राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)
सत्र दुसरे : पॅनिक विकृती (Panic Disorder/Attack)
पॅनिक विकृती (Panic Disorder) हा चिंता विकृतीचाच एक प्रकार आहे. पॅनिक म्हणजे तीव्र आकस्मिक वाटणारी भिती होय. हे Panic Attacks अचानकपणे उद्भवतात व Attacks ची सुरुवात झाल्यापासूनच पहिल्या १० मिनिटातच लक्षणांची तीव्रता ही अतिउच्च होते. असा Attack काही क्षण, काही तास किंवा अतिशय तीव्र केसेसमध्ये काही दिवस टिकतो. Panic Attack ची लक्षणे Heart Attack किंवा अन्य काही शारीरिक आजारांसारखी वाटू शकतात, परंतु एक महत्वाची सूचना म्हणजे Panic Attack चे मुळ कोणत्याही शारीरिक आजारात नसते.
केस :
शुभांगी ही ३१ वर्षीय आणि काहीसे अशिक्षित कुटुंबामध्ये जन्माला आलेली अविवाहित तरुणी आहे. नुकतेच तिला दहाव्यांदा लग्नाची बोलणी करताना नकार सहन करावा लागलाय. ज्यावेळेस पाहुणे मंडळी एखादा साधा प्रश्न विचारत असत, तेव्हा प्रतिक्रिया देताना तत-पप होणे, बोलण्यास खुप उशीर करणे, डोळे खाली राखुनच बोलणे, घाम फूटने ई. पाहुणे मंडळीच्या निदर्शनात येताच एकतर ते नंतर सांगतो म्हणायचे किंवा स्पष्ट नकार द्यायचे, तर काही बाहेरची बाधा असल्याचे सांगायचे. अशा या बाहेरची बाधा म्हणणा-या या पाहुणे मंडळी समोरच शुभांगीला तिच्या आयुष्याचा पहिला Panic Attack आला होता. त्यानंतरच पुढे ज्या-ज्या वेळी पाहुणे मंडळी येणार हे कळताच तिच्या मनाचा गोंधळ उडायचा. कारण पुन्हा जर Attack आला तर ?, त्यांना माझ्या बाधाविषयी समजले तर ?, हे नकारात्मक खोलाचे विचार तिला त्रस्त करत असत. एकंदरीत तिने स्वीकारले होते की मला बाहेरची बाधा आहे. घरातल्या मंडळीकडून मग बाबा-बुवा असे प्रकार सुरु करण्यात आले. सततच्या नकारामुळे शुभांगीच्या मनात सर्व पुरुष मंडळीबाबत घृणा निर्माण झाली होती. आज शुभांगीने पस्तीशी गाठलीये. आजाराच्या अंध:श्रद्धेमुळे आणि अयोग्य उपचारामुळे तिच्या ठिकाणी पुरुषांबद्दलची घृणा अशा ठिकाणी येऊन पोहचली आहे की एकेकाळी वडिलांची सर्वात लाडकी शुभांगी आता वडिलांचा तिरस्कार करू लागली आहे. अशा या बाहेरची बाधा असलेल्या शुभांगीला तिच्या आजाराची खरी जाणीव कोणी करून देईल का ? आणि लग्न झाले म्हणजे मुलगी सुधारेल अशा भ्रमात असलेल्या आप्तस्वकियांना नंतर पश्चाताप होण्याअगोदरच या परिस्थितीचे आकलन होईल का ? कोण जाणे ?
लक्षणे :
१) श्वासोच्छवासास त्रास होणे, धाप लागणे, गुदमरल्यासारखे होणे.
२) भोवळ किंवा चक्कर आल्यासारखे होणे, गोंधळ
ल्यासारखे होणे.
३) कंप येणे, थरथर होणे.
४) छातीत धडधड होणे, नाडीची गती जलद होणे.
५) घशात आवळल्यासारखे होणे, मळमळणे किंवा पोटात दुखणे.
६) बधिरपणा, मुंग्या येणे, एकदम गारठल्यासारखे होणे.
७) छातीत दुखणे.
८) स्वतःपासून किंवा सभोवतालच्या वातावरणापासून अलग झाल्यासारखे वाटणे.
९) स्वतःवरील ताबा सुटण्याची, Heart Attack ची, मरणाची भिती वाटणे.
कारणे :
पॅनिक विकृतीचे मानसिक पातळीवरील कारणे पाहताना काही विशिष्ट प्रकारचे ताण या विकारास कारणीभूत असल्याचे लक्षात येते. त्यातील महत्वाची कारणे म्हणजे –
१) मनावर आघात करतील अशा घटना अनुभवने किंवा इतरांच्या बाबतीत होताना पाहणे.
२) जीवनातील मोठ्या चढ-उतारांना सामोरे जाताना प्रचंड मानसिक ताण उद्भविल्यास अशा पद्धतीचा Attack येण्याची शक्यता असते.
उदा. शिक्षण संपून नोकरीला लागणे, लग्न होणे, नोकरीत बदल होणे, राहत्या ठिकाणापासून दूर जावे लागणे, नोकरीतुन निवृत्त होणे ई. काही व्यक्तींना अशा प्रकारच्या बदलांविषयी अवाजवी भिती, चिंता असते. बदल होणार या कल्पनेनेसुद्धा काहीजण भांबावून जातात. हिच अवाजवी चिंता आणि भिती पुढे पॅनिक विकृतीला कारणीभूत ठरते.
३) या विकृतीची मुळे बालपणातील तणावपूर्ण अनुभवांमध्ये दडलेली असू शकतात. जसे आईपासून दूर जावे लागण्याची भिती ! काही व्यक्ती अशा तणावाबाबत जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे जवळच्या व्यक्तीपासून दुर जावे लागण्याची भिती पुढे जाऊन या विकृतीची कारणे बनू शकतात.
४) तसेच या विकृतीचे जैविक कारण मेंदूतील Serotonin रसायनाच्या कमतरतेशी दिसून येते आणि मेंदूतील Amygdala या भागाच्या यंत्रणेतील काही बिघाड, अनुवंशिकता, धुम्रपान, मद्यपान यासारखी व्यसनेही कारणीभुत ठरू शकतात.
उपचार :
Panic Attack ची लक्षणे ही Heart Attack च्या लक्षणांसारखी असतात. म्हणुनच केवळ लक्षणांवरून पॅनिक विकृतीचे निदान न करता योग्य तपासण्या करणे आवश्यक असते. त्यावरून जर खात्री पटली की ही लक्षणे Heart Attack किंवा इतर शारीरिक आजाराशी नसुन पॅनिक विकृतीची आहेत तेव्हा त्यावरील उपचारास सुरुवात केली जाते. जसे CBT, REBT, Dream Analysis ई. यातील काही मुद्दे म्हणजे –
१) सर्वप्रथम Panic Attack सबंधी सर्व शास्त्रोक्त माहिती त्या व्यक्तीला आणि कुटुंबाला दिली जाते.
२) या विकृतीची काय-काय लक्षणे असतात याची माहिती देऊन त्यांना प्रेरीत केले जाते.
३) Panic Attack दरम्यान श्वासोच्छवासाच्या गतीमध्ये प्रचंड वाढ होते. ही गती त्या क्षणी कशी नियंत्रणात आणायची याचे प्रशिक्षण दिले जाते
४) अशा व्यक्ती शक्यतो बाहेर आणि अनोळखी लोकांसमोर जाण्याचे टाळतात, त्यांना हळुहळु घराबाहेर पडण्यास प्रोत्साहीत केले जाते. तसेच काही औषधोपचाराचाही परिणाम होतो.
टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते
फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)
धन्यवाद !
धन्यवाद !