विवाहबाह्य संबंधात परस्त्री किंवा परपुरुषाला सर्व माहीत असतानाही त्यांना काय मार्गदर्शन करता येईल.
आपलं मानसशास्त्र
विवाहबाह्य संबंधात परस्त्री किंवा पर पुरुष म्हणजे नक्की कोण हा प्रश्न पडणे साहजिक आहे. यात कायदा , विवाह बंधनातून जोडले गेलेले जोडीदार सोडले तर जे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करतात ते. खरे तर प्रत्येकाचा विषय, आणि नात वेगळं असू शकत, पण परके नक्कीच नसतात, ते त्याच्या दोघांच्या दृष्टीने खुप जवळचे असू शकतात, परंतु समाज , कायदा , नातेवाईक यांच्या दृष्टीने नक्कीच ते परके च म्हणावे लागतात.
विवाहबाह्य संबंधात परस्त्री किंवा परपुरुषाला सर्व माहीत असतानाही त्यांना काय मार्गदर्शन करता येईल.
१. वेळ देताना ते जिथं राहतात त्या घरातल्या गोष्टीवर काहीवेळा प्राधान्य दयावे लागते ते समजून घेणे महत्वाचे असते. विवाहित स्त्री पुरुष यांचे स्वतः चे एक कुटुंब असते. आणि त्याकरिता त्यांना वेळ आणि प्राधान्य हे द्यावे लागतेच. आणि अशा वेळी परस्त्री आणि पर पुरुष यांनी हे समजून घेतले पाहिजे. यावर वाद विवाद घालू नयेत.
२. प्रत्येक गोष्ट विश्वासात घेऊनच करावी. बरेचवेळा विवाहबाह्य संबंधात काही किरकोळ गोष्टी असतील किंवा काही मोठ्या गोष्टी असतील तर त्या एकमेकांना विश्वासात घेवून कराव्यात. ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या एकमेकांना सांगून , स्पष्ट बोलून , विश्वासात घेवून करावी. जर दुसऱ्या कोणाकडून , बाहेरून काही गोष्टी समजल्या तर अनेक गैरसमज होतात आणि गैर समजाचे रूपांतर अविश्वास , वाद यात होते.
३. गैर समज होणार नाही याची काळजी घ्यावी आणि झालेच तर ते स्वतःहून दूर करावेतच.पुरुष खूप खोलात शिरत नाहीत. विचार आणि कृती ने ही. पण स्त्रिया खूप बारीक सारीक गोष्टी मनात धरतात. कोणत्यातरी. गोष्टी कुठे तरी जुळवतात , काही वेळेस तुलना करत राहतात त्यामुळे बरेच गैरसमज ही त्या करून घेतात. अगदी जसे मी महत्वाची नाही , पासून सगळी कर्तव्य इतरांच्या बाबत आपल्या बाबत काही नाही .असे विचार , गैरसमज वाढविण्यास मदत करतात.
तर काही वेळेस पुरुष ही अनेक गैरसमज करून घेतात. मग कधी कोणाशी बोलणे असेल . अगदी मग शेजारी पाजारी कोणा पुरुषाशी कामाचे बोलणे असेल तरी संशय , गैरसमज करून घेतात.
म्हणून दोघांनी ही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आणि तरी जर गैरसमज झालेच तर वेळेत ते स्वतः हुन दूर करावेत.
४.मर्यादा कोणत्या आहेत या आधीच बोलून क्लियर करावेत.
एकमेकांच्या नात्यात कोणत्या मर्यादा आहेत ते आधीच बोलून क्लिअर करावे. मग शारीरिक मर्यादा ही असतील जसे मुले होवू देणे किंवा होवू न देणे , वेळेच्या मर्यादा किंवा भेटण्याच्या , आर्थिक मर्यादा , कुठे काही हक्क असतील त्याच्या मर्यादा . अगदी एकत्र येण्याकरीता तात्पुरती , कायमस्वरूपी जागा. जेणेकरून नंतर अपेक्षा समजून त्यातून वाद होणार नाहीत.
५. पारदर्शकता ..बरेचवेळा खूप क्षुल्लक कारणांपासून ते मोठ्या कोणत्याही कारणाने वाद होण्याची शक्यता असते . त्यामुळे पारदर्शकता महत्वाची.
७. शक्यतो समोरच्या वर अविश्वास ठेवू नये. त्या समोरच्या व्यक्तीला ही काही मर्यादा असतात.
८. परस्त्री असो अथवा पुरुष दोघांनाही त्यांचे गुण , दोष ,माहिती असतात. पण म्हणून केवळ दोष दाखवून देवू नयेत याउलट गुणांचे कौतुक ही करावे.
९. विवाहबाह्य संबंधात परस्त्री किंवा परपुरुषाला सर्व माहीत असतानाही त्यांना काय मार्गदर्शन करता येईल ते म्हणजे सर्व काही माहीत असताना त्याच गोष्टी ची अपेक्षा ठेवू नये किंवा जे आहे त्याचा स्वीकार ते accept करावे.
१०. चांगलं आहे ते आणि जे आणि जेवढं आहे ते टिकवून ठेवण्यावर भर दिला जावा…
बरेचवेळा दोघात जे चांगले आहे ते टिकवून ठेवण्याकडे ,त्यातला आनंद मिळविण्या कडे कल नसतो पण जे नाही तेच पाहिजे हा अट्टाहास असतो. त्यातून आहे त्याची ही value राहातं नाही.
म्हणून चांगलं आहे ते आणि जे आणि जेवढं आहे ते टिकवून ठेवण्यावर भर दिला जावा.
११. काही गोष्टी जसे दोंघांच्या मधील संबंध हे सुरक्षित कसे ठेवता येतील, जी काही काळजी दोघांनी घेणे जरुरी आहे याबद्दल मार्गदर्शन नक्कीच करावे.
१२. काही वेळेस दोघांनी ही समाजा मध्ये वावरताना तिथले नियम , रीती , मर्यादा या पाळाव्यात. जेणेकरून तुमच्या नात्याचा परिणाम इतरांवर होणार नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Chaan