केवळ शरीराने स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष कसा ओळखावा??
टीम आपलं मानसशास्त्र
प्रत्येक स्त्री ला तसे एक हा वेगळा सेन्स , जाणीव असते. कोणता पुरुष कोणत्या नजरेने बघतो आहे , बोलतो आहे. जवळीक करतो आहे हे बऱ्यापैकी तिच्या लक्षात येते. ही जवळीक सुरुवातीला मनाची असली , भावना समजून घेण्याची असली , मैत्रीची असली , कामाच्या ठिकाणी एकत्र काम करत असताना मदत करण्याची असली , तरी त्यातून केवळ शरीराशी स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष कसा ओळखावा?? हा सेन्स साधारण सर्व सुजाण स्त्री वर्गामध्ये आलेला असतो.
कालच विकल्प शॉर्ट फिल्म बघताना हे प्रकर्षाने जाणविले की , गावाकडून आलेली शिवानी कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करत असते. सगळे बरोबरीचे , उत्साहाने एकत्र काम करणारे , अचानक शिवानी ला तिचे बॉस अरमान सर तिला केबिन मध्ये बोलावतात. ती गेल्यावर तिला विचारतात की हे बजेट कोणी तयार केले ती म्हणते मी आणि भावेश. मग बॉस म्हणतो present कोण करणार ? ती सांगते भावेश. तेव्हा अरमान सर तिला म्हणतात तू केले तर तू present कर. तू गावातून जरी आली असलीस तरी कोण काय म्हणेल याचे विचार नाही करायचे. It’s a cut throat world. Either you get right choices or you left behind. The question is what are you going to choose.
असे म्हणून शिवानी चा बॉस तिच्या बरोबर केबिन मध्ये जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक जवळीक साधतो. ती आपल्या ऑफिस मध्ये काम करते म्हणजे तिच्यावर हक्क समजून तो तिच्या मनाविरुद्ध या गोष्टी करतो.
हे मनाविरुद्ध चे झाले. तर काही पुरुष केवळ शरीराशी स्त्रीशी जवळीक साधत असतात. आणि ते झालं की मी त्यातला नाहीच असे वावरत असतात.
केवळ शरीराशी स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष कसा ओळखावा??
१. केवळ शरीराशी जवळीक साधणारा पुरुष हा भावनिक दृष्ट्या मी खरेच खूप काळजी करतो, मला खूप चिंता आहे असे केवळ गोड बोलण्यातून दर्शवितो. आणि केवळ शारीरिक जवळीक साधतो.
त्याला स्त्री च्या सुख , दुःख , त्रास , अडचणी या बरोबर काही देणे घेणे नसते. केवळ वरकरणी मी आहे काही लागले तर , आधार आहे , मला सांग. आपण मार्ग काढू पण यातून त्याची मार्ग काढण्याची किंवा खरेच कोणत्याही स्वरूपाची मदत करण्याची इच्छा नसते. केवळ त्या परिस्थिती मध्ये भावनिक जवळीक साधून, आधार देण्याचा प्रयत्न करून, कमकुवत झालेले मन हे आपला प्लस पॉइंट साधून केवळ त्यातून शारीरिक जवळीक साधली की संपले.
मग परत त्या भावना , किंवा ती मदतीची भावना , आधार कुठच्या कुठे गायब होतात. कारण हे मनातून खरेच काही करण्याची इच्छा च नसते. कोणती जबाबदारी घ्यायची ही नसते.
पुरुषांचे routine व्यवस्थित सुरू असते. लग्न झाले नसेल तर घरचे , आई वडील यांच्या करिता आणि स्वतः ची प्रगती , आर्थिक व्यवस्थापन मात्र खूप चांगले जमत असते.
याउलट विवाहित असेल तरी त्याचे त्याच्या कुटुंबा करिता कर्तुव्यपूर्ती व्यवस्थित सुरू असते. तिथं कुठेही काही कमी पडू देत नाहीत.
मात्र दुसरीकडे जिच्या सोबत केवळ शरीराने जवळीक साधत असतो तिथे मात्र काही ना काही कारणे देणे , वेळ नाही मिळाला , बघू करू , आता पैसे नाहीत , अशी कारणे देवून ती वेळ मारून नेतात. कारण मुळात काही करावे ही इच्छा ही नसते. किंवा तिच्या भावना या आतून समजून घेवून त्यात involvement नसते. मग उगीच तिला दोष दिले जातात. प्रॅक्टिकल नाही. भावनिक च असते सारखी .. आणि नंतर नंतर त्या तिच्या भावनांनी ही काही फरक पडत नाही. ती मात्र त्रास करून घेते. याच्यात तेही काही जाणवत नाही. त्याचे त्याचे आयुष्य मजेत सुरू असते.
तेव्हा ही स्त्रीला ही गोष्ट सहज जाणविते की , हा
केवळ शरीराशी स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष आहे.
२. काही ना काही कारणे काढून सतत स्त्री ला कुठे ना कुठे शारीरिक स्पर्श करणारा ,त्यातून आनंद मिळविणारा .असाही पुरुष असतो. आणि ते स्त्री ला सहज ओळखू येते. त्याचे वागणे , हावभाव , स्पर्श यातून समजते.
३. अनेकवेळा पुरुष स्त्री सोबत आधी गप्पा मधून , आवडत्या विषायमधून , मदत करून , कधी gifts देवून , बाहेर हॉटेल खाणे पिणे या गोष्टी , नंतर कधी पिकनिक यातून जवळीक साधत असतो. नंतर जसे एकमेक स्वभावाने जवळ येत जातात तसे मग शरीराने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो त्याकरिता कायम. मग एकांत ठिकाणी भेटणे , नंतर नंतर केवळ हॉटेल बुक करून किंवा कुठे अशी जागा मिळेल तिथे च एकत्र येणं असे होत जाते.
मुळात हेतू शरीराने जवळ येणे असतो पण ते एकदम न करता इतर माध्यमांचा वापर करून जवळीक साधतो.
४. ज्या पुरुषाला केवळ स्त्री चा वापर शारीरिक जवळीक करण्यापूर्ता करायचा असतो तो कधीच तिला समाजापुढे तिचे नाते घेवून मिरवत नाही. त्याला या गोष्टी लपून छपून च करायच्या असतात.जेणेकरून त्याची प्रतिमा , व्यक्तिमत्त्व हे इतरांच्या नजरेत कायम चांगलेच राहील.
मात्र त्या स्त्री ला समाजात कोणतेही स्थान मिळो ,तिचे निंदा नालस्ती होवो त्याला काही फरक पडत नाही.
शेवटी इथेही तो त्याचा विचार करतो .तिचा कुठेच नाही.
५. केवळ शरीराने स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष हा कधीच कायदेशीररीत्या त्या स्त्री ला कोणते अधिकार देत नाही. किंवा तिची जबाबदारी घेत नाही. तिच्या करिता घर , आर्थिक नियोजन , विमा , health insurance असेल किंवा इतर कोणती नैतिक जबाबदारी ही घेत नाही. इतर कोणती मदत , आजारपणात मदत ही करत नाहीत.
अगदी पुढे जावून त्यांच्या शारीरिक संबंधातून जर pregnancy वगैरे राहिली तर वेळीच ती नको म्हणून रिकामा होतो पण उपाय करणे ही जबाबदारी स्त्री ची पूर्णपणे , मुले चुकून जन्माला आली तर त्यांची जबाबदारी ही तो घेत नाही.
केवळ शरीराने स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुषांना बाकी कोणत्याही गोष्टी बरोबर देणे घेणे नसते.
६. जे पुरुष केवळ शरीराने जवळीक साधताना दिसतात ते स्त्रीचे सौंदर्य मग केवळ बाह्य सौंदर्य वाढणे याकरिता म्हणजे ते तत्कालीन स्वरूपाच्या गोष्टी आहेत. बाह्य आकर्षण आहे ते वाढावे याकरिता कधी काही किरकोळ मदत करतील , गोष्टी घेवून देतील , पण तिचे overall fitness वाढावा ,निरोगी राहावी , व्यायाम , जिम किंवा डायेट या कायमस्वरूपी गोष्टी करिता कधीच काही तजवीज करत नाहीत. त्याकरिता कोणता पुढाकार घेत नाहीत.
केवळ शरीराने स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष कसा ओळखावा तर साधे सोपे आहे तो तिची कोणतीच जबाबदारी ही कायमस्वरूपी स्वीकारत नाही. तिला समाज , नातेवाईक यांच्यात कोणता दर्जा ही मिळवून देत नाही. समाज आणि कायद्याने त्या स्त्रीला कुठे सुरक्षितता मिळवून देत नाही. तर स्वतः ही तिची प्रगती , आर्थिक स्थैर्य , आरोग्य , जबाबदाऱ्या या प्रती कोणती कर्तव्य करत नाही. केवळ गरज असेल तेव्हा शारीरिक जवळीक करणे एवढेच करतो.
७.काही लग्न झालेले पुरुष आपल्या बायको कडून मिळणाऱ्या शारीरिक सुखात आनंदी , समाधानी नसतात. काही खूप आनंदी असतील तरी अजून दुसऱ्या स्त्री कडून ही पाहिजे असते. नावीन्य पाहिजे असते. पा
तर जे बॅचलर आहेत त्यांना काही वेळेस असे आयुष्यात एखाद्या स्त्री बरोबर लग्नाआधी शारीरिक जवळीक , संबंध याचा अनुभव घ्यायचा असतो.
पण असे पुरुष आपले मत ही तेवढेच स्पष्ट सांगणारे असतात. त्यांना ते कायमस्वरूपी पाहिजे का , करायचे का हे ते स्वतः ठरवितात. आणि स्त्री ला ही तसे convience करतात. किंवा तसे स्पष्ट सांगतात.
आणि तेवढे स्पष्ट सांगणे त्यांना जमले नाही तरी स्त्रीला त्यांच्या वागण्यातून लगेच समजते. की विवाहित पुरुष हा जेव्हा बायको कडून सुख मिळते तेव्हा भेटत ही नाही. आणि जेव्हा चवीत बदल हवा तेव्हा किंवा बायको नसेल तेव्हा तिच्या सोबत जवळीक साधतो.
८.अर्थात काही स्त्रिया या आपणहून ही पुरुषांच्या सोबत जवळीक वाढवून घेणाऱ्या असतात. त्या ची कारणे अनेक असू शकतात. जसे एखादा पुरुष आवडतो , लग्न झाले असेल तरी सुखी नसते. किंवा एखादीला कर्तुत्व , हुशारी , धाडस , श्रीमंती , कला गुण आवडतात. कधी स्वभाव आवडतात.
स्त्री नेच पुरुषाची योग्य पारख करणे गरजेचे असते. परंतु बरेचदा स्त्री ही एवढी भावनिक गोष्टीत गुंतते की तिला व्यावहारिक जगाची ओळख नसते. किंवा उगीच च आशा ठेवून राहते की काही तरी मार्ग निघतील.
म्हणूनच स्त्री ने भावनिक असावे पण चौकस राहणे , व्यवहारिक राहणे , आणि वेळ प्रसंगी कठोर राहणे ही तेवढेच गरजेचे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

छान लेख आहे लेख आवडला हृदयाला भिडला पण काही बायका माहित असूनही पुढे जात राहतात
बराच भाग व्यवहार्य आहे. निव्वळ शारीरिक जवळीकीचा हव्यास ही मानसिक विकृती आहे. परंतु दोन मने एकत्र आल्यावर स्वाभाविकपणे शरीराने एकत्र येणे तो काही गुन्हा म्हणता येत नाही.
True,real fact
Very good
तिच्यासाठी तुम्ही उल्लेख केलेल्या अन् न केलेल्या सर्व गोष्टी केल्या. तरीही ती सोडुन गेली. पुरुषांबद्दल लिहिलंत चांगली गोष्टं आहे. स्त्रीबद्दलही लिहा काहीतरी.
Nicely written and explained
100% true. Ha lekh mostly 12 te 24 age group madhalya mulishi share karayla hawa. Hya saglya goshtiche knowledge asne garjeche ahe j lahan vayat samjun nahi yet.
हा लेख एककल्ली आहे फक्त पुरूषांना टारगेट केले आहे .काही पुरूषांना भावनीक नाजुक स्त्रीमैत्रीची गरज असु शकते की जी गरज मित्र नाही भागवू शकत
True aahe.mi roj hech face karte
खूपच छान डोळ्यात अंजन घालणारा. प्रत्येक स्त्री ने प्रेम डोळे बंद करून न करता.. केले पाहिजे.
Very nice thought ekdm correct
मस्त लेख आहे पण शेवटी तुम्ही स्त्री ची ही पसंदी असते तिला ही भावना असतात पण तिला काही पुरुष आवडतो च पण ती बंधनात असते