Skip to content

लग्नाआधी बेडवर घालवलेला वेळ हा नंतरच्या समाधानी आयुष्याची पूर्वतयारी असू शकते का?

लग्नाआधी बेडवर घालवलेला वेळ हा नंतरच्या समाधानी आयुष्याची पूर्वतयारी असू शकते का?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


जेव्हा दोन व्यक्ती मध्ये प्रेमाचं नातं तयार होतं तेव्हा ती दोघं एकत्र येतात. त्यांच्यामध्ये जवळीक वाढते. आपल्याकडे पूर्वीच्या काळी love marriage किंवा आधीच एखाद्या नात्यात असण खूप कमी होत. जास्त प्रमाणात अरेंज मॅरेज होत होते जी अजूनही काही भागात चालत आहेत.

पण अलीकडच्या काळात रिलेशनशिप खूप लवकर सुरू होतात. लग्नाच्या आधी पण अनेक जण खूप वर्ष रिलेशनमध्ये असतात. ज्यात आता लिव्ह इन रिलेशनशिप हेही आल आहे. ज्यामध्ये दोघे एकत्र राहत असतात फक्त लग्न झालेलं नसत.

जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात प्रेम, आदर, विश्वास या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. या सर्व गोष्टी त्यांना मनाने जवळ आणतात. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे जी यामध्ये येते ती म्हणजे शारीरिक जवळीकता म्हणजेच लैंगिक सुख.

वैवाहिक जीवनामध्ये लैंगिक इच्छा पूर्ती होण्याला पण महत्त्व आहे. या मुळे दोघांमध्ये अजून प्रेम निर्माण होतं प्रेमाची भावना निर्माण होते. दोघे एकमेकांच्या जवळ येतात. म्हणूनच बऱ्याच नात्यांमध्ये दुरावा येण्याचे कारण हे लैंगिक सुखाची अपूर्णता हे ही असतं. बऱ्याच जोडप्यांच्या असमाधानी विवाह जीवनामधलं हे एक कारण असत. कारण शारीरिक संबंध हे फक्त प्रजोत्पादन मध्ये मुख्य भूमिका निभावत नसून यातून ताण कमी होण, सुख, नात्यामध्ये अजून दृढता येते. त्यामुळे लैंगिक सुखाला वैवाहिक जीवनात महत्त्व आहे. पण आधीच्या काळात हे सर्व लग्नानंतर होतं. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे अनैतिक चुकीच मानलं जायचं.

परंतु आता हे चित्र बदलताना दिसतं. बरीच जण जी एका नात्यामध्ये असतात, अगदी ज्याला आपण सिरीयस रिलेशनशिप म्हणतो त्यामध्ये असतात त्यांच्या मध्ये शारीरिक संबंध हे असतात. कारण त्यांना एक्स्प्रेशन ऑफ लव्ह वाटत असतं. यातून त्यांचं नातं अधिक घट्ट होत असत. जसं आधी म्हटलं वैवाहिक जीवनात याला पण महत्व आहे.

यातही जोडप्याच समाधान असतं. त्यामुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंध असणे म्हणजे लग्नानंतर आपल्या जीवनात समाधान असणार आहे ही गोष्ट आपल्या नंतरच्या आयुष्यात समाधानात भर टाकू शकते असं वाटण्याची शक्यता असते. कारण हे जवळीकतेच प्रेमाचं प्रतीक असत.

पण लग्नाआधीच्या नात्यात बराच वेळा बऱ्याच अंशी infatuation चापण भाग असतो. ज्यामध्ये व्यक्तीच्या न पटणाऱ्या गोष्टी पण आवडत असतात, त्यांच्या चुकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं, तसंच जे चांगल आहे त्यांना अजून वाढवलं जातं. त्यामुळे जवळीक वाढत असेल तर यात काही आश्चर्य नाही. पण खर्‍या समस्या लग्नानंतर सुरू होतात.

हळू हळू आवडणाऱ्या गोष्टी पण न आवडणे चुका जास्त दिसणे, आदर, विश्वास कमी होणे हे असं उलट चक्र सुरु होत आणि जी गोष्ट म्हणजे शारीरिक जवळीकता जी नंतरच्या आयुष्यात समाधान टाकू शकते त्याची पूर्वतयारी म्हणून कुठेतरी त्याला बघितलं जातं ती ही गोष्ट गैरसमज निर्माण करते.

म्हणून जर लग्नानंतरच्या आयुष्यात समाधान हव असेल त्याची पूर्वतयारी करायची असेल तर फक्त शारीरिक जवळीकता असून चालत नाही तर त्या माणसाला आहे तसं स्वीकारणं, त्याच्या चुकांना पण त्याच्या चांगल्या गोष्टींनापण डोळसपणे बघता येणे हे सर्व पण महत्त्वाच आहे आदर महत्त्वाचा आहे त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे सर्व पैलू लग्नानंतर पण टिकवणे. त्यातून खऱ्या अर्थाने पुढचं जीवन समाधानी होऊ शकत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “लग्नाआधी बेडवर घालवलेला वेळ हा नंतरच्या समाधानी आयुष्याची पूर्वतयारी असू शकते का?”

  1. Nivrutti Madane

    जोडीदार तोच राहिला तरच लग्नाच्या पूर्वी केलेल्या शारिरीक संबंधात समाधान राहिल जर जोडीदार दुसरा असेल तर त्यात दुरावा निर्माण होण्याची भीती वाटते !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!