सतत एकमेकांना चिकटल्याने परस्पर आकर्षण कमी होते का???
मयुरी महेंद्र महाजन
तसं पाहिलं तर विषय खूप नाजूक आहे ,परंतु तितकाच तो मानवी जीवनाला सुसंगतही आहेचं, मानवी जीवनालाचं कशाला आता सजीव व प्राणिमात्र जीवजंतू सर्व सजीव सृष्टीत हा नियम लागू असलेला बघायला मिळतो, परंतु एकमेकांबद्दल वाटणारे आकर्षण या विषयावरती फार असे उघडपणे कुठेच बोलले जात नाही, त्यामुळे त्या विषयावरचे परिपूर्ण व नेमके ज्ञान नसल्याने त्याविषयी फक्त अंदाज वर्तवले जातात ,आणि बऱ्याच लोकांची नैतिक मूल्य त्यांना या गोष्टीपासून एक तर परावृत्त करते,किंवा उत्पन्न होणारी ईच्छा चुकीची आहे, असा गैरसमज मनात घट्ट होत जातो ,काही स्तरावरती लोकांना हा विषय लाजिरवाणा आणि शरमेची बाब वाटते.
एक छोटसं ऊदाहरण बघुया, त्यामुळे विषय समजायला सोपे जाईलं,बघा बर्याचं लोकांना लहान मुलाला जवळ घेऊन त्याला किस करणे, त्याला मिठीत घेऊन हक करणे, खूप आवडते. परंतु काही व्यक्तीच्या य या परीक्षकोषामध्ये काही व्यक्ती या हीच कृती वारंवार करतानां दिसतात, त्या लहान मुलाचे निरीक्षण करा, बघा ते खूप चिडलेले असते,
काही वेळेस ती व्यक्ती दुरून जरी दिसली ना तरी ते कुठेतरी लपून राहते, किंवा त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते ,त्या मुलाला शब्दात जरी त्या गोष्टी सांगता येत नसल्या, तरी त्याला ती कृती आणि स्पर्शाचे ज्ञान हे जन्मतःच लाभलेले असते .
खूप छान वाक्य आहे, नेमकी कोणी मांडली माहिती नाही, पण असं म्हटलं जातं, की आपण एखाद्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलात तरं ती व्यक्ती तितकीचं लांब जाते, आणि आपण एखाद्याच्या जितक्या लांब जाण्याचा प्रयत्न करणारं ती व्यक्ती तितकीचं जवळ येते,
शारीरिक संबंधाच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ येणे ,ही शरमेची बाब म्हणण्यापेक्षा ती मानवी मनाची एक गरज आहे, आणि त्या गरजेला शास्त्रज्ञांनी लैंगिक गरज असे म्हटले आहे, विषय नाजूक असला तरी तो प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे, सतत एकमेकांना चिकटने परस्पर आकर्षण कमी होते का???या ठिकाणी आकर्षण तरं कमी होतेचं, परंतु परस्परांबद्दल बद्दलचे प्रेमही कमी होत जाते, कारण की प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा आहेत,
प्रत्येक गोष्टीचा काहीतरी वेळ काळ ठरलेला आहे, तसेच त्या प्रत्येक नात्याची चौकट ठरलेली आहे, त्या चौकटीत राहून स्थळ काळाप्रमाणे जर आपण नात्याला नात्याच्या त्या रोपट्याला रोज थोडे थोडे पाणी टाकत राहिलो, तर ते रोपटे नेहमी हिरवेगार राहील, यात शंका नाही,
मानवी मनाचा जर आपण विचार केला ,तर जोपर्यंत मिळवण्याची तयारी असते तोपर्यंत उत्साह मी जोरात असतो ,एकदाची का वस्तू किंवा व्यक्ती मिळाली की असलेल्या अमुल्य गोष्टीकडेही दुर्लक्ष होताना दिसते,आकर्षणाचा नियम हेचं सांगतो ,”अगर किसी चीज को शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है””
या जगात जर खरंच कुठली गोष्ट सर्वात भारी असेल तर हीच असू शकते की एखाद्या व्यक्तीच्या मनात आपली जागा निर्माण करणे, एखाद्याच्या मनात घर करणे,प्रेमाला लोकांनी भरपूर रूपक दिलेली आहेत, परंतु त्याचं निस्वार्थ प्रेमाने त्या भावनेने, डोळ्यात अश्रू आलेत तर त्याच्या इतकं सुंदर या जगात काहीच नाही .
दोन व्यक्ती एकत्र येतात, त्यात शरीरबंध तर असतातचं, परंतु असा स्पर्श करा, ज्याने जखम होणार नाही, कारण प्रेम हेचं शिकवते की, समोरच्या व्यक्तीच्या आनंदाची जबाबदारी आता माझी आहे, घेण्यापेक्षा देण्याकडे असलेला कल माणसाला प्रेमाची भाषा शिकवते, फक्त आणि फक्त गरजेपोटी म्हणून प्रेम निभवूचं नका ,उपभोगाच्या अपेक्षेने जर आपण कुणाला जवळ घेत असू, तर तो निव्वळ स्वार्थ समजावा, कारण प्रेम देण्याची व मनाची भाषा आहे,
जर नात्यातला जिवंतपणा नेहमी टवटवीत असावा, असे वाटत असेल तरं नात्याची ती वीण तितकीच घट्ट करायला शिकायला हवं,एखाद्या गोष्टीचा सतत प्रतिकार होत असल्याने त्या विषयाची गोडी कमी कमी होत जाते, किंवा संपायला लागते, इतकेच काय नको त्या गोष्टींचे गैरसमज, व संशयाने उद्भवलेल्या भिवना माणसाच्या प्रेम नात्या पोखरायला सुरुवात करतात, परस्परांबद्दल जर आपण सन्मान, आदर, विश्वास आणि त्याला अनुरूप असे वर्तन असेल, तर नात्याला खरं स्वरूप प्राप्त होत असते,
एकमेकांशी ओढ कायम राहते ,माणूस एकच असला, तरी विचारधारा मात्र अनेक आहेत ,त्यामुळे आपली बाजू मांडताना समोरच्या व्यक्तीने मांडलेल्या बाजूला समजून घेणे, महत्त्वाचे आहे ,नाती जपायला हवीत, कारण ती खूप नशीबाने मिळतात…!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

छान
Mast mahiti sangitli
Khup chhan mahiti dili.pan mla ek sangav vattay ki jodidarachya asne ha suddha premacha bhag aahe mag doghanna jar ekmekanchi sobat everyone havi havishi vatat asel tar Ka rahu naye.