पुरुषांना वयाने मोठया असणाऱ्या महिला आवडण्याचं मानसशास्त्र काय ??
सोनाली जे
प्रेम हे ठरवून कधीच होत नसते. किंवा आकर्षण एखादी स्त्री किंवा पुरुष आवडणे हे ही ठरवून होत नाही.
प्रेमात वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. तुमच्या आसपासच्या अनेक उदाहरणातून ते स्पष्टही झाले असेल, जाणवले असेल. पूर्वी पत्नीही पतीपेक्षा काही वर्षांनी लहान असावी असे पुरुषांना वाटावे. आणि तसाच सामाजिक विचारही होता. त्याला समाजमान्यता होती. पण काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या. त्यातील एक म्हणजे पुरुषांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिला अधिक आवडू लागल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर सचिन तेंडुलकर यांनी ही त्यांच्या पेक्षा वयाने जास्त असलेल्या डॉक्टर अंजली यांच्या बरोबर लग्न केले.
तसेच आहे ऑफिस असो , कार्यक्षेत्र असो किंवा इतर ठिकाणी ही पुरुषांना वयाने मोठया असणाऱ्या महिला आवडतात कारण त्यांचा अनुभव , जिद्द , सातत्य या गोष्टी भावतात.
वयाने मोठ्या महिलांकडे आकर्षित होण्याचा पुरुषांचा वाढता कल पाहता यामागचे नेमके कारण काय असावे? असे प्रश्न सामान्यांना पडतात.
कोणत्या गोष्टींमुळे पुरुष आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलांकडे अधिक आकर्षित होतात.??
पुरुषांना वयाने मोठया असणाऱ्या महिला आवडण्याचं मानसशास्त्र काय ??
१. स्वावलंबी : वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रिया या स्वावलंबी असतात. मुलांना , पुरुषांना स्वावलंबी स्त्रिया आवडतात. कारण त्या कोणावरही अवलंबून नसतात. प्रसंगी स्वतः धडपड करून मार्ग शोधणाऱ्या असतात. Active असतात. या व्यतिरिक्त स्वावलंबी स्त्री चा खर्च ही पुरुषांना उचलावा लागत नाही.
२. Mature जोडीदार / जबाबदार जोडीदार – प्रत्येक पुरुषाला बायको ही किंवा स्त्री ही जबाबदार असावी असे वाटते. घरातील आणि घराबाहेरील कामात ही ती तत्पर असते. तरबेज असते. स्मार्ट असते. सर्व जबाबदाऱ्या उत्कृष्ट रीतीने पार पाडते.
३. आत्मविश्वास – वयाने मोठ्या असणाऱ्या महिला त्यांच्या मध्ये बरे वाईट अनुभव आलेले असतात. आणि या अनुभवातून त्यांच्यात आत्मविश्वास वाढलेला असतो. आणि हा अनुभव स्त्री पुरुष या नात्यात , काम असेल कामात , संसारात तो उपयोगी पडतो. आणि हाच अनुभव कामाच्या ठिकाणी किंवा संसार दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी उपयोगी पडतो.
४. शहाणपण आणि प्रामाणिकपणा – वयानुसार आलेले शहाणपण यातून कर्तव्याच्या बाबतीत वयाने मोठ्या असलेल्या स्त्रिया या जास्त प्रामाणिक असतात. कर्तव्यनिष्ठ असतात. एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण करण्याची जिद्द असते. तेवढे पेशंन्स असतात.
५. भावनिक balance , आधार – वयाने मोठ्या असलेल्या महिला यांनी आयुष्यात अनेक चढ उतार बघितले असतात. अनेक phase मधून त्या गेलेल्या असतात. त्यामुळे त्या त्या वेळी त्या भावनिकदृष्ट्या balance आणि खंबीर बनत गेल्या असतात. आणि त्या इतरांनाही वेळ प्रसंगी खंबीर भावनिक आधार देवू शकतात. याउलट पुरुषापेक्षा वयाने कमी असणाऱ्या स्त्रिया या भावनिक दृष्ट्या तेवढ्या balance नसतात त्यामुळे त्या इतरांना तसा आधार देवू शकत नाहीत किंवा कमी पडतात.
६. आकर्षक राहणीमान – वयाने जास्त असलेल्या स्त्रिया या स्वतः ला कसे आकर्षित ठेवता येतील याचे प्रयत्न ही करतात. जसे पेहराव असेल , साडी जरी असेल तरी matching किंवा त्यावर शोभेसे कॉन्ट्रास्ट blouse असेल , केशभूषा , मेकअप यात प्रगल्भता आलेली असते. आपल्याला काय शोभेल याची खात्री आलेली असते. त्यातून टापटीप राहणीमान हे जास्त आकर्षित करते.
७. वयाने जास्त असलेल्या महिला कुटुंब , संस्था , ऑफिस, मुले यांची जास्त चांगल्या प्रकारे काळजी घेवू शकतात.
८. शारीरिक संबंध असतील किंवा वैयक्तिक संबंध असतील , किंवा कार्यालयीन संबंध हे वयोमानानुसार त्यात ही प्रगल्भता येत जाते. त्यामुळे त्यात आपलेपणा , ओढ , आकर्षण , सातत्य , नियमितता , हुशारी , चुणचुणीत पणा दिसून येतो . हावभाव , हालचाली या गोष्टी पुरुषांना जास्त भावतात.
९. समजूतदारपणा – गोष्टी कोणत्याही थराला जावू देत. मग संसार असो , नाती असोत किंवा व्यवसायिक पातळी , ऑफिस मध्ये कोठेही असो थोड्या वाढत्या वयानुसार वयाला शोभेल असा समजूतदारपणा आलेला असतो.
अशा अनेक कारण म्हणा किंवा त्यामागचे मानसशास्त्र हे पुरुषांना वयाने मोठया असणाऱ्या महिला आवडण्यास भाग पडते.
गुण – अवगुण प्रत्येकात असतात. सर्वगुण संपन्न कोणीच नसते. पण दोष जरी असतील तरी ते स्वीकारण्याची धमक , हिमंत ही या वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांमध्ये आलेली असते. आणि argument न करता , negative दृष्ट्या त्या गोष्टी न घेता , सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दोष हे स्वीकारून त्यात बदल घडवून आणण्याची क्षमता ही असते. Flexibility असते. आणि गुण तर सर्व दृष्टीने , प्रगती करिता फायदेशीर च ठरतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप छान