योग्य जोडीदार सोबत असेल तर झोपडी सुद्धा स्वर्गासारखी वाटते.
सोनाली जे.
जोडीदार का गरज पडते हो ? आणि प्रत्येकाला काही अपेक्षा असतात , स्वप्ने असतात , आपला / आपली जोडीदार असे असावेत, तसे असावेत, असे वाटत असते.
योग्य जोडीदार सोबत असेल तर झोपडी सुद्धा स्वर्गासारखी वाटते.
कारण काय असते हो याचे ?
एकमेकांना समजून घेणारे जोडीदार . एकमेकांच्या बद्दल प्रेम , आपुलकी , ओढ , भावना असणारे जोडीदार हे कुठेही सुखी समाधानी असतात. मग राजवाडा असो , झोपडी असो किंवा निसर्ग असो, आकाशाचे छप्पर आणि जमिनीचा आसरा असेल तरी आनंदी , सुखी आणि स्वर्गीय आनंद घेणारे असतात.
रीमाचे एकत्र कुटुंब , नवरा चांगल्या हुद्द्यावर , मुले शाळेत , सासू सासरे .घर मोठे , घरात सगळ्या वस्तू . सुख नांदत होते. पण रीमा मात्र सतत कंटाळा करत असे. दोन वेळा स्वैपाक करायचा ही कंटाळा , जे असेल ते सकाळचे संध्याकाळी वाढत असे. पण घरचे वातावरण बिघडायला नको म्हणून कोणी काही बोलत नसे.
फराळाचे खूप उरले आहे , दिवाळी संपून १५ दिवस होवून गेले आता हे तसे शिळे पदार्थ कोण खाणार ? असा विचार रीमाच्या मनात येतो आणि ती जवळ असलेल्या झोपडी मध्ये जावून ते सगळे फराळाचे देण्यासाठी जाते.
कोणी आहे का अशी हाक मारल्यावर आतून आवाज येतो कोण आहे , आत या. रीमा आत जाते . बघते तर एवढीशी झोपडी पण एकदम स्वच्छ , नीट नेटके आवरलेले. खूप प्रसन्न वाटले तिला , पुढे बघितले तर चुलीजवळ एक बाई बसलेली आणि तिला एक पाय नाही तरी समोर बसलेल्या आपल्या मुलाला आणि नवऱ्याला गरम गरम भाकरी करून जेवायला वाढत होती. ते दोघेही ते गरम खाताना त्यांच्या चेह ऱ्यावर तृप्तता होती आणि ती बाई जी गरम वाढत होती तिच्या चेहऱ्यावर समाधान , प्रेम , माया , आपुलकी दिसत होती.
नवरा आणि मुलगा जेवून झाल्यावर , तिचे ही जेवण झाले आणि नवऱ्यानं तीला उचलून कॉट वर विश्रांती घेण्यासाठी उचलून ठेवले. ते बाहेर पडल्यावर ती बाई म्हणाली ताई सांगा तुमचे काय काम आहे ?
तेव्हा आधीच रीमा तिच्या कडचे आदरातिथ्य बघूनच ओशाळली होती.
तरी त्या बाईला म्हणाली की दिवाळी चे फराळाचे थोडे उरले होते ते द्यावे म्हणून आले होते. तेव्हा ती झोपडी मधली अपंग स्त्री म्हणाली ताई वाईट वाटून घेवू नका , मी हे नाही खावू शकत आणि माझ्या कुटुंबाला ही नाही देवू शकत कारण मी त्यांना दोन्ही वेळ ताजे ताजे जेवण करून वाढते. आम्ही कष्टाचे काम करणारी माणसे, शिळे पाके खात नाही. कुटुंबातल्या सगळ्यांची प्रकृती चांगली राहावी ही माझी जबाबदारी आहे. त्याकरिता मी कायम ताजे खायला करून देते. त्यात मला ही समाधान मिळते.
पण तुम्ही एवढ्या प्रेमाने आणले ते मी आमच्या इथे मागे कचऱ्या पासून गॅस निर्मिती प्लांट आहे त्यात टाकले तर चालेल का ? तेव्हा रीमा हो म्हणाली.
तिकडून घरी येतानाच ती उत्साहाने घरी येते. घर भराभर आवरून काढते. सगळ्यांच्या आवडीचे गरम गरम कुर्मा पुरी , पुलाव आणि शाही तुकडा करते. सगळ्यांना जेवायला आग्रह करून वाढते. तिच्या हातचे गरम गरम जेवण जेवून सगळे खूप तृप्त होतात. आज जरा चार घास जास्तच जेवलो अशी रवी पावती देतो.
सासू बाई ही खुश होवून तिच्यात हा बदल कसा झाला हे विचारतात तेव्हा ती सकाळची घटना सांगते.
त्या झोपडी मध्ये राहणाऱ्या बाई मुळे माझे डोळे उघडले म्हणते.
त्या बाईकडे , तिच्या झोपडी मध्ये जावून असे वाटले की
योग्य जोडीदार सोबत असेल तर झोपडी सुद्धा स्वर्गासारखी वाटते. एकमेकांची काळजी घेणारे कुटुंब , प्रेम , माया , आपुलकी , एकमेकांना समजून घेणे , अगदी बायको चा एक पाय accident मध्ये निकामी झाला तरी तिला वाऱ्यावर सोडून न देता , हिडीस फिडीस , राग राग न करता तिची काळजी घेत होता.
बायको ही आपल्या दुःखाचे चेहऱ्यावर कोणते नामो निशाण न दाखवता प्रेमाने , आणि कष्ट करावे लागत होते तरी आनंदाने सगळे करत होती. गरीबी , झोपडी , हतावरचे पोट यापेक्षा आपलीं जिवाभावाची कुटुंबीय तिला प्रिय होती.
एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेवून वागणारी , वेळप्रसंगी आधार देणारी आपली लोकं असली की गरीब श्रीमंत , घर , बंगला , झोपडी हे विचार कुठेही मनात येत नाहीत. झोपडी सुधा स्वर्गासारखी भासते. पुरुषाचे कर्तुत्व महत्वाचे असते.
तसे स्त्री ने सामंजस्य , विश्वास , आधार , आणि आनंद देणे गरजेचे असते. दोघांनी समाधानी असणे जरुरी असते. एकमेका करिता वेळ देणे , गरजा समजून घेणे जरुरी असते. शांतता आणि संयम राखणे जरुरी. एकमेकांच्या भावनिक , शारीरिक , सामाजिक गरजा समजून घेवून तासा आधार देणे जरुरी असते.
नाही तर भला मोठा बंगला आहे , मोठा व्यवसाय , घरात नवऱ्याला बोलायला वेळ नाही. घरात कोणी माणसे नाहीत. मोकळेपणे बोलायला कोणी नाही , ऐकायला कोणी नाही, श्वास गुदमरून जातो अशा वातावरणात, नाही तर ते मोठे घर खायला उठते. सगळ्या सुख सोयी बोचायला लागतात.
घर म्हणजे नुसत्या चार भिंती नसतात. तर त्या चार भिंतीमध्ये वावरणाऱ्या , काळजी घेणाऱ्या एकमेकांच्या भावना जपणाऱ्या , आग्रहाने घासातला घास देणारी आपली व्यक्ती , खंबीर आधार मग सुख असेल दुःखात एकमेकांची साथ देणारे असे कुटुंबीय महत्वाचे असतात. चार भिंतीना ही दुःख , भांडण यापेक्षा आनंदाचे हास्याचे आवाज आवडत असतात.
आवर्जुन आठवते ती कविता..
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी
या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती
आयुष्य खूप सुंदर आहे. ज्या गोष्टी नाहीत त्याची खंत करण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घ्या , मिळवा आणि इतरांना ही द्या आणि मिळवून द्या. झोपडी ला ही स्वर्ग बनविण्याची क्षमता ठेवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

सुंदर आहे खूपच
Very nice
एकदम मस्त, एकदा तरी सर्वांच्याच वाचनात यावा असा लेख आहे,