बेडवर असताना दिवसभर तुमच्यासोबत काय काय वाईट घडलं हे सारखं बोलू नका.
सुधा पाटील
(समुपदेशक)
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जगणं सुंदर आहे.फक्त प्रत्येक टप्प्यावर मानसशास्त्रीय विचार होऊन जगण्याचं नियोजन करता आलं पाहिजे.ते करता आलं,तशा दृष्टीने सतत विचार करता आला की, माणूस उत्तम आयुष्य जगू शकतो.आयुष्य जगताना सर्व गरजा पूर्ण झाल्या किंवा त्या व्यवस्थित पूर्ण करता आल्या की, मानसिक आरोग्य आपोआपच उत्तम राहण्यास मदत होते.
आपल्या ज्या मुलभूत गरजा आहेत त्यातीलच एक महत्त्वाची मुलभूत गरज म्हणजे से_क्स! दिवसभरातील दगदग, जबाबदाऱ्या यामुळे दमलेल्या माणसाला आपल्या जोडीदारासोबतचे क्षण सुखावून जात असतात.विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की,ज्या कपलमध्ये सेक्सुअल रिलेशन चांगले असतात ते आपलं सहजीवन खूप उत्तमरित्या जगतात.कारण स्पर्शाची भाषा माणसाला नवसंजीवनी देते.आधार देते.
से_क्स ही गोष्ट दोघांनाही आनंद देणारी, दोघांनाही एकमेकांत गुंतवून ठेवणारी, एकमेकांना मानसिक आनंद देणारी,एकमेकांच मानसिक आरोग्य उत्तम ठेवणारी, एकमेकांना रोजच्या दगदगीतून रिलॅक्स करणारी अत्यंत आवश्यक अशी मुलभूत गरज आहे.पण आरोग्यासाठी जसा समतोल आहार लागतो तसंच उत्तम मानसिक आरोग्यासाठी देखील समतोल से_क्सची गरज असते.पण बऱ्याच जोडप्यांमध्ये अज्ञान, अनास्था, अहंकार यामुळे या गोष्टीचा गांभीर्याने विचार होत नाही.त्यामुळे आजकाल यातूनच घरांमध्ये कलह वाढत आहेत.
लग्नानंतर सुहागरात साजरी करताना आजुबाजूला सजावट केली जाते.वातावरण प्रसन्न ठेवलं जातं.रोमॅंटिक विचार मनात आणले जातात.जेणेकरुन दोघांची मनं आणि शरीरं एकरुप व्हावीत.आता बघा हं….रोज भूक लागते…रोजंच समतोल आहार लागतो….लागतो ना?…मग सेक्स ही सुद्धा एक मुलभूत गरज आहे.
आणि तीही रोजचं लागते.हां….याचंही प्रमाण कमी जास्त असू शकतं.मग ही भूक देखील समतोल असायला हवीच.आता समतोल से_क्स म्हणजे तरी काय?….तर बेडवर असताना दोघांच्याही डोक्यात आणि मनात सेक्स असायला हवा.जर बेडवर असताना दोघेजन दिवसभरातील वाईट गोष्टी, वाईट अनुभव, एकमेकांच्या चुका याचीच चर्चा करत बसले तर त्यांचा परिणाम दोघांच्याही मनावर होतो.
त्यामुळे दोघेही त्या सुंदर सहवासाचा आनंद देऊ किंवा घेऊ शकत नाहीत.मी मागे एका लेखात म्हणाले होते….”से_क्स हा दोन शरीरांचा नसतोच….तो दोन मनांचा असतो”. त्यामुळेच बेडवर असताना जर मनात सतत दिवसभरात घडलेल्या नकारात्मक गोष्टींचा विचार सुरू असेल….चर्चा सुरू असेल तर आपली मानसिकता तशीच बनून राहते.
त्याचा विपरीत परिणाम मनावर आणि हार्मोन्सवर होतो.त्यामुळे से_क्सुअल भावनांवर देखील त्याचा परिणाम होतो.म्हणूनच बेडवर असताना दोघांनीही जाणिवपूर्वक दिवसभरात जे जे घडलं त्यावर बोलू नका किंवा चर्चा करु नका.कारण दिवसभरात जे जे घडलं ते ते सर्व चांगलंच असेल असं नाही.त्यामुळे ते बोलत असताना दोघांच्यातही चर्चा घडत असताना वाद होऊ शकतात.
त्यातून मनात तिरस्कार निर्माण होऊ शकतो.त्यातून अबोला…. पुन्हा काही दिवस घरातील वातावरण गढूळ….. असं हे चक्र सुरू होऊ शकतं.मग बघा…. बेडवर जो आनंद…जो सहवास हवा…तो घेता येऊ शकतं नाही.कुठे काय करावं….आणि कुठे काय टाळावं…हे ज्याला कळतं त्याला आयुष्यातील सर्व प्रकारचे आनंद घेता आणि देता येतात.म्हणूनच दिवसभरात काय काय घडलं हे बोलण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवा.
बेडवर असताना तुमच्या डोक्यात फक्त से_क्सचा भाव असावा…. एकमेकांविषयी आदर,प्रेम असायला हवा.तरंच तुमचा सेक्स फुलतो.पण दोघांपैकी एकाच्या जरी मनात घडलेल्या गोष्टी असतील तर मात्र त्याचा परिणाम सेक्सुअल जीवनावर होत राहतो.उत्तम सांसारिक जीवनाचा पाया स़तुलित से_क्सच आहे.दांपत्याच्या आनंदी जीवनाचा महत्त्वाचा घटक से_क्स आहे.
म्हणूनच बेडवर असताना दोघांनीही नकारात्मक विचार टाळावेत.जर तुम्ही दिवसभरातील घटना त्यावेळी सतत बोलत राहिलात तर तुमचा माईंड सेट तसाच बनत जातो.तुमचा मेंदू त्याच विचारात अडकून पडतो.वाचकहो, तुम्ही जाणताच की,आपला मेंदू एखाद्या विचारात,गोष्टीत अडकून राहिला की,तो त्यातून लगेच बाहेर पडू शकत नाही.
म्हणूनच भूमिका जगायला शिका.बेडवर असताना दोघेही रोमॅंटिक कपलच असायला हवेत.जर तुम्ही त्यावेळीही समस्यांनी,प्रसंगांनी गा़जलेले प्रापंचिक दांपत्य राहिलात तर तुम्ही कधीही से_क्सुअल सुखाची देवानघेवान करू शकणार नाही.से_क्स हा दोघांमधील मैत्रीचा,प्रेमाचा दुवा असतो.
जर दोघांमधील मानसिक जवळीकता वाढवायची असेल तर तुम्ही ते दोघांचे क्षण फक्त दोघांसाठी जगा.त्यावेळी तुम्ही दिवसभरातील गोष्टी न उगाळता एकमेकांमधील चांगल्या गोष्टी शोधून कौतुक करा.वातावरण से_क्सुअल असेल तर आणि तरच दोघांमधील से_क्स उत्तम होतो.आणि से_क्स ही गोष्ट दोघांनाही आनंद देणारी, दोघांचंही मानसिक आरोग्य उत्तम ठेवणारी, मानसिक तृप्ती देणारी गरज आहे.ती पूर्ण झाली तर दोघेही छान आयुष्य जगू शकतात.
म्हणूनच तुमची बेडरुम दिवसभरातील घटनांनी न भरता एकमेकांच्या प्रेमानी भरलेली असावी.ज्या त्या जागा…ज्या त्या गोष्टींसाठीच ठरलेल्या असतात.बेडरुम ही जागा देखील तुमची शांत झोपेची गरज आणि तृप्ती देणारी से_क्सची गरज भागविण्यासाठी असते.आणि झोप आणि से_क्स या दोन्ही गोष्टी मानवी आयुष्यात खूप गरजेच्या आहेत.त्यामुळे बेडवर असताना दिवसभरात काय काय घडलं हे उगाळत बसू नये…. कारणं त्याचा दूरगामी परिणाम झोप आणि से_क्स या महत्त्वाच्या गरजांवर होतो.म्हणूनच संतुलित जीवन हवं असेल तर….केव्हा काय करायचं याचं नियोजन हवं.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
