विवाहबाह्य संबंध ही fashion आपल्या मेंदूला चिकटून राहू नये म्हणून हे करून पाहा.
हर्षदा पिंपळे
‘विवाह’ म्हणजे भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. पण ‘विवाह बाह्य संबंध’ हा काही कोणत्याही स्वरूपाचा संस्कार मानला जात नाही. तरीही आजकालची परिस्थिती पाहता विवाह बाह्य संबंध हा प्रकार आपल्याकडे अगदी एखाद्या fashion प्रमाणे रूजत चालला आहे. दिवसेंदिवस विवाह बाह्य संबंध हे वाढताना दिसत आहेत.
कुणाला या विवाह बाह्य संबंधांमध्ये काहीही गैर वाटत नाही तर कुणाला या पद्धतीवर अनेक प्रकारचे आक्षेप आहेत. कित्येकजण आहेत ज्यांना ही विवाह बाह्य संबंध पद्धती अजिबात मान्य नाही. तर काही जण असही म्हणतात की यात काय गैर आहे…..?
आता प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळ्या प्रकारची असते.त्यामुळे प्रत्येकाची मतं , विचार , प्रतिक्रिया या भिन्न स्वरूपाच्या असतात.आणि असही ज्याचं-त्याचं आयुष्य हे ज्याने त्याने त्यांच्या मनाप्रमाणे जगावं असं म्हणतात. पण विवाह म्हणजे कोणताही खेळ नव्हे… आज याच्याबरोबर उद्या त्याच्याबरोबर….!
विवाह म्हणजे दोन आत्म्यांच मिलन असतं.पण मग विवाह झाल्यानंतरही जर जोडीदार बाहेर संबंध ठेवत असेल तर त्याला काय अर्थ आहे…? विवाह हे एक प्रकारचं मनामनाने गुंफलेलं नातं आहे.ते मनापासून प्रत्येकाने जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विवाह बाह्य संबंधाला जवळ करण्यामागे काही कारणं असतीलही पण मग त्यामुळे असे संबंध ठेवणे गरजेचेच आहेत का…? त्यावर काही उपाययोजना असतीलच. त्याचा उपयोग करून पाहिला तर कदाचित विवाह बाह्य संबंधाला कुणी सहसा जवळ करणार नाही किंवा तसा प्रयत्नही करणार नाही.
विवाहबाह्य संबंध का निर्माण होतात किंवा ते का जास्त आकर्षित करतात अथवा जवळचे वाटतात याची कारणे तपासून पहा.
त्या कारणांवर काही विचारपूर्वक निर्णय घेता येतो का ते तपासून पहा.
विवाह झाल्यानंतर एकमेकांना पुरक असा वेळ द्या. कारण वेळेअभावी नाती दुरावली जातात. आपला जोडीदार आपल्याला वेळ देत नाही हे कुठेतरी मनाला खटकत राहतं.त्यामुळे एकमेकांना शक्य होईल तितका वेळ देण्यासाठी प्रयत्नशील राहा.
एकमेकांना वेळ दिला , मोकळा संवाद साधला तर ह्या विवाह बाह्य संबंधाचा मनात विचारही येणार नाही.
बाहेरच्या किंवा आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टी आपण पाहत असतोच.तर विवाह बाह्य संबंधही हल्ली आपल्या नजरेस पडतात. त्याचे परिणाम आपण आपल्या डोळ्यांनी पाहत असतो , अनुभवत असतो. असे परिणाम आपल्या नात्यावरही होऊ शकतात याचा विचार करणे आवश्यक आहे.
चित्रपट ,मालिका यातील गोष्टींचे अनुकरण न करता आपल्या नात्याशी एकसंध, एकनिष्ठ कसं राहता येईल याचा विचार करा.
आता प्रत्येकाची कारणही वेगवेगळ्या प्रकारची असु शकतात. विवाह बाह्य संबंध ठेवताना काही केवळ शारीरिक सुखासाठी/गरजेसाठी तर काही केवळ आर्थिक चणचण भागवता यावी म्हणून अशी तडजोड करत असावी.पण यामुळे विवाह बाह्य संबंध पद्धती वेगाने वाढत आहे. याला कुठेतरी आळा बसणं आवश्यक आहे.
एकमेकांमध्ये कोणतेही अगदी कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर ते एकमेकांना सांगावे.एकमेकांनीच एकमेकांना समजून उमजून घेतले पाहिजे. कारण एकमेकांचे प्रॉब्लेम्स आपण स्वतःच जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.
एकमेकांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी शेअरींग हवं.जे काय वाटतय , चांगलं-वाईट सगळं एकमेकांना सांगून मोकळं व्हावं. मला हे हे पटलं नाही , ते पटत नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी एकमेकांसमोर अगदी स्पष्टपणे मांडाव्यात. त्यातून निश्चितच एकमेकांमध्ये किती पारदर्शकता आहे हे समजण्यास मदत होईल.
आणि नात्यांमध्ये काय महत्वाच असतं तर पारदर्शकता….! जर नातं पारदर्शक असेल तर विवाह बाह्य संबंध सहजासहजी कुणालाही जवळचे वाटणार नाही. विवाह बाह्य संबंधाचे कसे परिणाम होऊ शकतात याची जाणीवही एकदा स्वतःला करून द्या.नाती टिकवायची की अजून तुटू द्यायची हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
ज्या एका श्वासाशी आपण नाळ जोडतो त्याच श्वासाला निदान सोबत असेपर्यंत तरी प्रामाणिकपणे जपलं पाहिजे. आज एक ,उद्या दुसरा ,परवा तिसरा…असं सगळ्याच श्वासांशी खेळत बसू नका.नाहीतर ” एक ना धड भाराभर चिंध्या” अशी अवस्था केव्हा होईल कळणारही नाही. त्यामुळे आहे ते नीट जपायच की सगळच गमावून बसायच हे ज्याचं त्याने समजून घेतलं पाहिजे.
विवाह बाह्य संबंध ही fashion एकदा मेंदूला चिकटली तर आयुष्य किती healthy राहू शकतं आणि किती नाही हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे वेळीच विवाह बाह्य संबंधांपासून दूर रहा.जे असेल ते चर्चेतून/सुसंवादातून स्पष्ट करून घ्या.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Chan khup
He. जीवन. सुंदर. आहे.वाईट.विचारांचा.त्याग.करा. साथीदारांसोबत. communication. होत.नसेल.adjest.जिंदगी.का. नाम.है.दुखांचे.डोंगर.ओलांडल्या.शिवाय.सुखाची.हिरवळ.लागणार.नाही.
I need your guidance