Skip to content

नवरा काळजी घेतो, पण प्रेम जाणवत नाही अशावेळी काय करावे ??

नवरा काळजी घेतो, पण प्रेम जाणवत नाही अशावेळी काय करावे ??


टीम आपलं मानसशास्त्र


स्त्री चे मन हे खरे तर कोणी सहज समजू शकत नाही. तिला सर्वगुणसंपन्न नवरा पाहिजे असतो. कर्तृत्ववान पाहिजे असतो. मग तो हुशार असला पाहिजे , दिसायला सुंदर असला पाहिजे, चांगली नोकरी , व्यवसाय करणारा पाहिजे. आर्थिक स्थैर्य , सामाजिक स्थैर्य , कौटुंबिक स्थैर्य देणारा पाहिजे, मनकवडा पाहिजे , भावना समजून घेणारा पाहिजे , काळजी घेणारा पाहिजे, परत आपले जरी चुकले तरी मोठ्या मनाने माफ करणारा ही पाहिजे, शिवाय प्रेम करणारा ही पाहिजे. सगळे ऐकणारा पाहिजे.

स्त्रीच्या थोडे जरी मनाविरुद्ध काही झाले तरी ती व्यक्त होते. मग चिडचिड करेल, राग राग , कधी शांत बसेल. तर कधी आवराआवरी करत बसेल तर कधी चक्क बाहेर निघून जाईल.

बरेचदा स्त्री ही तिच्या स्वप्नांच्या , अपेक्षांच्या कोशात स्वतः ला गुंडाळून घेते. प्रेम म्हणजे रोज उठून I love you म्हणणे , मी तुझ्यावर खूप प्रेम करतो , तुझ्या करिता काय करू , तुझ्याशिवाय जगू शकत नाही. असे म्हणणे किंवा सतत कुठे बाहेर फिरायला जाणे , हॉटेल , सिनेमा , पिकनिक हीच बरेचवेळा अपेक्षा किंवा स्वप्न रंजकता असते.

नवऱ्याने सतत आणि सारखे गुडी गुडी बोलायचे वागायचे. थोडे जरी मनाविरुद्ध किंवा अपेक्षे विरूद्ध नवरा वागला , भले तो कितीही काळजी घेणारा असेल तरी त्याचे मुळी प्रेम च नाही माझ्यावर असा शिक्कामोर्तब करून बायको मोकळी होते.

बरेचदा नवरा हा नकळत बायकोची खूप काळजी घेत असतो. जसे अर्थार्जन करून पुढील भविष्या करिता तरतूद करत असतो. बचत करत असतो. आयुर्विमा असेल , किंवा health insurance , savings , शेअर्स अशी गुंतवणूक आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या हिता करिता करत असतो.

घर घेतो पण त्याकरिता कर्ज , मग ते हप्ते महिन्याच्या महिन्याला फेडण्याची जा पण या गोष्टी बरेचदा बायकांना माहिती ही नसतात. नवरा काळजी घेतो, पण प्रेम जाणवत नाही अशावेळी काय करावे ??

बायकोने काय करावे ? आणि नवऱ्याने काय करावे?

१. पहिली गोष्ट नवऱ्यावर विश्वास ठेवावा.

२. नवरा आपली काळजी घेतो . घराची जबाबदारी उचलतो. दैनंदिन गरजा ही पूर्ण करतो . शिवाय कधी इतर सण वार असतील तेव्हा भेटवस्तू असतील , गोड धोड , काही जादा वस्तू आणायच्या असतील तरी तो आनंदाने घेवून येतो .सोबत येतो.

म्हणजे स्त्री ने विचार करावा की तो आपली काळजी घेतो .कुटुंबाची ही काळजी घेतो म्हणजे त्याचे आपल्यावर , कुटुंबावर प्रेम आहे म्हणूनच ना? त्यामुळे काळजी घेतो, पण प्रेम जाणवत नाही हा विचार मनातून काढून टाका.

३. काही जणांना प्रेम व्यक्त करता येते तर काहींना ते व्यक्त करता येत नाही. याउलट काळजी व्यक्त करता येते , त्याकरिता तजवीज करता येते. पण सारखे प्रेमाचे बोलणे , जवळीक , स्पर्श जमत नाहीत.

अशावेळी स्त्रियांनी समजून घेणे खूप गरजेचे असते.

४. अगदी नवरा बायको यात एकमेकांना समाधान देण्याकरिता बायकोच्या कलाने घेणारे पुरुष असतात. ते त्यांना जपत असतात. त्यांच्या भावना दुखावू नये म्हणून काळजी घेत असतात. अगदी मनाविरुद्ध शारीरिक जवळीक ही करत नाहीत. का ? कारण स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध करावे लागते असेही कुठे वाटायला नको. आणि कोणता अत्याचार झाला असेही वाटायला नको.

म्हणून ते थोडे बायकोच्या इच्छेनुसार वागतात. ते तिच्या मनाची , शरीराची काळजी च तर घेत असतात. आणि तेच तर खरे प्रेम असते ना !!

जसे गुलाबाच्या झाडाला रोज पाणी घालणारा माळी . गुलाबाचे फुल आले तर आपल्या आवडी करिता , कोणाला देण्याकरिता फुल तोडणार नक्कीच नाही. तर त्याला अजून पाणी घालून झाड आणि फुल टवटवीत ठेवेल. ते तोडून झाडाला त्रास नाही देणार . म्हणजे तो काळजी घेत असताना त्याचे झाडावर चे , फुलावरचे प्रेम तर समजते ना.

तसेच पुरुष आपल्या बायकोची मनापासून काळजी घेतो याचा अर्थ त्याचे प्रेम आहे म्हणूनच. हे प्रत्येक बायको ने समजून घेणे गरजेचे आहे.

नवरा काळजी घेतो, पण प्रेम जाणवत नाही अशावेळी पुरुषाने काय करावे ??

१. पुरुषाने बायकोला विश्वासात घेवून तीच्याकरिता , कुटुंबा करिता तो काय काय करतो , गुंतवणूक असेल , नोकरी असेल तिथले कामाचे स्वरूप असेल , बचत असेल किंवा विमा असेल ,आरोग्य विमा असेल सगळ्याची स्पष्ट कल्पना बायकोला द्यावी.

अगदी गृह कर्ज , त्याचे हप्ते , नाही भरले गेले तर होणारे परिणाम ही सांगावेत. म्हणजे दोघात एक विश्वासाचे नाते तयार होतेच शिवाय नवरा घेत असलेली काळजी आणि तो केवळ हे आपल्या प्रेमापोटी करतो याची खात्री होते.

२. कधी कधी पुरुषांनी बायकोची असलेली काळजी , प्रेम हे शब्दात व्यक्त केले पाहिजे. तर बायकोला ते जास्त विश्वास देणारे आणि सुखावणारे असते.

कधी तरी बायकोला प्रेमाची भाषा बोलून सुखावून टाकावे.

३. कधी तरी नवऱ्याने बायकोला सतत ती पुढाकार घेईल ही अपेक्षा न ठेवता स्वतः कधी तरी बोलण्यातून , संवादातून , जोक्स , विनोद बोलून मग हळू हळू पुढे यातून शारीरिक जवळीक करावी. म्हणजे नवरा काळजी ही घेतो आणि प्रेम ही करतो याची जाणीव होईल.

४. काही वेळेस नवरा कर्तव्य , जबाबदाऱ्या यात एव्हढा गुरफटून गेला असतो की त्याला वेगळे काही सुचत नाही. अशावेळी बायकोला नक्कीच वाटते की नवरा काळजी घेतो, पण प्रेम जाणवत नाही.
म्हणून बायकोच्या अपेक्षा काय , आपण कसे वागले की तिला आवडते ही मानसिकता नवऱ्याने नक्की समजून घ्यावी.

आयुष्य सुंदर आहे. सतत इतरांशी तुलना करण्यात वेळ घालवू नये. स्त्रीने इतर घरात डोकावण्यापेक्षा , neighbour’s window movie सारखे दुसऱ्यांच्या घरात डोकावून तो नवरा त्या स्त्रीची किती काळजी घेतो प्रेम करतो हे comparision टाळावे.

आपल्याकडे जे नाही यापेक्षा जे आहे त्याचा आनंद नक्की घ्यावा.
नवरा काळजी घेतो, पण प्रेम जाणवत नाही अशावेळी काय करावे ?? तर अशावेळी..

आपली प्रेमाची व्याख्या , अपेक्षा ही नवऱ्याला नक्की सांगणे गरजेचे. तेवढा मोकळेपणा ठेवावा तर प्रेमाची , आपलेपणाची ओढ अजून जास्त वाढते .


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

8 thoughts on “नवरा काळजी घेतो, पण प्रेम जाणवत नाही अशावेळी काय करावे ??”

  1. Maza navra hi asach ahe to kadhi bolun nahi dakhavt pn mazya lahan goshti pasun chi kalji to gheto …..mala hi asach gairsamaj hota to tumchyamule dur zala bahutak …kharach tumhi post Khup chan ahe

  2. Keti he chgle rahele sabhlun ghetle tari strila nav tevle jate tu tuja wishavat jagtes tula ajubajuche kon desat nahi tu mazasathi kuthe ky karte kuthe kalaji ghete kup yakve lagte

  3. आपले लेख खूप छान असतात पण मध्ये मध्ये येणाऱ्या जाहिराती खूप त्रासदायक वाटतात…

  4. He sarv asel pan navra ragishta asel lahan karanvarun bhandan karat asel shivi gal karat asel tar Kai samjave

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!