एकाने विवाहबाह्य संबंध ठेवणे, म्हणजे दुसऱ्या पार्टनरलाही तशी परवानगी मिळणे, असा अर्थ घेतला जातोय.
टीम आपलं मानसशास्त्र
स्नेहा परवा भेटली. म्हणले कशी आहेस ग ?
स्नेहा : मी ठणठणीत. तू कशी आहेस ?
मधुरा : मी पण मस्त मजेत.
मधुरा : आणि तुझी ती मैत्रीण पल्लवी ? ती कशी आहे ?
स्नेहा : ती ठीक चालू आहे तिचे routine. अग तुला सांगितले ना मी की तिचा नवरा त्याची सेक्रेटरी आहे तिच्या प्रेमात पडला आहे. तिच्या बरोबर च असतो सदैव. त्यांच्यात प्रेम आहे का माहिती नाही पण संबंध मात्र आहेत. आणि तो खरेच त्याकरिता काही ही करायला तयार असतो. बरेचदा तो घरी येत ही नाही.
मधुरा : हो का एव्हढे पुढे गेले का ?
स्नेहा : अग ते सोड ते गेलेच पुढे पण पल्लवी ती खरेच हे सहन करू शकली नाही. सुरुवातीला खूप त्रास करून घेतला तिने मग मात्र ती शांत झाली आणि आपले आनंद शोधू लागली. तिचे मित्र मैत्रिणी यांच्या सोबत भरपूर वेळ घालवू लागली.
आणि त्यातच तिचा कॉलेज चा ही चांगला मित्र अनिकेत ही तिला भेटू लागला. तेव्हा त्यांच्यात खूप चांगली मैत्री होती आणि आता सतत एकत्र येवून ते दोघे ही खुप जवळ आले. त्यांच्यात ही मैत्री पेक्षा शारीरिक जवळीकता आता आली.
आणि पल्लवी ला असे काही विचारले तर ती म्हणते त्यात काय माझा नवरा मला सोडून जर ऑफिस मधल्या सेक्रेटरी सोबत संबंध ठेवू शकतो तर मी का नाही ? मला ही मी कसे वागायचे याचे स्वातंत्र्य आहेच की.
मी कोणाशी जवळीक करायची हे आता मी ठरविणार. रवीने जर माझ्या सारखी चांगली बायको असताना ही जर त्याला दुसरी बरोबर संबंध ठेवावे वाटतात तर मग मी का त्याच्या करिता माझे मन मारून जगू ? मला ही मन आहे , भावना आहेत , शरीर आहे त्याच्या ही गरजा आहेत.
बरं अनिकेत माझा खूप चांगला मित्र आहे , त्याच्या आवडी निवडी आणि माझ्याही खूपशा जुळतात. तो मला समजून घेतो , संवाद साधतो. मदत करतो मला सगळ्या गोष्टीत. आम्ही भरपूर फिरतो , धमाल मस्ती करतों. त्याला ही music ची आवड मला ही आम्ही मस्त रात्री beach वर जावून musical night करतो.
मग त्यात सगळे जमते तर रवी सारखे मी ही माझ्या गरजा , आवडी निवडी अनिकेत सोबत पूर्ण केल्या , त्याही पुढे जावून आमच्यात ती ओढ , आपुलकी निर्माण होते आणि आम्ही शारीरिकदृष्ट्या ही जवळ येतो त्यात ही आम्ही एकमेकांना खूप छान समजून घेवून , आनंद आणि सुखाच्या शिखरावर नेवून ठेवतो .. तर मग त्यात गैर काय ? मलाही माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगण्याची परवानगी आहेच की.
थोडक्यात इथे , एकाने विवाहबाह्य संबंध ठेवणे, म्हणजे दुसऱ्या पार्टनरलाही तशी परवानगी मिळणे, असा अर्थ घेतला जातोय. आणि याला कारणीभूत खरे तर आपला पार्टनर च . कारण तो जर त्याला पाहिजे तसे वागू शकतो. त्याच्या गरजा , आवडी निवडी पूर्ण करू शकतो. बायको किती ही छान असेल . गरजापूर्ती करणारी असेल तरी त्याच्या अपेक्षा , इच्छा पूर्ण करणारी वेगळीच असेल तर तो तिकडे आकर्षित होणार.
अर्थात हे नैतिक , सामाजिक आणि कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे.
पण बरेचवेळा लग्नानंतर क्षमता , कमतरता , उणिवा समजतात. शिवाय आपल्या अपेक्षा आहेत त्यात ही आपली / आपला पार्टनर बसत नाही याची जाणीव होते. आणि त्यामुळे एकमेकांचे जुळणे थोडेसे अवघड जाते. आणि लग्न झाल्या झाल्या किंवा थोडे दिवसांनी ही घटस्फोट घेणे ही तशी सोपी प्रक्रिया नाही. आणि तसे समाज , नातेवाईक ही या गोष्टीला सहज मान्यता देत नाही.
काही वेळेस मुलांच्या जबाबदाऱ्या , घराची कर्तव्य यातून. ही घटस्फोट घेणे शक्य होत नाही. पण मग त्यातून मारून मुटकून जगण्यापेक्षा असे काही तरी पर्यायी मार्ग शोधले जातात. किंवा न शोधता ही सतत संपर्कात असणाऱ्या , एकत्र काम करणाऱ्या , व्यक्ती आणि त्यांच्यात जवळीक निर्माण होते आणि समोरच्या व्यक्तीने जर तसा सिग्नल दिला तर त्याचे रूपांतर पुढे जावून शारीरिक जवळीकता , शारीरिक संबंध यात होते.
पण पूर्वी सारखे आता कोणीच आपले मन मारून जगणारे राहिले नाही. आताची ही पिढी स्वतंत्र विचार आणि उगीच पाश्चिमात्य संस्कृतीचा नसलेला ही पाठपुरावा , त्यांच्या नावावर आपल्याला पाहिजे तसे वागणारी आहे.
केवळ स्वतः चा विचार , वर्तणूक , आनंद , सुख याचा विचार करताना मग त्यांचा पार्टनर ही असाच विचार करतो / करते की मग मी ही असेच वागणार. मी असे केले तर त्यात गैर काय ही मानसिकता वाढत चालली आहे.
आणि म्हणूनच एकाने विवाहबाह्य संबंध ठेवणे, म्हणजे दुसऱ्या पार्टनरलाही तशी परवानगी मिळणे, असा अर्थ घेतला जातोय.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Yes agadi yogya ahe jar apan aplya partner barobar eknishth ahot Ani samoracha tyacha gairfayada ghetoy tar apan apal man bhavna ka maravya ayushh punha punha bhetat nahi Kiva geleli vel hi parat yet nahi tyamule te yogya ahe pan apala partner aplyasthi eknishth asel tar tyala kadhi fasau naye ase maze tari mat ahe
निश्चित
पण असे करणे योग्य आहे का ?