कित्येक नवरे बायकांना मोकळं का ठेवत नाही ??
सोनाली जे.
बऱ्याच बायकांना असे वाटते की आपल्याला कोणत्याच प्रकारची मोकळीक नाही. अर्थात हे जास्त करून भारतीय स्त्रीला वाटते .
नेमके होते काय बायकांना असे का वाटत नाही की त्यांना नवरे मोकळीक देत नाहीत ?
बायका या कायम इतरांशी तुलना करत असतात. मग भारतीय स्त्रिया असतील अथवा परदेशी स्त्रिया.परदेशी स्त्रिया यांच्यावर बंधने काहीच नसतात. मुळात संस्कार, मर्यादा हे दोन भाग आणि कायद्याचा आधार भारतीय स्त्रीवर बंधनकारक आहेत..
पण बरेचदा परदेशी स्त्रीचे freedom , अगदी करियर करणारी स्त्री भावनिकदृष्ट्या गुंतून न पडता लगेच तिची कामे सुरू करते. याचे आदर्श म्हणून भारतीय स्त्री बघते. पण भारतात इकडचे संस्कार , जीवनपद्धती , मुलांच्या गरजा , भावनिकदृष्ट्या गरज , स्पर्श याचा आधार , याची जाणीव असणे गरजेचे आहे. आणि मुख्य म्हणजे अगदी मुलांच्या करिता तशा advanced सोई , सुविधा इकडे उपलब्ध नाहीत.
एक मात्र आहे की त्या स्वतः ची तुलना पुरुषांच्या बरोबर कधीच करत नाहीत. तिथे मात्र आम्ही स्त्रिया नाजूक , हळव्या, इतर कर्तव्य , मर्यादा अशी कारणे पुढे येतात.
आणि खरेच कित्येक नवरे बायकांना मोकळं का ठेवत नाही ??
१. मानसिक कारणे : /. भावनिक कारणे
बरेचदा काय होते की ” Empty Mind Is Devil’s Workshop ” अशी बायकांची अवस्था होते.
भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती असल्याने पूर्वी पासून पुरुषाने कष्टाची , अर्थार्जन , बाहेरची कामे करायची . आणि स्त्री ची जबाबदारी घर , कुटुंब सांभाळणे.
पुरुषांच्या सारखे सतत स्ट्रेस, बुध्दीचे असेल अथवा शारीरिक कष्टाचे काम हे स्त्रीला करावे लागत नाही. अर्थात आता जशी प्रगती झाली तशी स्त्री ही सर्व आघाड्यांवर कार्यरत आहे.
पण पूर्वी घरकाम संपले की तसा बऱ्यापैकी दुपारी रिकामा वेळ स्त्रियांना मिळत असे. मग कधी एकमेक शेजारणी , घरातल्या स्त्रिया गप्पा मारत बसत . त्यातून एकमेकीं विषयी माहिती समजत असे. त्यातून बरेचदा हिच्या कडे हे. आहे , ते आहे. ही अशी , तशी , मग तिच्याकडे सौंदर्य , कपडे , वस्तू , घर , प्रेम करणारा , समजून घेणारा नवरा असेल , आर्थिक स्थिरता असेल , स्वतंत्र कुटुंब असेल , फ्रीडम यावरून माझ्या कडे हे नाही ते नाही अशी मानसिकता वाढत जाते.
परंतु आता स्त्री ही बरीच प्रगत झाली आहे. तरीही सगळे सांभाळून सगळ्या आघाडीवर बाजी मारायची म्हणजे तिला कोणाचा ना कोणाचा आधार हा जरुरी असतोच.
आणि जर अशी साथ लाभली नाही तर मीच सगळे करायचे. माझीच जबाबदारी. मग चिडचिड होवु लागते. घरचे असतील , मुले यांच्यावर राग निघतो. , स्ट्रेस ही जाणवितो. संपूर्ण मानसिकता बिघडते आणि अगदी लग्न का केले इथेपर्यंत बायका पोहचतात.
म्हणून नवरे शक्यतो बायकांना मोकळं ठेवत नाहीत. त्यांना जेणेकरून नवरे सोबत असतील , किंवा थोडे बंधनात ठेवणारे असतील तर भीतीने का होईना किंवा सोबत आहेत म्हणून तरी त्यांची मानसिकता सुसाट सुटणार नाही.
२. आर्थिक सत्तेवर निर्बंध :
घरी असणाऱ्या बायका या आर्थिक दृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून असतात. आणि बरेचदा त्यांना नवऱ्याच्या कष्टाची जाणीव नसते. हे घेवू ते घेवू , कपडे असो वस्तू असो किंवा इतर ही गोष्टी काळजपूर्वक आणि नीट वापरल्या , वेळीच निगा ठेवली तर टिकतात ही खूप . पण जावू दे नवीन घेवू ही मनोवृत्ती आणि मानसिकता वाढत आहे. खर्च कुठे आणि कसे करावेत . मग ती किंवा त्या वस्तू खरेच त्या किमतीच्या आणि तेवढ्या गरजेच्या आहेत का हे विचार केले जात नाहीत.
पैसे खर्चाला दिले तरी त्यातून योग्य प्रकारे बचत करून त्यातले काही योग्य ठिकाणी invest करणे बऱ्याच बायकांना माहिती नसते.
म्हणूनच पैशाची उधळपट्टी जरी नसेल तरी त्याची योग्य ठिकाणी investment करून भविष्यकालीन प्लॅन्स करणे हे पुरुषांना खूप छान जमते. आणि ती अपेक्षा बायको कडून जर नाही पूर्ण होत हे लक्षात आले तर आपोआप ते थोडे निर्बंध घालतात. आणि जास्त मोकळीक दिली तर पुरुषांची आर्थिक घडी बिघडते.
बरेचदा नोकरी करणाऱ्या ही महिला असतील तरी त्यांना पैशाची गुंतवणूक कशी करावी , मार्केट या विषयी खूप जास्त ज्ञान नसते. काही वेळेस चुकीचे निर्णय घेवून त्या स्वतः चे नुकसान करून घेतील.
दूरदृष्टी बरेचदा स्त्रियांकडे नसते. विमा , आयुर्विमा , health insurance असेल किंवा ppf या सारख्या गोष्टी माहिती नसतात . आणि बरेचदा बँक सोडून इतरत्र गुंतवणूक करण्याची रिस्क घेत नाहीत. daring ही नसते.
म्हणून ही कित्येक नवरे आर्थिकदृष्टया बायकांना मोकळीक देत नाहीत.
३. सामाजिक कारणे :
स्त्री ही एका कुटुंबाची प्रमुख घटक असते. समाज आणि इतर जवळचे लोक , नातेवाईक यांनी आपल्या बायकोला एक respect द्यावा .विशिष्ट स्थान तिचे निर्माण व्हावे. आजकाल समाजात एव्हढे काही विचित्र प्रकार घडत आहेत , छेडछाड , सोशल मीडिया यांचा गैर वापर , अगदी स्त्री ची चूक नसेल तरी तिच्यावर होणारे मानसिक आणि शारीरिक अत्याचार , या सगळ्यातून सामाजिक सुरक्षितता ही बायकोला द्यावी या हेतूने वेळेचे बंधन , रात्रीं अपरात्री घरातून बाहेर न जाण्याचे बंधन घातले जाते. किंवा कुठे जाणार , कोण आहे सोबत याची माहिती घेतली जाते. विचारपूस केली जाते.
कित्येक नवरे बायकांना मोकळं ठेवत नाहीत. बायको बद्दल खात्री असेल तरी इतर लोकांच्या बद्दल नसते. आणि प्रत्येक वेळी नवरा किंवा आप्तेष्ट वेळीच धावून जावू शकत नाहीत. किती ही झाले तरी स्त्री ला शारीरिक दृष्ट्या ही काही मर्यादा आहेत. तिची काळजी म्हणून ही असेल . किंवा इतर कोणी तिचा गैरफायदा घेवू नये म्हणून आणि काही वेळेस possessiveness ही असतो. माझी बायको .मग तिच्याकडे कोणी बघायचे ही नाही. तिने सुंदर राहायचे ते ही त्याच्या करिता केवळ. असे विचार करणारे ही काही नवरे बायकांना मोकळं ठेवत नाहीत. सतत त्यांच्या सोबत असतात.
तर समाज , पुरुष यांची जवळून पारख असल्यामुळे ही सतत नवरे बायको सोबत असतात आणि बायकांना मोकळं ठेवत नाहीत.
४. कौटुंबिक कारणे :
कुटुंबाचे ही काही नियम , मर्यादा असतात. कुटुंबाला सांभाळणे , जबाबदाऱ्या पार पाडणे , काही गोष्टी सर्वांच्या विचारानुसार , गरजेनुसार करणे महत्वाचे असते. त्यात अनेकवेळा बायको ला असे वाटते की तिचं सगळे करते एकटी . तिची भूमिका जास्त मोठी आणि महत्वाची . आणि तरी तिला काही महत्व नाही. जरी महत्व दिले तरी मग अधिकार ही सगळे मिळावेत आणि अजून जास्त अपेक्षा वाढत ही जातात. त्याला योग्य वेळी आळा घालणे गरजेचे असते. नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.
काही महत्वाचे निर्णय ही घ्यावे लागतात. अशा वेळी केवळ बायको चा विचार न करता संपूर्ण कुटुंबाचा विचार करणे गरजेचे असते. म्हणूनही
कित्येक नवरे बायकांना मोकळं ठेवत नाहीत.
आयुष्य सुंदर आहे . उगीच आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवू नका. काही वेळेस कित्येक नवरे बायकांना मोकळं ठेवत नाहीत त्यामागची कारणे समजून घ्या. काही वेळेस आपलेपणा , काळजी , आपुलकी असते, प्रेम असते आणि काही बंधने ही बायकोच्या फायद्याकरिता ही असतात.
काही वेळेस तिची प्रगती करणे हा सुधा उद्देश असतो. आणि त्या त्या वेळी ती घालणं ही गरजेचे असते. एकमेकांवर विश्वास ठेवून राहणे यासारखे सुख आणि आनंद दुसरे कोणतेही नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Very nicely presented and best wishes 👍.
👎👎👎👎👎