एकमेकांसाठी तुम्ही ‘नंबर वन’ कपल आहात, हे जगाला भासवण्याची अजिबात गरज नाही.
मयुरी महेंद्र महाजन
‘भास’ या दोन अक्षरी शब्दाचा अर्थ बघितला, तरं तो खूप गहन आहे, आणि तसाच तो सोपाही आहे, उगीच अंधारात दोरीला साप समाजण्याचा होणारा भास तसा तर सहज वाटतो, पण तो निव्वळ भ्रम असतो, ज्याचे अस्तित्व प्रत्यक्षात कधीच नसते, आता तसे बघितले, तर भास होणे आणि काही गोष्टी मुद्दामून भासवणे यामध्ये खूप अंतर आहे,
जी व्यक्ती प्रत्यक्षात खूप साऱ्या दुःखाशी झुंजत आहे, त्या व्यक्तीने हसून आणि चेहऱ्यावरती खोटी स्माईल करून जगाला कितीही आनंदी दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी प्रत्यक्षात मात्र तसे कधी नसतेचं.. म्हणजे ती व्यक्ती जे काही भासवण्याचा प्रयत्न करतेय, त्याचे अस्तित्व मात्र प्रत्यक्षात कधीच तसे नसते, आणि त्याचे अस्तित्व जसे आहे तसे ते मांडता येत नाही, किबंहुना मांडू शकत नाही, त्यासाठी त्या गोष्टींचा वापर होत असावा….
संसार या तीन अक्षरी शब्दाबरोबर सुरू होतो, एक नवीन प्रवास, एक नवीन जबाबदारी,नवीन माणसांसोबतची एक नवीन बाँन्डिंग,,एक अटँचमें, जगातलं सर्वात सुंदर ,बेस्ट नातं आपल्या जोडीदाराबरोबरचं परंतु यामध्ये बदलत जाणार्या जनरेशन बरोबर कितीतरी टप्प्याटप्प्याने त्यामध्ये बदल झालेले बघायला मिळतात, दोन व्यक्ती एकत्र येतात, हे शरीर बंधाने तरं आहेचं, परंतु मनाचे मिलन होणे महत्त्वाचे आणि तेसुद्धा सात्विकतेने तितक्याचं शुद्ध भावनेने , आज आपली जनरेशन दिखाऊ झालेली, बघायला मिळते,
जसे की सोशल मीडिया प्लाॅटफार्म असतील त्यावर ती आपल्या कपल सोबतचा फोटो शेअर करणे, आता आता तरी एक ट्रेड चालू आहे, ते काय प्री वेडिंग शूट वगैरे….. असे बरेच काही…. करू नका याला विरोध नाही, परंतु निव्वळ प्रेमाचे प्रदर्शन करू नका इतकचं ,कारण की नव्याची नवलाई संपली की पुन्हा भांडण, झालेचं काही टोकाचे तर घ्या घटस्फोट, नवऱ्याचे, बायकोवर आणि बायकोचे नवर्यावर फक्त प्रेम असून चालत नाही, तर एकमेकांना एकमेकांचा विश्वास कमवता यायला हवा, तरच नात्याची वीण घट्ट होत जाते ,…
प्री वेडिंग शूट बद्दल, कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही, परंतु एकमेकांच्या आनंदासाठी जर आपण हे करत असालं, तर एक गोष्ट सांगा हा आनंद आहे की निव्वळ भास आहे, हे तुम्ही जगाला दाखवण्यासाठी करत आहात, स्वतःच्या मनाला हे जरुर विचारा,जसे की सोन्याला ते सोनं आहे, हे जगाला ओरडून सांगण्याची गरज नसते , लोक फक्त बघून सांगतात,तसेच आपला जोडीदार आणि आपण एकमेकांसाठी काय आहोत,हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती असते ,तसं पाहिलं तर गुण आणि दोष प्रत्येकात असतातचं,
सर्व गुणांनी स्वयंपूर्ण कोणीचं नसतं… ना…! त्यामुळे एक माणूस म्हणून आपण आपल्या जोडीदाराबद्दल किती कृतज्ञ आहोत, हे दोघांनीही जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला या जगात जे काही मिळालेले आहे, त्याप्रती आपण नेहमी कृतज्ञ असायला पाहिजे, कारण न मिळणारर्या गोष्टीची खंत आपण मानतो, परंतु मिळालेला कितीतरी गोष्टी आपल्या पुढ्यात असतात त्यांच्या प्रती मात्र आपली कृतज्ञता शून्य असली, तर असलेल्या गोष्टीतला आनंद सुद्धा पूर्णपणे अनुभवता येत नाही,…
नंबर वन ,कपल म्हणून आपण जगात घोषित व्हावे, यासाठी जगाला तसे भासवण्याची अजिबात गरज नाही… एकमेकांच्या मनात एकमेकांची प्रतिमा नंबर वन असायला हवी, हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे , जग जरी आपल्याला नंबर वन कपलं म्हणतं असले आणि एकमेकांच्या मनात जरं आपण खालच्या स्तराला असू, तर हे स्पष्ट आहे, की आपण जगाला भुरळ घालू शकतो ,आपल्या मनाला भुरळ नाही घालू शकतं, मनाच्या त्या इवल्याशा कोपऱ्यात खूप काही सत्य दडलेले असते ,
आपण नंबर वन कपल असलं पाहिजे, दाखवलं नाही पाहिजे, कारण कि जे असतात ते कधीच दाखवत नाही, आणि जे दाखवतात ते कधीचं असत नाही, कारण बरेचदा असे म्हटले जातं, जसं दिसतं ,तसं नसतं, म्हणून जग फसतं ,आणि बारकाईने विचार करावा ,आपण जगाला फससू शकतो, परंतु स्वताःला नाही ,तुम्ही नंबर वन कपल आहात ,हे जगाला भासण्यापेक्षा तुम्ही नंबर एकचे कपल आहात, हे तुम्हाला दोघांना जाणवलं, तर यापेक्षा दुसरा आनंद तो काय असावा….
मित्रांनो जगाच्या बाजारात फसवणारे खूप भेटतीलं, पण विश्वास ठेवून साथ देणारे, आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारे, प्रेमाने निभावणारे ,खूप कमी ….त्यामुळे आपल्याला मिळालेल्या आपल्या जोडीदारावरती खूप प्रेम करा, साथ द्या, विश्वास ठेवा, प्रत्येक परिस्थितीत एकमेकांसोबत जिद्दीने उभे रहा, आणि झालचं तर ज्या त्या दिवसाची भांडणे ज्या त्या दिवशीचं संपवा, कारण समोरच्या व्यक्तीच्या चुकीवर तुम्ही कितीही रागावलात, तरी चालेल पण तिने तुम्हाला जे प्रेम दिलेयं, त्याच हक्काने तुम्ही तिला माफ करणं पण गरजेच आहे,
काळजी घ्या ,एकमेकांची एकमेकांना जाणून घ्या, एकमेकांच्या सुख दुःखाची काळजी घ्या, कारण माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची किंमत जाणा.निघून गेलेली वेळ आणि माणसे परत मिळवता येत नाही, त्यामुळे आपण एकमेकांसाठी काय आहोत हे एकमेकांना जाणवू द्या…!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
