वासना खेचून घेते, तर प्रेम वाट पहायला आणि जगण्याची नवीन वाट शोधायला लावते.
मयुरी महेंद्र महाजन
प्रेम या जगातील सर्वात सुंदर भावना आहे, पण तेच प्रेम कुणासाठी कडू आठवणींचा वणवा आहे, तर तेच प्रेम कुणासाठी जगण्याची आशा आहे, जगण्याची उमेद आहे, वासना ही मनाची इच्छा आहे, तर प्रेम हे त्याचे पावित्र आहे, वासनेत माणूस फक्त शरिराकडे आकर्षित होतो,
ज्या ठिकाणी व्यक्तीच्या मनाचा आणि त्या व्यक्तीच्या भावनांचा आदर होतो, त्याठिकाणी खऱ्या अर्थाने प्रेम असते , वासना व्यक्तीला खेचून घेते ,तर प्रेम वाट पाहायला आणि जगण्याची नवीन वाट शोधायला लावते, जिथे काळजी असते सन्मान असतो, त्या ठिकाणी व्यक्तीला आपले प्रेम दाखवण्याची अजिबात गरज नसते ,
कारण प्रेम हे दाखवण्याची नाही, तर अनुभवण्याची गोष्ट आहे , वासनेला फक्त इच्छा पूर्ती व्हावी, एवढेच कळते तर प्रेमाला मानवी मनाची अवस्था मर्यादा या सर्व गोष्टींचा विचार असतो, तेथे प्रेमाला पालवी फुटते आणि जगण्याची नवीन वाट सापडते.
वयात आलेल्या कोवळ्या पाकड्यांना जेव्हा ते ज्या गोष्टीचा गोष्टीला प्रेम समजू लागतात, ते केवळ आकर्षणाला बळी पडतात, आणि उद्भवलेल्या वासनेला बाकीच्या गोष्टी शुल्लक वाटू लागतात ,असं म्हणतात की खरं प्रेम असणारे लोक निस्वार्थी असतात, प्रेमाला घेण्यापेक्षा देणे माहिती असते, ते सुद्धा कुठल्याही स्वार्था वीणा, नवऱ्याला यायला उशीर झाला, तेव्हा त्याच बरोबर फोननहीं लागेना ,
म्हणून घरी आल्यावर बायको रागवत असेलं, पण ती वाट पाहत असते, तिच्या प्रेमात काळजी चिंता आणि त्यासोबत वाट पाहत बसण्याची तिची संयमता, तसेच जगण्याची नवीन वाट आपल्याला प्रेमातूनच मिळू शकते,
आजकालच्या प्रेमाच्या संकल्पनांना थोडी का होईना, पण धूळ लागलेली बघायला मिळते ,म्हणून थोडे काही झाले लगेच रुसवे-फुगवे याही पुढे जाऊन भांडण-तंटे इतके विकोपाला जातात, की त्याचा शेवट घटस्फोट पर्यंत येऊन थांबतो ,आणि मग ज्या गोष्टीने वाद सुरू झाला होता, तसे तर त्या गोष्टीचे काही कारण नसते,
अगदी शुल्लक कारणाने वादाला दोघं बाजूने दिलेला वारा घटस्फोटापर्यंत जातो त्यामुळे प्रेमाला दुय्यम बाजू काय, पण एकमेकांप्रती प्रेम होते का ????की फक्त वासनेने दोघे एकमेकांच्या जवळ आली होती, असा प्रश्न पडतो????
समोरच्या व्यक्तीच्या चुकिवर आपण कितीही रागावलो तरी त्या व्यक्तीने आपल्याला जे प्रेम दिले आहे, त्याच हक्काने त्या व्यक्तीला माफ करणे सुद्धा गरजेचे आहे, प्रेम हे जगायला शिकवते, वासना ही आपली गरज पूर्ण करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते, फक्त निवड वासनेत असणारी लोक चांगले काय वाईट काय? काय चुकीचे, काय बरोबर, यामध्ये फरक करू शकत नाही, त्यांना फक्त आपली वासना पूर्ण होणे इतकेच कळते,
प्रेमाचा खरा दाखला आपल्याला श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेमध्ये मिळतो, भगवंताने सुद्धा प्रेम केले, प्रेमाचा खरा पुरावा आपल्याला भगवान श्री कृष्ण आणि राधा यांच्याकडून मिळतो, प्रेम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असणारी आपली तरुणाई आणि प्रेमासाठी काहीही करायला तयार असणारी आपली तरुणाई आज आपण कुठल्या तरुणाईमध्ये मोडतो, हे आपणचं ठरवलेले बरे,
कुणाच्याही प्रेमासाठी आपल्या अनमोल आयुष्याला संपवू नका, कोणी नकार दिला म्हणून आपल्या आयुष्याचा अंत करू नका, त्या प्रेमासोबत आपल्या जगण्याची एक नवीन वाट शोधा….. सोडून जाणारे खुप असतात, सोबत येणारे फार कमी असतात, त्यामुळे जगा …कुणाच्या जगण्याचा आधार व्हा….
आपल्या आयुष्याला चहूबाजूनी कसं फुलवता येईल, त्यासाठी प्रयत्न करा ,आयुष्य खूप सुंदर आहे, कोणी साथ सोडली म्हणून थांबू नका, कुठल्याही वाटेवरती आपला हात धरणारे हात सुद्धा मिळतील ,प्रवास सुरू ठेवा …जगणं आपल्याला आपली दिशा ठरवून खूप काही शिकवून जातं, शिकत राहायचं… चालत राहायचं …..बिंदास हसत राहायचं……
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

👌👌khup chan
Khup mast nehamich kahi shiknyasarkhe aste 👌🙏
अप्रतीम
👌👌👌
छान
Khup Sunder
Ur right aahe
Very nice
Better to good fantastic mind blowing
Khup Chan!
खूप छान
खूपच छान असतात तुमचे लेख मी नेहमी वाचतो
Khup chan asech lekh jivanala jaganayachi aasha detatt ….