Skip to content

जोडप्यांमध्ये जेव्हा एक संतुष्ट नसतं, तेव्हा काऊन्सिलिंग कोणाची व्हायला हवी ??

जोडप्यांमध्ये जेव्हा एक संतुष्ट नसतं, तेव्हा काऊन्सिलिंग कोणाची व्हायला हवी ??


मयुरी महेंद्र महाजन


दोन जीवांचे होणारे मिलन हे फक्त नात्यांच्या परी सीमेवर सीमित असते, असे नाही, तर एकमेकांच्या सुख दुखा:ची काळजी घेणं, एकमेकांना हवं-नको ते बघणं, कोणी सोबत नसले तरी मी आहे, हा विश्वास निर्माण करणं, एक दुसऱ्याकडून असणाऱ्या गरजांची पूर्तता करणं, एकमेकांना आधार देणे, एकमेकांसाठी असणे महत्त्वाचे आहे ,

जेव्हा दोन जीव नात्याच्या बंधनातून एकत्र येतात, तेव्हा दोघेही एक वेगवेगळं व्यक्तिमत्त्व घेऊन जन्माला आलेली असतात, परंतु आयुष्याच्या या टप्प्यावरती आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सोबत अजून एक व्यक्तिमत्त्व कायमच बांधलं जातं,

तसेच समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वा सोबत आपणही त्याच प्रमाणे बांधले जातो, पण गंमत अशी आहे की संसाराचा हा प्रवास दोघांच्याही साथीने पुढे जाणारा असतो, त्यात मान, सन्मान, आदर, प्रेम हे आलेचं, पण याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, समानता हो समानता चं ही प्रत्येक बाबतीत असावी मग ते आर्थिक, असो सामाजिक असो शैक्षणिक, राजकीय स्तरावर असो.

इतकेच काय लैंगिक स्तरावर ती सुद्धा, समानता हवी, वर वाचलेल्या गोष्टींबद्दल आपण थोडा विचार जरूर करणारं, एक व्यक्ती म्हणून भाव भावना या दोघांना असणारचं, मग त्याबद्दल हुकुमशाही पुरषाचीचं का असावी??? जेव्हा जोडप्यांमध्ये एक संतुष्ट नसतं, तेव्हा कौन्सिलिंग कोणाची व्हायला हवी,?? खरं तर जेव्हा दोघांपैकी एक संतुष्ट नसते, तेव्हा दुसरी व्यक्ती ही पूर्णपणे संतुष्टता अनुभवू शकत नाही, जरी वरवर व्यक्ती तसं दाखवत असली, तरी मनात मात्र त्या व्यक्तीला ते जाणवते,

जर एक व्यक्ती संतुष्ट नसेलं, तर त्याचे कारण आपणच आहोत का?? किंवा जोडीदाराला काही समस्या आहेत ,आपल्या आपल्या जोडीदाराची गरज आपण ओळखायला हवी, आणि त्याची पूर्तता करणे हे आपले कर्तव्य आहे ,

जोडीदाराच्या असंतुष्टतेची कारणे शोधायला हवी, जेणेकरून आपण त्यासाठी जबाबदारी घ्यायला हवी, बऱ्याच ठिकाणी अपेक्षित ईच्छांपेक्षा, अनपेक्षित ईच्छांचा मारा जास्त असतो, आणि त्यामुळे एखादी व्यक्ती संतुष्ट नसेल, तर दुसऱ्याला ते पूर्ण व्हावे असे वाटणे देखील सहज नसते ,

मग त्या बाबतीत हळूहळू गोष्टी इग्नोर व्हायला लागतात, व नात्यात कुणीतरी एकाकडून इग्नोर झाल्यामुळे, दुसऱ्याच्या मनात त्याची खूप मोठी खंत मनाच्या कोपऱ्यात ऊमटली जाते, असंतुष्ट असणारी व्यक्ती आपल्या अपेक्षांच्या पिंजऱ्यात अडकलेली असते, आणि जोडीदार म्हणून आपली ही जबाबदारी असते ,की आपण आपल्या जोडीदाराची त्यातून सुटका करायला हवी, काँन्सिलिंग ही संतुष्ट असलेल्या व्यक्तीची व्हायला हवी, तशीचं, ती संतुष्ट नसेलेल्या व्यक्तिची पण व्हायला हवी, कारण की कोण,कुठे कमी पडतंय, हे तर प्रत्येकाच्या परिस्थितीवर, मनस्थितीवर आणि एकंदरीत वातावरणावर अवलंबून आहे, याचं कारण असं आहे,

मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात आपल्याला नेमके ब्लाँक कुठे पडलेतं, हे शोधायला हवे, तरचं आपल्याला प्रवास सुरळीत करता येईलं, आणि दुसरे कारण असे आहे की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती जगात वावरतात, प्रत्येक माणूस एकापेक्षा दुसरा वेगळा आहे,

एकाची परिस्थिती दुसऱ्या साठी लागू करता येत नाही, कारण प्रत्येकाची जगण्याची तह्रा ही वेगवेगळी आहे, त्यामुळे समोर आलेले जोडपे कशा स्वरूपाचे आहेत, यावरून आपण त्यांचा एकमेकांशी असलेल्या, नात्याच्या परी सीमेवरून कौन्सिलिंग साठी असणारे नीतिनियम यावरून कौन्सिलिंग कुणाची व्हावी, हे ठरवता येईलं,

पण एक गोष्ट मात्र नक्की समजून घ्यायला हवी, नाते दोघांचे असते, ते दोघांकडून असायला हवे ,एकमेकांकडून असणाऱ्या गरजा एकमेकांनी पूर्ण करायला हव्यात ,नातं दोघांचं असतं, दोघांनी मिळून त्याला फुलवायला हवं, तर त्यातला आनंद अनुभवता येतो….!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जोडप्यांमध्ये जेव्हा एक संतुष्ट नसतं, तेव्हा काऊन्सिलिंग कोणाची व्हायला हवी ??”

  1. हा लेख छान आहे,पण councelling करायची वेळ आली की अजूनही समाज लवकर तयार होत नाही. न counceller पण मुख्य मुद्दा सोडून timepass khup करतात.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!