Skip to content

वायग्रा गोळी, त्याचं व्यसन आणि आपली सध्याची मानसिकता!

वायग्रा गोळी, त्याचं व्यसन आणि आपली सध्याची मानसिकता!


टीम आपलं मानसशास्त्र


परवा मेडिकल मध्ये औषधे घेत होते. आणि खरे तर इतकी गुंग होते त्यात की कोणती औषधे पाहिजे आहेत आणि किती यातच अडकले होते. आणि एकदम शेजारी एक तरुण येवून उभा राहिला तरी ही लक्ष नव्हते पण एकदम तो म्हणाला वायग्रा द्या १०० mg. दोन बॉक्स घेतले त्याने . काहीच वाटले नाही त्याला. मलाच थोडे कसेसे झाले. पण तो काही नाही बिनधास्त होता.

आजकाल तरुण पिढी अगदी सर्रास आधीन झाली आहे या वायग्रा गोळी, कोणी तरी जवळचे मित्र सांगतात त्यांचे अनुभव , सोशल मीडिया , जाहिराती इथून सतत याच्या जाहिरातींचा मारा होत असतो. आणि मग मात्र ही तरुण पिढी अगदी प्रयोगशील होते .एकदा का सुरुवातीला चांगला अनुभव आला की मग परत परत त्याची चटक लागते.

पुढे जावून आपला फिटनेस वाढविण्यापेक्षा हे आयते उपाय केले जातात. आणि बरेचदा याचे साईड इफेक्ट्स यांना तोंड द्यावे लागते.

सध्याच्या पिढीत वायग्रा गोळी घेतली की सुखाच्या परमोच्च बिंदूवर जावून पोहचतो ही एक मानसिकता झाली आहे , आणि त्याचमुळे बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. आणि मनात एकच भाव असतो की हे घेतले तरच आपल्याला सुखद अनुभव आहे. आणि परत परतचा अनुभव. कमी वेळात जास्त आनंद , सुख आणि अनुभव घेता येतात ही आजची मानसिकता.

यात पुरुष एखाद्या वेळेला अनुभव म्हणून जरी याचा उपयोग करत असेल तर आजकालच्या मुली , स्त्रिया यांना त्याचे अनुभव हवेहवेसे वाटत असतात आणि ते मुलांना , जोडीदाराला , पुरुषांना ते घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. आणि हळूहळू त्याची सवय जडते. व्यसन लागून जाते.

एखाद्या वेळी जरी वायग्रा गोळी न घेता जर सुखद अनुभव घ्यवा असे वाटत असेल तर ती मानसिकता तयारच होत नाही. आणि तसे शरीर ही साथ देत नाही. हे थोडेसे psycho somatic Disorder सारखी अवस्था होते.

वायग्रा गोळी, त्याचं व्यसन च लागले आहे आता ची पिढी असो किंवा आधीची . त्याशिवाय तृप्ती नाही . किंवा जर घेतली नाही तर आपण कमी पडू हीच मानसिकता वाढत आहे आणि आपली सध्याची मानसिकता ही खूप घातक आहे. मन आणि शरीर दोन्ही दृष्टीने दुर्बल बनवत आहेच .शिवाय विचार आणि कृती ही यात विकृती निर्माण करत आहेत.. फ्रस्ट्रेशन , डिप्रेशन , या शिवाय obsessive compulsive behaviour करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

आपल्यात काही तरी उणिवा आहेत याची चिंता भासते आणि स्ट्रेस वाढतो. आणि या उणिवा कमी करण्यासाठी म्हणून वायग्रा गोळी घेवून मानसिक समाधान मिळविले जाते. स्ट्रेस कमी केला जातो.. पण मुळात खरेच काही कमतरता आहेत का याची खात्री ही केली जात नाही. तसे वैद्यकीय सल्ला ही घेतला जात नाही. आणि त्याचमुळे अजून जास्त अज्ञान वाढत आहे. आणि कदाचित इतरांच्या अनुभव आणि त्याचे अनुकरण करून अंध विश्वास ही ठेवला जात आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. क्षमता वेगळ्या असतात याचा कुठेच विचार केला जात नाही.

शिवाय आजकाल वायग्रा गोळी घेणे हे पुरुषार्थ समजले जाते. त्याचे लक्षण मानले जात आहे.

साधे सोपे जीवन जगणे विसरून च गेले आहेत लोक. आपल्या स्वतः ला , क्षमताना समजून घेतले जात नाही. आणि त्या वाढविण्यासाठी इतर कोणते फिटनेस मार्ग असतील , योगा , डाएट असेल , meditation असेल , पौष्टीक खाणे पिणे असेल , औषधोपचार असतील , वैद्यकीय सल्ला असेल यांचे विचार केले जात नाहीत. पूर्वीचे घरगुती उपाय असतील याकडे दुर्लक्ष केले जाते.

तरुण पिढी तर इतक्या सहज एकमेकांना काय रे तू try केले नाहीस का .? फारच मागास आहेस. अशा reactions असतात. त्यात त्यांना भूषण वाटते..

वायग्रा गोळी एकदा तरी घेवून बघूच. काय अनुभव येतो बघू म्हणून घेणारे ही आहेत. पण मघळूहळू ते रूपांतर त्याचं व्यसन होण्यात होते . आणि आपली सध्याची मानसिकता ही आपण सुदृढ असावे आणि त्यातून अपेक्षा , इच्छा पूर्ण व्हाव्यात यापेक्षा इन्स्टंट गोष्टींकडे सहज आकर्षित होते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “वायग्रा गोळी, त्याचं व्यसन आणि आपली सध्याची मानसिकता!”

  1. MAHITI KHUP CHHAN AAHE..PAN..LOKANCHI DEMAND CHE RUPANTAR HABIT MADHE HOT AAHE.. IT’S WESTERN CULTURE

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!