Skip to content

तुमचा नवरा साधेभोळेपणाचा आव आणत असेल तर ती विकृती जागीच ठेचा.

तुमचा नवरा साधेभोळेपणाचा आव आणत असेल तर ती विकृती जागीच ठेचा.


हर्षदा पिंपळे


स्वभाव…! मनुष्याचा स्वभाव हा मुळातच वेगवेगळ्या प्रकारचा असतो. आपण सहजासहजी कुणाचाही स्वभाव कसा आहे ते सांगू शकत नाही.आणि त्यात पती-पत्नी म्हणजे एक वेगळीच गोष्ट असते.अनेकदा या दोघांचे स्वभाव हे भिन्न असतात.

कुणाला नवरा अगदी साधाभोळा भेटतो तर कुणाला अगदी तापट / तिरसट बायको भेटते. तर काही बाबतीत एकदम याऊलट परिस्थिती आपल्याला पहायला मिळते. नवरा-बायकोला उरलेलं संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवायच असतं.त्यामुळे संसारात दोघांनी प्रत्येक गोष्ट सामंजस्याने घेणे आवश्यक असते. नाहीतर खटके उडायला एखादं छोटसं कारणही पुरेसं असतं. सगळच ‘made for each other’ असतच असं नाही. कितीही काहीही केलं तरी एखादा स्वभाव हा थोडाफार निराळा असतोच.तर मुळातच काहीजण स्वभावाचा, वागण्याचाही खोटा आव आणायलाही मागे पुढे पहात नाही.

आणि अनेकदा आपण अशा साध्याभोळ्या चेहऱ्याला सहजपणे भूलतो.तो म्हणेल ती पूर्वदिशा मानायला आपण तयार होतो.पण या साध्याभोळ्या चेहऱ्यामागे किती नी कोणत्या प्रकारचे मुखवटे असतात हे आपल्याला कळत नाही. ते कळायला आपल्याला अनेकदा उशीरच होतो.

आता सगळेच नवरे आणि सगळ्याच बायका ह्या काही साध्याभोळ्या असतात असं नाही. थोडक्यात सगळेच काही चांगले असतात असं नाही. आणि सगळेच वाईट असतात असही नाही. कितीतरी नवरा -बायको या गोष्टींना अपवाद आहेत. जे आहे तसं ते समोर दाखवतात. उगाचच आत एक नी बाहेर एक असं ते वागत नाहीत. पण काही असे आहेत की जे खरोखरच साधेभोळेपणाचा अक्षरशः आव आणतात.

आता खरच भोळसट असणं आणि भोळेपणाचा आव आणणं यामध्ये खूप फरक आहे.जो भोळसट असतो त्याचा फायदा घेऊन त्याला विकणारे अनेकजण असतात. आणि एक याऊलट भोळेपणाचा आव आणणारे असे असतात की सगळं करून मी काहीच केलं नाही असं म्हणून नामानिराळे व्हायचं.

ही अशी खोटी ,फसवी विकृती आहे. तिला वेळीच ठेचलं पाहिजे. अगदी विंचवाच्या नांग्या वेळीच ठेचाव्या म्हणतात तसचं…! कारण अशी विकृती त्रास देण्यापलिकडे दुसरं काहीही करू शकत नाही. स्वतःचा फायदा, स्वतःचा स्वार्थ पूर्ण करून घेऊन दुसऱ्याला त्रास कसा द्यायचा हे अशा लोकांना खूप चांगल्या प्रकारे जमतं.

आता इथे कित्येकांना वाटेल की फक्त नवरेच साधेभोळेपणाचा आव आणतात का…? बायका काय साधेभोळेपणाचा कधी आव आणतच नाहीत का…?तर असं नाही. खरतरं यापैकी दोघ्यांच्याही बाबतीत हे घडू शकतं.

अनेकदा आपण अशी उदाहरणं पाहतो. जसं की…एखादी गोष्ट तिच्या/त्याच्या हातून घडते किंवा मुद्दाम केली जाते.पण नंतर वर तोंड करून ते असही सांगतात की तुला असं वाटतयं का मी हे असं करेन….? मी तर साधं कुणाला लवकर काही बोलतही नाही… मी का असं करेन वगैरे बोलून सातत्याने आपला स्वार्थ साधून घेणारे कितीतरी नवरे आणि कितीतरी बायकाही आहेत.हे उदाहरण अगदी बेसिक झालं.

पण हा साधेभोळेपणाचा आव पैसा,प्रॉपर्टी,नाती,किंवा घरातील कोणत्याही गोष्टींमध्ये अनेकदा मोडता घालतो.अजून एक उदाहरण सांगायच झालं तर…. भाजीपाला…अनेकदा भाजीपाला आणताना दहा रूपयाची कोथिंबीर पंधरा रुपयाला मिळाली असं सांगून पाच रूपये आपल्याच खिशात टाकणारे नवरा/बायको काही कमी नाहीय. विचार करा…प्रत्येक वेळी असच होत असेल तर ते कितपत योग्य आहे….? हे केवळ छोट्या गोष्टींमध्ये घडत नाही तर कित्येक मोठमोठ्या गोष्टींमध्येही हे सर्रासपणे घडताना दिसून येतं.

सांगायचा उद्देश इतकाच की…वेळीच ही विकृती ठेचली नाही तर पुढे जाऊन गोष्टी निश्चितच अवघड होऊन बसतील यात शंका नाही.त्यामुळे साधेभोळेपणाचा आव आणणारी ही विकृती वेळीच आवरली पाहिजे. साध्याभोळ्या चेहऱ्यामागे नेमकं काही आहे की नाही हेही आपण तपासायला हवं.कारण प्रत्येक साधाभोळा चेहरा हा साधाभोळा असेलच असं नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी आढळून आल्या तर त्याला आवर घालायचा प्रयत्न करा.

नवरा-बायको असा भेदभाव न करता शेवटी एक माणूस कसा असतो हेच यातून आपण समजु शकतो.म्हणजे केवळ नवरा किंवा केवळ बायकोच साधेभोळेपणाचा आव आणते असं म्हणून चालणार नाही. दोन्हीपैकी कुणामध्येही ही विकृती असू शकते. आणि ती वेळीच ठेचायला हवी.नष्ट करायला हवी.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “तुमचा नवरा साधेभोळेपणाचा आव आणत असेल तर ती विकृती जागीच ठेचा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!