मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? मनाचा अभ्यास की अजून काही?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
मानसशास्त्र म्हणजे psychology. Psychology हा शब्द मुळतः ग्रीक शब्द psyche यातून आला आहे. Psyche म्हणजे मन आणि logos म्हणजे शास्त्र. जर psychology या शब्दाची फोड केली तर तो असा होतो. Psyche+ logos. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र.
तर या मानसशास्त्रामध्ये फक्त मनाचा अभ्यास होतो का की अजून काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. तर मानसशास्त्राच्या अनेक मानसशास्त्रज्ञांनी विविध व्याख्या केल्या. १८९० मध्ये विल्यम जेम्स ने मानसशास्त्राची व्याख्या अशी केली आहे. “The science of mental life, both of it’s phenomena and their condition.”
1913 मध्ये वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॅटसन यांनी मानसशास्त्र म्हणजे prediction and control of behaviour असे म्हटले. म्हणजेच यात वर्तनाचा देखील अभ्यास केला जातो. बऱ्याच शास्त्रज्ञांनी त्या त्या वेळी मानसशास्त्राची व्याख्या तयार केली.
आत्ता मानसशास्त्राची व्याख्या प्रचलित आहे जी APA म्हणजेच American psychological association सांगितली आहे ती म्हणजे “the study of mind and behaviour.”
“मानसशास्त्र म्हणजे मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र.”
मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असे म्हटल्यावर मनामध्ये नेमके येतात काय हे लक्षात घेतले पाहिजे. तर मनामध्ये असतात विविध बोधनिक क्रिया. म्हणजेच आपण कशा पद्धतीने विचार करतो, आपल्या एखाद्या स्थळ काळा बद्दलच्या आठवणी, स्मृती, आपल्या संवेदना आपल्या एखाद्या गोष्टीची होणारी जाणीव इत्यादी.
बराच काळ मन हे हृदयात कुठेतरी आहे असं मानलं जायचं. परंतु मन हे हृदयात नसून मेंदूत आहे. मेंदूतील विविध भाग आपण कसा विचार करतो, कशी जाणीव करतो, आपली तहान, भूक, झोप यावर नियंत्रण ठेवत असतात. जसं की मेंदूतील amygdala हा भाग आहे तो आपल्या भावनांचे नियमन करत असतो. जसे की भीती आणि राग. मेंदूचा जो मुख्य भाग आहे hippocampus तो आपल्या स्मृतीसाठी जबाबदार असतो. Cerebrum मेंदूचा सर्वात मोठा व वरचा भाग. तर हा भाग विचारांशी, बौद्धिक कार्याशी, तसेच आपल्या कारक हालचालींशी जोडलेला आहे.
तसेच मेंदूतील ची मज्जासंस्था आहे तिचाही यात भाग आहे. मेंदूतील विविध न्युरोट्रान्समीटर जसे की डोपामाइन feeling good म्हणजे आनंदाशी जोडलेला आहे. सेरोटनिन हा मूड म्हणजेच आपल्या मनस्थितीवर परिणाम करतो. अश्या प्रकारचे अनेक न्यूरोट्रान्समीटर मेंदूत कार्यरत असतात.
म्हणजेच मानसशास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने मेंदूचा अभ्यास केला जातो. यातून आपल्या हे लक्षात येईल की मन ही गोष्ट पूर्णतः मेंदुतील आहे आणि या सर्व क्रिया मधून म्हणजे एखाद्या गोष्टीचं संवेदन, जाणीव असेल घेतल्यानंतर माणूस काय प्रतिक्रिया देतो, वर्तन करतो या सर्वाचा एकात्मिक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र.
यामध्ये व्यक्तीच्या भावनांचा, वर्तनाचा, विचारांचा अगदी सखोल अभ्यास केला जातो. तसेच व्यक्तीच्या मानसिकतेवर फक्त त्याच्या विचारांचा प्रभाव नसून समाजाचा आणि त्याच्या शारीरिक बदलांचा, हॉर्मोन्स यांचाही प्रभाव पडतो हे लक्षात घेतले जाते. म्हणूनच काही आजार हे मनोकायिक म्हणजेच psychosomatic आहेत हे लक्षात घेऊन त्यानुसार त्या व्यक्तीला उपचार दिले जातात.
याला सायन्स ऑफ प्रेडिक्शन असे म्हटले गेले आहे. विविध चाचण्यांचा वापर करून जसे की बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व माणूस त्याच्या पुढच्या आयुष्यात कसा वागेल काय कामगिरी करेल याचा अंदाज बांधला जातो.
एखाद्या विशिष्ट घटनेशी किंवा प्रसंगाशी माणूस जोडला गेला त्याचा कंडिशनिंग केलं तर त्याचा त्या माणसाच्या मनावर काय परिणाम होतो यावरही संशोधन केले गेले आहे. यातून बऱ्याच माणसांना जी अनैसर्गिक भीती असते त्याची कारण समजण्यास मदत होते. त्यानुसार त्याला बर केलं जात. मानसशास्त्रामध्ये फक्त आजारांवर असं काम केलं जातं असं नाही. तर व्यक्तीला चांगले समृद्ध जीवन, चांगल्या पद्धतीने विचार कसे करायचे, आयुष्याचा अर्थ कसा शोधायचा यासाठी मदत केली जाते. यातही अनेक शास्त्रज्ञांनी योगदान दिले आहे.
जर मानसशास्त्राचा एकात्मिक असा विचार करायचा झाला तर माणसाला उन्नत आयुष्य जगायला शिकवणार, त्यासाठी प्रयत्न करायला लावणारं, स्वतःला शोधायला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लावायला मदत करणारे शास्त्र नक्कीच म्हणता येईल.
कारण नुसत शरीर असून चालत नाही त्यात जिवंतपणा हवा असेल तर चांगलं सुदृढ मन पाहिजे. ते कसं करता येईल याचा अभ्यास यामध्ये होतो आणि म्हणून मानसशास्त्र ही जगाला लाभलेली खूप मोठी देणगी आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
लेख खूप छान आहे
खूपच छान लेख 👌👌
खूपच सुंदर मॅडम मला आपला मो नो मिळेल का . मी psychology ३yearcha student aahe.