Skip to content

एकमेकांविषयी काहीही देणंघेणं नसणाऱ्या जोडप्यांनी एकत्र रहावं की विभक्त व्हावं ??

एकमेकांविषयी काहीही देणंघेणं नसणाऱ्या जोडप्यांनी एकत्र रहावं की विभक्त व्हावं ??


हर्षदा पिंपळे


नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही….
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही…!!-(कवी.कुसुमाग्रज)

काही नाती इतकी सुंदर असतात की कधी कधी त्या नात्यांच वर्णन करायला शब्दही कमी पडतात. अगदी या ओळींसारखीच काही नाती असतात.पण काही नाती अगदी याऊलट असतात.एकमेकांविषयी त्यांना काहीही देणंघेणं नसतं.आपण हल्ली तर अशी अनेक जोडपी पाहतो की ज्यांच एकमेकांशी कणभरही पटत नाही. एकमेकांची प्रत्येक गोष्ट त्यांना खटकत असते.

आणि एकमेकांविषयी त्यांना काहीही वाटत नसतं.आजुबाजूची परिस्थिती पाहता हल्ली जोडप्यांच विभक्त होण्याच प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. अगदी छोट्या छोट्या कारणावरून हल्ली जोडपी थेट विभक्त होण्याचा मार्ग स्वीकारतात.

मग अशा एकमेकांविषयी काहीही देणंघेणं नसणाऱ्या जोडप्यांनी एकत्र यावं की विभक्त व्हावं हा प्रश्न मनात गोंधळ घालतो.

खरच काय करावं या अशा जोडप्यांनी…..?

नाती आली की छोटे छोटे वादविवाद हे होणारच असतात. मैत्रितसुद्धा आपण छोटी मोठी भांडणं करतोच नं…? पण जोडप्यांमधील भांडणं म्हणजे थेट त्यांच्या एकत्रित अस्तित्वाचाच प्रश्न उपस्थित होतो.एकमेकांविषयी काहीच देणंघेणं नसणारी ही जोडपी एकत्रितपणे कशी राहत असतील…? त्यांच्या एकत्रित राहण्याला यामुळे काही अर्थ उरतो का…? ते पुन्हा पूर्वावस्थेसारख एकत्र राहू शकत नाही का..? की त्यांनी सारासार विचार करून थेट विभक्त होण्याचाच मार्ग अवलंबवावा…?

त्यांच्या या वागण्यामुळे अशा कितीतरी प्रश्नांना उधाण आल्याशिवाय राहत नाही.

पण प्रामाणिकपणे सांगायच झालं तर….हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला.विभक्त व्हायच की एकत्र रहायच हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असतो.कारण आयुष्य हे त्यांना एकमेकांसोबत घालवायच असतं. आता एकमेकांविषयी काहीही एक देणंघेणं नाही म्हंटल्यावर अशा जोडप्यांनी एकत्र रहावं असं सहजासहजी कुणालाही वाटणार नाही. कारण ज्या नात्यात ते दोघे स्वतः अजिबात involved नाही अशा नात्याला काहीच अर्थ नाही.

एकत्र राहण्याला अर्थ नाही मग थेट विभक्त व्हावं असं कित्येकांना वाटणं साहजिक आहे.

पण सांगायचा उद्देश इतकाच की.., नाती जोडली जातात ती तुटण्यासाठी नाही. त्यामुळे एकाच छताखाली राहून एकमेकांविषयी काहीच देणंघेणं नसेल तर थेट विभक्त होऊ नये.एकमेकांविषयी काही वाटत नसेल तरी थोडा वेळ घेऊन , विचार करून यावर काहीतरी मार्ग पत्करला पाहिजे. एकमेकांना खरच एकमेकांविषयी काही वाटत नाही याची एकदा खरच खात्री करून घ्या.आपण विभक्त होणं योग्य आहे का ? ह्याचा विचार एकदा करून पहा.कारण भांडणं झाली तरी आपण एखाद्याला मनवायचा प्रयत्न करतो.अगदी तसच हे आपल्या बाबतीत लागू होतं.

कारण थेट विभक्त होणं हे काही solution नाही. एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या.मोकळ्या मनाने सगळ्या शक्यता तपासून पहा. चर्चा करा-संवाद साधा.काही निष्कर्ष निघतात का ते एकदा पाहून घ्या.काय आहे पुन्हा एकत्र रहावसं वाटलं , एकमेकांविषयी खरच काहीतरी अजूनही वाटतय ह्याची जाणीव तेव्हा झाली तर चांगलच आहे. नाहीतर उगाचच विभक्त झाल्यावर याची जाणीव झाली तर नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.

पण खरच एकमेकांना एकमेकांसोबत रहायची इच्छा नसेल , काहीही देणंघेणं नसेल , तुझं-तू…., माझं-मी….किंवा सतत मी मी असं चाललं असेल तर वेळीच विचार करून निर्णय घ्या. एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची इच्छाच नसेल तर विभक्त होण्याचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा आहे.कारण उगाचच गुंतून अडकून पडण्यापेक्षा वेगळ होऊन उरलेलं आयुष्य स्वतंत्रपणे आपण जगू शकतो . दोन्ही आयुष्याची वाताहत होण्यापेक्षा विभक्त होऊन जर तीच दोन्ही आयुष्य सुखकर होणार असतील तर विभक्त होण्याचा पर्याय अशा जोडप्यांसाठी खुला आहे.

कारण अनेकदा अशा केसेस मध्येही ही जोडपी एकत्रितपणे रहावी , विभक्त होऊ नये यासाठीच प्रयत्न केले जातात. शक्य होईल तितकं अशी नाती सहजासहजी तुटू नयेत यासाठीच सगळे प्रयत्न करतात. परंतु सर्वस्वी आणि शेवटी निर्णय हा त्या दोघांचा असतो.त्यांनी आपापल्या भविष्याच्या दृष्टीने (कुटुंब/करिअर) योग्य तो निर्णय स्वीकारला पाहिजे.

कारण एकमेकांविषयी काही वाटत असेल तरच त्या एकत्रितपणे रहाण्याला काही अर्थ आहे. नाहीतर एकमेकांची तोंडही पहायची इच्छा नसलेल्या व्यक्तीने सरळ विभक्त होऊन आपापली आयुष्य सुखाने जगावी.कारण नात्यांना काहीतरी अर्थ असतो…त्यात कुटुंब जोडली जातात. आणि त्यांच्या एका निर्णयावर दोन्ही कुटूंबाच पुढचं गणित ठरणार असतं.त्या दोघांच भविष्य ठरणार असतं. So… Choice is yours….!
नाती जोडायची की तोडायची…..?


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “एकमेकांविषयी काहीही देणंघेणं नसणाऱ्या जोडप्यांनी एकत्र रहावं की विभक्त व्हावं ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!