Skip to content

जे समजून घेतं आणि समजून सांगत तेच सुंदर नातं!!

जे समजून घेतं आणि समजून सांगत तेच सुंदर नातं!!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“आज आपल्याला बरोबर नऊ वाजता रेस्टॉरंटमध्ये भेटायचं आहे. लक्षात ठेवून त्यानुसार ऑफिसमधून बाहेर पड.” कुणाल त्याच्या बायकोला म्हणजेच नेत्राला हे सर्व सांगत होता. “हो रे बाबा, मी अगदी वेळेवर येईन. त्यानुसार काम लवकर संपवेन, झालं!” असं म्हणून तिने फोन ठेवला.

गोष्ट अशी होती की ती दोघं खूप दिवसांपासून कुठे बाहेर गेली नव्हती. ना बाहेर फिरणं, ना जेवण. दोघेही आपापल्या कामात व्यस्त. त्यामुळे मुद्दाम आज कुणालने डिनर कम डेट ठरवली होती. ठरल्याप्रमाणे कुणाल रेस्टॉरंट मध्ये येण्यासाठी निघाला. त्याने नेत्राला फोन केला. ती ही थोड्या वेळात निघते म्हणाली. कुणाल रेस्टॉरंटमध्ये बरोबर नऊ वाजता आला व नेत्राची वाट पाहू लागला. तिथे झालं असं की नेत्रा निघतच होती तेवढ्यात त्यांची अर्जंट मीटिंग घेतली. त्या नादात तिला कुणालला कळवताही आलं नाही.

इथे कुणाल वाट पाहून कंटाळला. तिला सारखे फोन केले, मेसेज केले काहीच रिप्लाय येत नव्हता. एका बाजूला भिती वाटत होती की काय झालं असेल, दुसऱ्या बाजूला राग येत होता इतकं सांगूनही, ठरवूनही ती वेळेवर आली नव्हती व फोन देखील उचलला नव्हता.

बघता बघता 9:45 झाले व कुणाल निघत होता तेवढ्यात नेत्रा तिथे आली. तिला खूप उशीर झाला होता त्यामुळे ती थेट आली होती वाटेत फोन पहायचा देखील तिच्या लक्षात राहिले नाही. आल्या आल्या तिने फोन पाहिला, कॉल, मेसेज पाहिले तेव्हा त्याला सॉरी म्हणत तिने सांगायला सुरुवात केली. “मी निघत होते पण अर्जंट मीटिंग मध्ये अडकले. फोन पाहता आला नाही I’m really sorry. त्याने तिचे काही ऐकले नाही व तिथून निघाला. नेत्राही त्याच्या मागोमाग निघाली. पुर्णवेळ ती त्याला समजवायला पाहत होती पण तिच काहीच ऐकून घेत नव्हता. तिच्याकडे लक्षच देत नव्हता.

दोघे घरी आली व त्यानंतर तो बोलला. “इतका वेळ तुझी वाट पाहत होतो तुला साधा एक मेसेज देखील करता आला नाही. मला किती टेन्शन आलं होतं. तुला एकदाही वाटलं नाही समोरचा माणूस वाट पाहत आहे. आपण निदान कळवावे. का वाटेल? तुला त्याची पर्वा कुठे आहे?” तो एक सारखं बोलत होता.

नेत्रा खूप वेळेस समजावत होती तरीही तो तिचे ऐकत नव्हता त्यामुळे तेही रागावली. “तुला मी इतका वेळ समजावून सांगत आहे. तरी तू समजुनच घेत नाहीस. मला खरंच वेळ मिळाला नाही त्यासाठी मी सॉरी देखील म्हणाले. पण तुला माझ्या कामाची पण कदर नाही आणि माझी पण. तू कधीच मला समजून घेऊ नकोस.” दोघेही माघार घेत नव्हती त्यामुळे वाद अजूनच वाढला.

इथे खरं तर दोघांपैकी कोणाची चूक नव्हती. कुणालनही इतकं ठरवलेलं होतं त्यात तिने कॉल, मेसेज उचलले नव्हते त्यामुळे त्याला काळजी वाटणं स्वाभाविक होतं. नेत्रालाही खरंच वेळ मिळाला नसल्याने तिला फोन घेता आला नाही. दोन्ही गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्यावर तिच्या पद्धतीने प्रतिक्रिया देत होते, जसे वागत होते त्यातून वाद वाढत होता.

इथे कुणालने तिचं बोलणं ऐकून घेतलं असतं, तिच्या उशिरा येण्यामागची कारण शांतपणे समजून ऐकून घेतली असती कदाचित त्याचा राग शांत झाला असता. त्याने आपली काळजी नीट व्यक्त केली असती तर नेत्राला ही समजल असत. नेत्रानेही त्याच्या रागामध्ये त्याची काळजी आहे, प्रेम आहे हे लक्षात घेऊन त्याला परत एकदा नीट समजावून सांगितलं असतं तर तिला ही इतक वाईट वाटलं नसतं तिलाही राग आला नसता.

कारण शेवटी कोणतंही नातं हे बॅलन्स वर आधारलेलं असतं. आपण जर समोरच्या व्यक्तीला समजून घेतलं आणि नीट समजावून सांगितलं तर ते अजून छान सुंदर होतं. असा अनेक वेळा होतं की समोरचा माणूस आपल्याला रागाने काही बोलतो पण त्याचा उद्देश, त्याच्या मागची भावना तशी नसते. त्याच्यामागे काळजी, प्रेम असतं. कुठेतरी आपल्या व्यक्तीला काही होणार तर नाही ना अशी भीती असते त्यातून हे वागणं आलेलं असतं.

म्हणून हे वरवरचं वर्तन न बघता त्याच्या मागची भावना, उद्देश समजून घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपली बाजू नीट समजावून सांगितली पाहिजे. बरेचदा आपण defensive होतो आणि वेगळ्याच पद्धतीने सांगायला जातो. त्यातून गैरसमज होतात. आपल्याला अनेकदा चांगलं सांगायचं असतं पण आपली पद्धत चुकते. त्यातून अजून वाद होतात म्हणून सांगताना आपण त्याचा उद्देश लक्षात घेऊन बोललं पाहिजे. समोरच्याची जरी चूक झाली तरी नीट समजावलं पाहिजे.

नात्यात रुसवे-फुगवे वाद विवाद होतात. कारण दोन्ही माणसे वेगळी आहेत. पण या रुसव्या फुगव्याचा समावेश जेवणात जितका मीठ असतं तितकाच असलं पाहिजे. ते कमी असून पण चालत नाही आणि जास्त असून पण चालत नाही. कधीतरी आपण समोरच्याला माफ करावे. कधी तरी त्याने आपल्या चुका पोटात घालाव्यात आणि समजवाव असं केलं अशी चूक भूल घ्यावी द्यावी अशी वृत्ती ठेवली तर नात सुंदर होत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!