Skip to content

पतीला किंवा पत्नीला आपलंसं करण्याच्या काही टिप्स !!

पतीला किंवा पत्नीला आपलंसं करण्याच्या काही टिप्स !!


हर्षदा पिंपळे


पती-पत्नी म्हणजेच नवरा बायकोचं नातं हे अगदी सहज सुंदर आहे.संसाररुपी रथाची हीच दोन चाकं आहेत.संसाराचा रथ व्यवस्थित सांभाळायचा असेल तर ही दोन चाकं भक्कम असायला हवी. एकमेकांना समजून घेणारी हवी. शक्य होईल तितकी प्रामाणिक साथ देणारी हवी.

तरच संसाराचा रथ व्यवस्थित चालू शकतो. आणि हे सगळं करताना त्यात आपुलकी असणं गरजेचं आहे. एकमेकांना एकमेकांबद्दल आपलेपणा वाटणं आवश्यक आहे.पती-पत्नी हे एकमेकांसाठीच एकत्र बांधले जातात. तसा आपलेपणा असतो तिथे पण हाच आपलेपणा अजून explore करता येईल याचाही विचार एकदा जरूर करायला हवा.

एकमेकांना जितकं आपलसं करून घेता येईल, समजून घेता येईल तितकं हे नातं अधिकाधिक घनिष्ठ होत जाईल. पण अनेकदा कित्येक जोडप्यांना एकमेकांना असं आपलसं करणं वगैरे पटकन जमत नाही. मुळातच काय करू नी काय नको असा त्यांचा गोंधळ उडतो.मग असा गोंधळ उडू नये म्हणून पती-पत्नीला आपलसं करण्याच्या काही टिप्स आपण पाहूयात.

खरं तर या नात्यांना आपलसं करण्यासाठी टिप्सची वगैरे काही गरज नसतेच.मुरायची म्हंटली की ती लोणच्यासारखी सहज मुरतात. सहज आपलीशी होऊन जातात. पण तरीही या काही टिप्स…….!

१) एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेऊन त्या आवडीनिवडी शक्य होईल तितक्या पूर्ण करणे.(कुणीतरी आपली आवड पूर्ण करतं यातही एक वेगळच सुख असतं.)

२)एकमेकांना शक्य होईल तितका वेळ देणे.(वेळ दिला तर एकमेकांना जाणून घेता येईल.)

३)एकमेकांशी मोकळा संवाद साधणे.(संवादाने आयुष्य सुखकर होतं.अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं होतं.)

४)थोडं मी,थोडं तू असं करत एकमेकांना समजून घेणे.(मन स्वतःमध्येच अडकून पडत नाही.)

५)कधीतरी निवांत अशा संध्याकाळी एखादा फेरफटका मारायला तिला/त्याला घेऊन जाणे.एखादी कुल्फी/आईसक्रीम किंवा मग जे काही आवडेल त्याचा मस्त गप्पांची मैफिल रंगवत आस्वाद घेणे.(निवांतपणा गरजेचा असतो.)

६)एकमेकांच्या आवडीनिवडी जोपासने.(आवड जोपासली गेली की कोणताही मनुष्य हा सहज आनंदी होतो.)

७)घेतलेली /दिलेली वचनं प्रत्यक्ष कृतीतून निभावण्याचा प्रयत्न करणे.

८)एकमेकांच्या छोट्या छोट्या आनंदात आनंदी रहायला शिकणे.(यातच तर खरा आनंद दडलेला असतो.)

९)ऑफिसला जाताना प्रेमाने गुडबाय करणे.अर्थात.. “सावकाश जा.पोहोचला /पोहोचली की कळव.” या काही छोट्या छोट्या गोष्टींमधूनच काळजीचा सूर वाहताना दिसतो.(गोष्टी छोट्या असतात पण बरच काही सांगून जातात.)

१०)संध्याकाळी घरी आल्यानंतर “आजचा दिवस कसा होता..? काही टेन्शन नाही नं..? खूप दमछाक झाली असेल ,मी कॉफी बनवते/तो ” असं केवळ बोलण्यानेही सगळा थकवा निघून जातो.

११)पत्नीने बनवलेल्या जेवणाचं कौतुक करणे.(तुझ्या हाताला एक वेगळीच चव आहे असं बोललं तर जेवण बनवताना तिला एक वेगळाच हुरूप येतो.)

१२)कधी एखादा गजरा किंवा फूल आणून तिच्या केसात माळणे.(फुलांवर बायकांच विशेष प्रेम असतं.त्यामुळे एखादा गजरा नाहीतर फूल जरी दिलं तरी ती खूप खुश होते.)

१३)कधीतरी तिला स्वतःहून शॉपिंगला घेऊन जाणे.

१४)पतीने कधीतरी किचनची सगळी जबाबदारी स्विकारणे.(तिला तेवढाच थोडा विसावा.)

१५)छोट्या छोट्या गोष्टीच कौतुक करणे.”तु ग्रेट आहेस”असं म्हणून एखादी शाबासकी देणे.

१६)चेहऱ्यावर हसू ठेवणे.(नवऱ्याचा आनंद बायकोच्या हसण्यात असतो.त्याच्यासाठी चेहऱ्यावर नेहमी एक गोड हसू ठेवावं.)

१७)मनातील गोष्टी एकमेकांकडे शेअर करणे.(मन मोकळं होतं.मनातील अनेक गोष्टींचा निचरा होतो.)

१८)राग आल्यास मनापासून मनवायचा प्रयत्न करणे.(यातूनच प्रेम व्यक्त होत असतं.)

१९) वेळप्रसंगी सॉरी बोलणे.(मनात कटूता राहत नाही.)(गोष्टी पुढे जायला मदत होते.)

२०) सहज म्हणून एकमेकांना मनापासून थँक् यु बोलणे.(मनात एकमेकांप्रती आदरभाव निर्माण होतो.)

२१)जबाबदाऱ्या वाटून घेणे.(एकमेकांच्या भार तितकाच हलका होतो.)

या काही बेसिक टिप्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा.आपलेपणा वाढेल आणि लोणच्यासारखा मुरेलही.आपलेपणा असतोच फक्त तो मुरणं गरजेचं असतं.आणि मुरायला थोडा वेळ तर लागणारच.त्यामुळे थोडा वेळ द्यायला शिका.गोष्टी सहज आपल्याशा होतील.

सो..टिप्स आवडल्या तर शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे जर नवीन टिप्स असतील तर त्याही तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “पतीला किंवा पत्नीला आपलंसं करण्याच्या काही टिप्स !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!