Skip to content

सत्र पाचवे :- अनिवार्य चोरी करणे (Kleptomania)

राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ,
करीअर समुपदेशक)


सत्र पाचवे :- अनिवार्य चोरी करणे (Kleptomania)


या विकृतीने पीडित असणाऱ्या व्यक्तींना वस्तू जमवण्याची, साठवण्याची तिव्र इच्छा असते. अशा व्यक्तींना वस्तू चोरण्याच्या विचारांमध्ये नियंत्रण ठेवता येत नाही. तसेच त्यांनी चोरी केलेल्या वस्तू या मौल्यवानच असतात असे नाही. पेपर, क्लिप्स, पेन, चिकटपट्टी, चमचे, छोटी खेळणी, आयलाईनर, औषधे ई. सारख्या किरकोळ वस्तू या व्यक्ती चोरताना दिसतात. जर वस्तू चोरली गेली नाही, तर त्यांना अस्वस्थ वाटते. तो अस्वस्थपणा दूर करण्यासाठीच ते वस्तू चोरताना दिसतात.


केस :
मिलिंद काका सहसा कोणालाही घरी बोलावत नसत. चुकून कोणी घरी आले कि त्यांना लगेचच हाथ पकडून बाहेर घेऊन जात असत. त्यांच्या या अशा वागण्यामुळे त्यांच्या घरीही सहसा कोणी येतसे. परंतु जेव्हा त्यांना अस्वस्थ वाटे तेव्हा मात्र ते घराच्या बाहेर पडे आणि दिसेल ती वस्तू खिशात, बॅगेत लपवून ठेवत असत. या अशा अनिवार्य चोरीमुळे कित्येकदा त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते, पण किरकोळ चोरीमुळे त्यांना पोलिसही काही वेळानंतर सोडून देत होते. परंतु तरीही त्यांचा अस्वस्थपणा काही दूर होईना. एके दिवशी तर चोरीच्या आरोपाखाली शेजाऱ्यांनी त्यांच्या संपूर्ण घराची छाननी केली. त्यावेळी शेजारच्यांना अनेक आपल्या जुनाट वस्तू एका बंद खोलीत, कपाटात लपविलेल्या आढळल्या. त्याक्षणी संपूर्ण सोसायटीने त्यांना अजामिनावर अटक करण्यास पोलिसांना भाग पाडले. आज ६ महिन्यापासून मिलिंद काका जेलमध्ये आहेत. त्यांचा अस्वस्थपणा चौपट वाढलेला आहे. अशा या मिलिंद काकाच्या ठिकाणी असणारी अनिवार्य चोरी हि सामान्य नसून त्यांना मानसिक आधाराची आणि एका मानसशास्त्रज्ञाची गरज आहे, हे आजूबाजूची मंडळी आणि पोलिस स्वीकारतील का ? कोण जाने ?


लक्षणे :
१)  इतर सामान्य चोर आणि या विकृतीने ग्रस्त व्यक्ती या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. 
२) सहसा चोर हे चोरी करतात त्यातून मिळणाऱ्या पैशांसाठी किंवा अन्यप्रकारे होणाऱ्या लाभासाठी. शिवाय अशा चोऱ्या बरेचदा पूर्वनियोजित असतात. परंतु या विकृतीने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना हे मुद्दे लागू होत नाहीत.
३) या विकृतीने ग्रस्त व्यक्ती चोरी करताना त्यामागे आर्थिक मूल्ये आणि इतर फायदे यांचा विचार करत नाही, तसेच ठरवून चोरी करीत नाहीत.
) अशा व्यक्ती स्वतःच्या इच्छांवर आणि भावनेवर ताबा ठेवू शकत नाहीत.
५) त्यांच्या मार्गावर जर कोणी अडथळा आणल्यास ते त्यांच्यावर संतापतात आणि अधिक आक्रमकपणे चोरी करतात.


कारणे :
१) या आजाराची सुरुवात सर्वसाधारणपणे पौगंडावस्थेत होताना आढळते.
२) अति लाड, अति सुरक्षित वातावरण तसेच बालवयात प्रत्येकवेळी मागितले ते मिळत जाणे, हे या आजाराचे महत्वाचे परिस्थितीय कारण आहे. 
३) अनुवंशिकतेमार्फत  हा आजार अपत्यामध्ये येऊ शकतो. 
४) पाहिजे असणाऱ्या वास्तूबद्दल नाही ऐकायची सवय नसल्याने, कोणालाही न विचारता ती लपून किंवा हिसकावून घेण्याची वृत्ती हि त्यांच्यात वाढते.
५) तसेच मेंदूतील रसायनांमध्ये असमतोल निर्माण झाल्यामुळे हा आजार उद्दिपित होतो.


उपचार :
१) या विकृतीसोबतच त्यांना इतरही मानसिक आजार होण्याची शक्यता असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची उपचार तंत्रे वापरली जातात.
२) त्यांच्या वैचारिक भावनांमध्ये दोष असल्यामुळे CBT ही थेरपी अत्यंत उपयुक्त ठरते. 
३) काही औषधोपचारांचाही परिणाम उपयोगी ठरतो.
४) एखादी किरकोळ वस्तू आपल्याकडे असणे कितपत आवश्यक आहे, याबद्दल काही तार्किक गोष्टींचे संस्कार केले जातात
५) ज्याक्षणी वस्तू चोरण्यासंबंधी अस्वस्थता निर्माण होते, त्यावेळी मनावर ताबा कसा मिळवायचा याचे प्रशिक्षण दिले जाते.


टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते

फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)
धन्यवाद !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!