Skip to content

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये खरंच आपण समाधानी आयुष्य जगू शकू का ?

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये खरंच आपण समाधानी आयुष्य जगू शकू का ?


टीम आपलं मानसशास्त्र


पूर्वीचे विवाह बंधन , एकत्र कुटुंब पद्धती , मग विभक्त कुटुंब पद्धती यात बदल घडत गेले.

थोड्या सुधारणा होत गेली..स्वातंत्र्य वाढू लागले…विचारसरणी मध्ये फरक पडत गेले…स्वतः ची ठाम मते तयार होत गेली ..आणि मग मुलांना ही सगळ्या गोष्टींचे freedom मिळत गेले..नव्या युगातल्या नव्या शैक्षणिक पद्धती…को.एड.शाळा जसे मुले मुली एकत्र ..त्यातून मैत्री मधील लिंग भेद मागे पडत गेले…आधुनिक तंत्रज्ञानामुळे विकास होत गेला…खूप अंतर असणारे ही जवळ येत गेले…शिक्षण असेल काम असेल किंवा इतर गोष्टींमुळे त्यांच्यात प्रेम .शारीरिक आकर्षण .लग्न या गोष्टी घडत गेल्या..

यापेक्षा पुढे जावून मुला मुलींना असे वाटू लागले की आपण थोडा वेळ जास्त एकमेकांच्या सहवासात राहून मग आयुष्याचे निर्णय घेतले पाहिजेत …यातून लिव्ह इन रिलेशनशिप ची कॉन्सेप्ट आली…सुरुवातीला च यात स्पष्ट की पटले तर राहू नाही तर सोडू ..दुसरे बघू…यात त्यांना गैर असे काहीच वाटत नाही…कारण एकमेकांविषयी माहिती होणे..एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेणे, एकमेकांची वैचारिक पातळी समजून घेणे, एकमेक आनंदी राहू शकतात का ? का वाद होतात ?

किंवा अगदी पुढे जावून एकमेक शारीरिक सुख ..मानसिक सुख देवू शकतात का?? समाधान , शांतता मिळते का ? शिवाय सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्थिक भार कितीपत घेवू शकतात या सगळ्याची ही परीक्षाच म्हणा ना …ती या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये घेतली जाते…उत्तीर्ण झाले तर पुढे जावून लग्नात ही रूपांतर होते ..किंवा लग्नाच्या बंधनात अडकत घर मुले ही जबाबदारी ही स्वीकारायची नसते…दोघांचे mutually decision झाले असतात…त्याप्रमाणे ते एकमेकांना स्पेस देवून एकत्र राहतात..त्यात यांना आनंद ही मिळतो आणि कोणी कोणावर जबरदस्ती नाते नाही लादत…किंवा possessiveness नाही वाढत…माझा अधिकार ..ती माझीच ..तो माझाच हे अहंकार ही जोपासले जात नाहीत…

लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये खरंच आपण समाधानी आयुष्य जगू शकू का ? आता थोडे वेगळे विचार करू जर लिव्ह इन िलेशनशिपमध्ये एकमेकांचे नाहीच जुळले, पटले तर दोघेही नवीन जोडीदार शोधायला मोकळे…कोणी आयुष्यभर मन मारून , adjustment करून एकाच जोडीदारासोबत इच्छेविरुद्ध राहण्याची गरज नाही…

तसेच घरच्यांची बंधने..जसे सून..जावई म्हणून मर्यादा असेच आदर्श वागल पाहिजे तसेच वागल पाहिजे…ऑफिस मध्ये उशीर का झाला? मित्र मैत्रिणी ना का भेटतात? किंवा इतर अनेक गोष्टी जाब विचारणे जसे आताच्या या फास्ट लाईफ मध्ये बरेचवेळा कामानिमित्त बाहेर राहावे लागते…मित्र मैत्रिणी…ऑफिस मधले सहचारी यांच्या सोबत काम करावे लागते..बाहेर जावे लागते…त्यातून पूर्वीच्या लोकांची विचारसरणी जर मर्यादित असेल तर घरच्यांचे त्रासच होत ..

या गोष्टी आणि स्वतः चे आनंद ..स्पेस ..freedom.. आपल्या शिक्षणाचा योग्य वापर ..नोकरी यात वेळ घालवीत असता केवळ आपल्या जोडीदाराला ही वेळ , आवडी निवडी जपता येत असतील , शारीरिक मानसिक गरजा ही परिपूर्ण होत असतील , एकमेकांना आनंदी आयुष्य देता येत असेल तर लग्नाचे बंधन नको असेच वाटते …त्यात मूल होणे न होणे हे निर्णय ही दोघे एकत्र घेतात…झाले तर ती जबाबदारी…

थोडक्यात आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे जास्त आवडते कारण जबाबदाऱ्या, आनंद ,आपल्या क्षमता , कुवत, आर्थिक असेल शारीरिक असेल किंवा शारीरिक सबंध ही असतील, आवडी निवडी , एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी च असते ही आणि त्यात ही नाही जमले तर जोर जबरदस्ती नाही एकत्र राहण्याा ची …स्वतंत्र अस्तित्व आहे…दुसरा पार्टनर शोधू शकता…किंवा आवडला तर तोच हे स्वातंत्र्य.

किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकमेकांच्या स्वभावाचे सर्व बाजूने पैलू विचारात घेतले जातात…मग वेळ प्रसंगी थोडी adjustment ही…
आयुष्यात मारून मुटकून जगण्यापेक्षा मुक्तपणे ,, आनंदाने जगण्याची आवड या पिढीला आहे … कारणे ही अशीच काही आहेत की IT sarkhe field खूखूप मानसिक ताण देणारे ही आहे…किंवा जॉब ची insecurity, आयुष्याची insecurity , वाढती महागाई यात पूर्वी एकट्याची जबाबदारी असे की काही झाले तरी पुरुषांनीच सगळे बघितले पाहिजे मग कितीही ताण पडो त्यांचं त्यांनी बघायचे…या उलट दोघेही कमावते असतील थोडा भार स्त्री उचलू शकते ते mutually ठरवू शकतात ..

किंवा काहीना पूर्ण जबाबदारी झेपत नाही…अगदी मुलींना स्वैपाक ..घरचे..नोकरी करणे नाही जमत सगळे..काही शारीरिक दृष्ट्या मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत असमर्थ ही असू शकतील पण हे एकमेकांपासून लपवून ठेवत नाहीत ..त्यामुळे पुढच्या समस्या वाचतात.त्याचमुळे लिव्ह इन रिलेशनशिप असे पर्याय जास्त भावतात…पसंती तिकडे असते.

लग्न करून ज्या गोष्टी मिळवितात त्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त आणि आनंद, सुख , स्वातंत्र्य , योग्य जोडीदार, समजूतदारपणा असे परिपूर्ण जगणे या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मिळते.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये खरंच आपण समाधानी आयुष्य जगू शकू का ?

हा एक विचार करण्या सारखा मुद्दा आहे.

खरे तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप ‘ म्हणले तर समाज , वडीलधारी मंडळी आणि संस्कार , रीती रीवाज याला अनुसरून नाही. त्यामुळे बहुतांशी लोक याला विरोध च करणार.

पण मग ज्यांना लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहायचे त्यांनी हे ठरवायचे आहे. की खरंच आपण समाधानी आयुष्य जगू शकू का ? लोकांच्या , नातेवाईकांच्या रोजच्या विरोधाला सहन करण्याची क्षमता त्यांच्यात पाहिजे.

शिवाय यातले जे धोके , insecurity स्वीकारायची का ? आणि किती काळ ? बरं जर पुढे जावून हा पार्टनर सोडून लग्न करायचे ठरविले तर तसा योग्य जोडीदार मिळणार का ? आणि तो स्वीकारणार का ?

खरे तर कसे आहे दोन्ही बाजूने विचार केला असता.. लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये खरंच आपण समाधानी आयुष्य जगू शकू का ? हो पण आणि नाही पण होवू शकते.

हो म्हणले तर वरती बऱ्याच positive गोष्टी मांडल्या आहेत. त्याचा विचार करता समाधानी आयुष्य जगू शकू. पण जर काही अजून यापलीकडे जावून विचार केले तर

१. लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये जर सतत पार्टनर बदलावे लागले तर ? एका पार्टनर बरोबर जुळवून घेता घेता तो / ती काहीं कारणाने एकत्र राहू शकत नसतील. त्यांना आपले पार्टनर बदलावे असे वाटत असेल. एकाची इच्छा नसेल तरी दुसऱ्याची असेल तर ते दोघांना ही मान्य करावे लागणार च.

त्यामुळे एकमेक समजून घेण्याची संधी फारशी मिळणार नाही. आणि सारखे सारखे दुसऱ्या partner सोबत जुळवून घेणे , त्याच गोष्टी करणे आणि basically फिजिकली एकत्र येताना खरेच मन आणि शरीर तसे साथ देईल का हा मोठा प्रश्न आहे. त्यातून उलट psychologically problem वाढतील . उदासीनता , नैराश्य वाढण्याची शक्यता आहे.

२. आपण वर सगळे positive गोष्टी धरून जातो पण negative ही घडू शकते. एकमेकांना समजून घेणारे , स्वभाव जुळतीलच असे नाही. आवडी निवडी भिन्न असू शकतील. खान पान सवयी भिन्न असतील . तर ते जुळवून घेणे अवघड जाते.
कारण हे एक प्रकारचे trial error तर असते.

३. पुढची पिढी : जरी ठरविले की दोघांनी ही करायचे त्याच्या करिता .खर्च असेल , श्रम , किंवा इतर कोणत्याही गोष्टी वाटून घ्यायचा ठरवले तरी काही गोष्टींची जबाबदारी ही स्त्री ची च असते. ते तिला पार पाडावे लागतात. अशावेळी मीच का करायचे असे बोलून , वागून चालणार नाही.

आणि चुकून एका कोणी पुढे जावून पुढच्या पिढीची जबाबदारी नाकारली तरी दुसऱ्याला मग पर्याय काहीच उरत नाही ना ?

४. Possessive : एकीकडे म्हणतो आपण की दोघांना ही मुभा असते. वैचारिक , मानसिक , आर्थिक , व्यावहारिक , वर्तन पण कुठे ना कुठे आपण ही त्या व्यक्तीशी जुळलो जातो. संबंध वाढतात. आपलेपणा वाढत जातो आणि त्यातून उलट ही होते की possessiveness वाढतो. जर आपला पार्टनर दुसऱ्या कोणाबरोबर फ्लर्ट करत असेल , आपल्या सारखेच अजून कोणा बरोबर जवळीक साधत असेल तर मग आपला हक्क आधी अशी कुठे तरी मनात भावना निर्माण होते. आणि त्यातून insecurity , भीती , चिंता नक्कीच निर्माण होतात. काही वेळेस मनावरचा संयम ही सुटतो.

५. भिन्न living of standard .. राहणीमान भिन्न असू शकते. त्यातून दोघांच्या लिव्हिंग of standard madhye एकमेक बसत नसतील .adjustment होत नसतील , तशी तयारी नसेल तरी मग मतभेद होत जातात.

६. वागणे बदलू ही शकते. सुरुवातीला जवळीक साधण्या करिता अनेक मार्ग अवलंबिले जातात . आणि अनेक आश्वासने ही दिली जातात . परंतु अचानक त्यांच्या वागण्यात बदल ही घडून येवू शकतो. अशा वागण्याचा त्रास दुसऱ्या पार्टनर ला नक्कीच होतो.

अशा अनेक मुद्द्यांचा विचार केला तर हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये खरंच आपण समाधानी आयुष्य जगू शकत नाही.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये खरंच आपण समाधानी आयुष्य जगू शकू का ? वरकरणी हे साधे सोपे वाटले तरी तसे प्रत्यक्षात situation handle करणे अवघड आहे.

आयुष्य सुंदर आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण तरी समाज , आपले नातेवाईक , संस्कार ,रीती रिवाज यांचेही काही प्रमाणत बंधन असते. कारण मनुष्य गा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याला अनुसरून च योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. अर्थात हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे की त्याने काय निर्णय घ्यावा आणि कसे वर्तन करावे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!