.

कारण आपणही तसेच वाढलेलो आहोत. म्हणजे अभ्यास केला तर तुला खाऊ देईन नाही केला तर मार मिळेल, टीव्ही बंद, टीचर ओरडणार. पण या दोन गोष्टी सोडून अजूनही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन आपण तसं मुलाशी बोलल पाहिजे. त्या कोणत्या तर मुलाचा अभ्यास करण्याचा हेतू आणि त्याची क्षमता. तर असं कधी होत नाही की मुलं काहीच करत नाहीत. उशिराने का होईना बसतात.

आता इथे थोडा अभ्यास करून ते थांबत असतील, कुरकुर करत असतील तर आपल्याला न रागावता वेगळ्या पद्धतीने बोलल पाहिजे. उदा. आता तू इतका अभ्यास केला म्हणजे तुला पण नवे शिकायची आवड आहे तुला पण अभ्यास पूर्ण व्हावा असं वाटतं, मॅडम नी सांगितलेलं ऐकायच आहे.(हेतू) दोन गणित सोडवलीस म्हणजेच तुला गणित हळूहळू जमायला लागली आहे. (क्षमता)जशी तु ही दोन गणित सोडवली तशी उरलेली गणिते सोडवून बघ म्हणजे तुला खेळून आल्यावर परत अभ्यास करावा लागणार नाही, अभ्यास पूर्ण होईल आणि जास्तवेळ खेळता येईल.

अशाप्रकारे आपलं बोलणं ठेवलं तर मुलांना उत्साह येईल. हे काही बदल केले मुलांच्या कलाने त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, आपला सहभाग ठेवून अभ्यास घेतला तर नक्की मुलं तयार होतील आणि अभ्यास ही गोष्ट त्यांना कंटाळवाणी वाटणार नाही.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!