Skip to content

नवरा खूपच लवकर थकत असेल तर अशावेळी बायकोने काय करावे ?

नवरा खूपच लवकर थकत असेल तर अशावेळी बायकोने काय करावे ?


टीम आपलं मानसशास्त्र


नवरा – बायको हे नाते म्हणजे दुग्ध शर्करा योग . दुधातून साखर बाजूला काढता येत नाही तसे एकमेकां मधून एकमेकांना वजा करता येत नाही.

सर्वसाधारणपणे बायकांची क्षमता ही पुरुषांपेक्षा जास्त असते. त्या घरचे काम , ऑफिस असेल ऑफिस , बाहेरची कामे दळण, इस्त्री , भाजी , घरातले स्वैपाक पाणी , आवराआवरी , कपडे धुणे , असेल किंवा नातेवाईक असतील त्यांना सांभाळणे , त्यांच्या contact मध्ये राहणे , किंवा functions attend करणे असेल . काही देवाण घेवाण असेल . हे सगळे स्त्री अतिशय क्षमतेने आणि सातत्याने करत असते.

या सगळ्यातून ही तिला आपल्या नवऱ्या सोबतचा आपला वेळ पाहिजे असतो. आणि त्या करिता ती अगदी eagrly वाट बघत असतें . उत्साही असते.. दिवसभरात ती ही अनेक आघाड्यांवर लढताना , multitasking responiblties पार पाडताना ती ही थकते. पण तरी नवऱ्या सोबतचा तिचा वेळ तिला पाहिजे असतो.

त्यातून स्त्री खूप relax होत असते. आणि परत नवीन energy ही मिळवीत असते.
अशावेळी नवरा खूपच लवकर थकत असेल तर अशावेळी बायकोने काय करावे ? उत्साह दाखवत नसेल तर काय करावे ?

१. नात्यात कोणताच force नको. पुरुष ही थकतात. ऑफिस काम , घरच्या आर्थिक जबाबदाऱ्या , सोसायटी meetings , savings , investments , अशी अनेक physically न दिसणारी पण मानसिक स्ट्रेस देणारी ही बरीच कामे असतात. त्यामुळे येणारा हा मानसिक थकवा ही शारीरिक थकवा येण्यास कारणीभूत होतो.

म्हणून मनाविरुद्ध कोणती गोष्ट करू नये. आपल्याला वाटते म्हणून त्याने तसेच करावे हा force करू नये.

२. वातावरण आनंदी ठेवावे : घरात , नवरा बायको नात्यात वातावरण हे कायम आनंदी ठेवावे. सतत धुसफूस असेल. वाद असतील , सतत काही ना काही demands असतील तर पुरुष त्या वातावरणाला कंटाळतात. आणि मनात ही तेच विचार असतात त्यामुळे शरीर ही लगेच थकते. याकरिता मन प्रसन्न राहावे , उत्साही राहावे म्हणून वातावरण ही आनंदी ठेवावे.

३. रोजचा व्यायाम , meditation , प्राणायाम , योगा , ध्यान धारणा स्वतः करावी आणि सोबत नवऱ्याला ही करण्यास लावावी . यातून कॅलरीज consume , burn ही होतात आणि energy ही निर्माण होते. आणि harmonal balance साधणे शक्य होते.

४. पोष्टिक आहार : घरचा चौरस आणि पोष्टिक आहार , सरबते , ज्यूस , पेये यातून योग्य ती जीवनसत्त्वे , प्रोटीन , व्हिटॅमिन शरीराला मिळत असतात. जी आपल्याला उत्साही ठेवत असतात. बरेचदा बायका स्वैपाक करण्याचा कंटाळा करतात मग बाहेरचे खाणे , तेलकट , तिखट , मसालेदार असते. किंवा पिझ्झा बर्गर पचण्यास जड असतात. त्याचा त्रास च शरीराला जास्त होतो.

अपचन , acidity , हे परिणाम दिसून येतात आणि मग शरीर तेवढे साथ देत नाही.

५. डॉक्टरी सल्ला : नवरा खूपच लवकर थकत असेल तर अशावेळी बायकोने काय करावे ? जर हे नेहमीच घडत असेल तर जरूर डॉक्टरी सल्ला घ्यावा. त्यानुसार औषधोपचार किंवा गरजेच्या गोष्टी कराव्यात.

६. वातावरण निर्मिती : शरीर साथ देण्याकरिता मन ही प्रसन्न ठेवावे लागते. बायको जर अजागळ कपड्यात , दिवसभर घातलेले तेच मळकट कपडे , तोंड ही धुतलेले नाही , आवरले ही नाही अशा अवतारात असेल तर मन नाराज होते आणि त्याचा परिणाम ही शरीरावर होतो.

स्त्री ही मरगळलेलया अवस्थेत , अर्धवट झोपेत असेल , मी दमले अशी भावना असेल आणि आता हे करायचे म्हणून कर्तव्य अशा भावनेत असेल तरी त्याचा परिणाम पुरुषावर होतो.

याउलट बायको ने छान आवरून, फ्रेश होवून , एखादा छान मंद सुगंध देणारा गजरा माळून , छान परफ्यूम मारून , कपडे ही फ्रेश घालून , कधी रूम freshner मारून वातावरण निर्मिती करावी. तर कधी नवऱ्याचे कपडे ही थोडी कपड्यात विविधता आणांवी. जेणेकरून त्याला ही बदल वाटेल .मन फ्रेश होईल.

रूम ही छान आवरून ठेवावी. मंद प्रकाश वातावरण निर्मिती करतो.

७. बायको ने नवऱ्याच्या कलाकलाने घ्यावे. एकमेकांमध्ये नाते हळूहळू फुलवत न्यावे. गप्पा गोष्टी , कधी कामाची विचारपूस , तर अडचणी यातून भावना मोकळ्या होवू द्याव्यात. आणि एकमेकांच्या वेळात हास्य विनोद , प्रेमाने संवाद साधावे ज्यातून उत्साह वाढतो.

८. कधी कधी पिकनिक , दोन चार दिवस निसर्गरम्य ठिकाणी जावे. ज्यातून काम , इतर ताण तणाव यातून सुटका होवून शरीर आणि मन ही उत्साही राहील.

९. एकमेकांच्या आवडी निवडी , छंद जपा. जोपासा. कधी एकत्र मनोरांजनाचे कार्यक्रम बघा. पत्ते , बैठे खेळ खेळा. त्यातून उत्साह वाढतो. आलेला थकवा ही दूर होवून जातो. मन फ्रेश होते.

१०. एकमेकांना भरपूर वेळ द्या. नवरा बायको नात्यात एकांत ही गोष्ट ही खूप महत्त्वाची असते. घाई गडबडीत असेल तर पुरुष ही मग तशीच प्रतिक्रिया देतात. कायमच असे होत असेल तर शरीर मग लगेच थकते.

म्हणून दोघांचा वेळ हा सवड काढूनच द्यावा. एकांत असावा. त्यावेळी इतर सगळे विसरून केवळ दोघांचा विचार आणि कृती करावी.

बायको ला नवऱ्याच्या क्षमता , मर्यादा, कमतरता या सगळ्याच अगदी चांगल्या महिती असतात. म्हणून तिने ते जाणून तसे वागले पाहिजे. उपाय केले पाहिजेत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “नवरा खूपच लवकर थकत असेल तर अशावेळी बायकोने काय करावे ?”

  1. मला तुमचा लेख खूप चांगला वाटला मला आपल्या सोबत संपर्क करायचा असल्यास मी कसा करू शकतो माझा फोन no 9730440328

  2. खुप छान लेख आहे मला वाचुन खुप बरं वाटले

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!