Skip to content

अंतर्मन आणि बाह्यमन आपल्याला कसं कंट्रोल करतं ??? वाचा !

केमिकल लोचा …


आनंद ठाकरे

(पुणे)


हा शब्द आपण कुठल्यातरी हिंदी चित्रपटात एकला असेलच ! हा केमिकल लोचा सर्वांच्या डोक्यात असतो, तुम्ही आम्ही आपण सगळे, कुणीही त्याला अपवाद नाही. हा केमिकल लोचा जो असतो तोच ठरवतो की कुणाशी कस वागावं … कुणाला कसा प्रतिसाद दयावा, कस रिऍक्ट करावं, कसे निर्णय घ्यावेत, कुणावर रागवाव, कुणावर प्रेम करावं …

आता जरा सुज्ञ पद्धतीने समजून घेऊ या की हा केमिकल लोचा म्हणजे काय ? Qualified भाषेत सांगायचे झाल्यास त्याला आपण म्हणतो Mind Management … Brain Power ! मानवीय मेंदूत दडलेली असते ती प्रचंड बुद्धिमत्ता व त्याची विचार करण्याची अफाट कार्यक्षमता … पण मनुष्य आपल्या मेंदूचा वापर त्याच्या एकूण कार्यक्षमतेच्या फक्त ५ % एवढाच करतो अस अनेकदा वाचण्यात आलं, जर हे खरं असेल तर प्रश्न क्रमांक एक असा की फक्त ५ % मेंदूची कार्य क्षमता वापरून मनुष्य प्राणी जगात एवढे प्रॉब्लेम निर्माण करू शकतो किंवा एवढे प्रॉब्लेम Solve करू शकतो तर जेव्हा पूर्ण १०० % मेंदूचा वापर करणार तेव्हा काय होणार …

कल्पनाच न केलेली बरी, प्रश्न क्रमांक दोन असा की मनुष्य फक्त ५ % एवढीच मेंदूची कार्य क्षमता का वापरतो, बाकीची ९५ % का वापरत नाही ? कुणी अडवलं ही क्षमता वापरण्या पासून ? नाही कुणाकडे ह्याच उत्तर …

ह्या विषयावर वर मी जरा खोलात जाऊन विचार केला तेव्हा मला ह्याच गूढ उकलल … जगात अनेक स्वभावाची माणसे असतात, त्यांच्या स्वभावानुसार त्यांचे व्यक्तिमत्व Personality असते, एक व्यक्ती म्हणतो ” माझा स्वभाव खूप कडक आहे, मला असं तस बोललेलं चालत नाही ” दुसरा म्हणतो ” आपल्याला खोटं अजिबात चालत नाही, आपण जागच्या जागीच थोबाडीत लावतो ” तिसरा म्हणतो ” त्याला काय करायचं कर म्हणावं ” चौथा म्हणतो ” बर काय म्हणणं आहे आपलं, थोडं थांबा बघतो ” पाचवा म्हणतो ” थोडं धीर धरा साहेब सगळं नीट होईल ” सहावा म्हणतो ” आपलं म्हणणं मी शांतपणे एकल आता आपण मला जरा समजून घ्या ”

आता येथे Problem एकच पण त्याला मिळणारे प्रतिसाद वेगवेगळे, प्रतिसाद देणारे व्यक्ती वेगवेगळे … हे सर्वजण आपल्या केमिकल लोच्या नुसार तो प्रश्न हँडल करीत असतात ! ह्या पैकी कोण बरोबर व कोण चूक हे मी सांगू शकत नाही ते काळच ठरवतो …

आता ह्याची कारणमीमांसा शोधू यात ! प्रत्येक माणसाला दोन मन असतात, एक अंतर्मन व दुसरं बाह्यमन. बाह्यमन हे अंतर्मना पेक्षा Strong असतं, परंतु खरं हे आहे की अंतर्मन हेच जास्त Strong असत बाह्य मना पेक्षा. खरी गंमत अशी आहे की आपल्या पुढील प्रश्न हे बाह्यमन आंतर्मना पर्यन्त जाऊच देत नाही, प्रत्येक गोष्टीचा प्रतिसाद हे बाह्यमन देऊन मोकळं होत, बाह्यमन खूप चंचल असतं, ते विचारांवर चालत नाही तर अवतीभोवती च्या वातावरणावर चालतं, त्याला आपण म्हणू या Practically …

त्या कारणास्तव जी व्यक्ती बाह्य मनाने विचार करते ती व्यक्ती आपल्या मेंदूचा फक्त ५ % इव्हढाच भाग वापरते आणि उदभवलेले प्रश्न नीट सोडवू शकत नाही, या उलट अंतर्मन हे कृती करण्या अगोदर कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार करण्यास भाग पाडते, परिणामाची जाणीव करून देते मग ते Negative असो वा Positive …

बाह्यमनाचे निर्णय बरेचदा चुकीचे ठरू शकतात, परंतु अंतर्मनाचे निर्णय सहसा चुकत नाहीत … त्या मुळे अंतर्मनाच्या आदेशा नुसार काम करणारे व्यक्ती आपल्या मेंदूचा वापर ५ % पेक्षा जास्त करतात, ते कसे बघू यात ! एखादा उच्च शिक्षण घेत असलेला विद्यार्थी, तो नेहमी आंतर्मनाची हाक ऐकत असतो, कुणी कितीही त्याला अपयशाची भीती दाखवली तरीही तो आपले प्रयत्न सुरू ठेवतो, एखादा साधू असतो, ज्ञानी असतो तो शांत जागी जाऊन तपश्चर्या का करतो कारण शांतता जेथे असेल तेथच त्याला आपल्या आंतर्मनाची हाक एकता येते व त्याची साधना पूर्ण होते, बरेचदा दोन व्यक्तीचं जोरदार भांडण होत असत, भांडण करणारी व्यक्ती ही बाह्य मनाच्या आदेशानुसार भांडत असतात, परंतु भांडण सोडवणारा तिसरा व्यक्ती हा सल्ला देतो की तुम्ही दोघही आता घरी जावा आणि शांतपणे विचार करा, मगच ठरवा कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर ?

मग दोघेही घरी जातात व शांतपणे विचार करतात आणि मग भांडण मिटत, नेमका हाच अनुभव जेव्हा बायको सोबत भांडण किंवा मतभेद होतात तेव्हा सुद्धा येतो, जरा भांडण करायचं सोडून शांत जागी निघून गेल्यावर खरी चूक कुणाची आहे हे कळत, अर्थात Ego पोटी तो बरेचजण मान्य करीत नाही हा भाग वेगळा ….

बरेचदा समयसूचकता ज्याला कळते तो व्यक्ती त्याच खरं असतांना सुध्दा माघार घेते त्यात त्याला कमीपणा वाटत नाही, काही लोक तर खूप Sensitive असतात ” तो मला असं बोलला तर आता मी अस करणार वगैरे ” काहीजण शाब्दिक चकमकीने सुध्दा वाद वाढवतात, आपण बरेचदा अस ऐकतो की अमुक व्यक्ती ” पागल आहे यार, वेडी आहे, काय करणार काही नेम नाही ह्याचा, अमुक व्यक्ती खूप डॅशिंग आहे म्हणजे भीती वाटण साहजिकच, अमुक व्यक्ती खूप समजदार आहे, अमुक व्यक्ती खूप सहनशील आहे वगैरे, सर्वात महत्वाचं अस की कुठल्याही प्रॉब्लेम वर Solution काढताना आपल्या आंतर्मनाची हाक ऐका व त्या प्रमाणे निर्णय घ्या ! समजदारी घेणार असाल तर उत्तम, आक्रमक होणार असाल तर डाव तुमच्या बाजूने आहे किंवा नाही हे प्रथम खात्री करा …

तर असा असतो केमिकल लोचा … उर्फ Mind Management . जस व्यवसायाचं management असत, जस नोकरीत व्यवस्थापन असत, तस मेंदूचं पण व्यवस्थापन असत, जर आपल्याला सुखी राहावयाचे असेल तर आपला केमिकल लोचा नियंत्रित करा, बोलताना तारतम्य बाळगा, लगेच तावतावत प्रतिक्रिया देऊ नका, कुठल्याही गोष्टींचा दूरगामी काय परिणाम होतील ह्याचा विचार करूनच निर्णय घ्या.

जर खर Mind Management शिकायचं असेल तर अतिशय नम्र व संयमशील आदरणीय ” अमिताभ बच्चन ” ह्यांचे कडून शिकाव ! प्रत्येक शब्द तोलून मापून, नेहमी सावध प्रतिक्रिया … स्वतः कडे कमीपणा, हिमालया एवढ कर्तृत्व पण कुठेही मोठेपणा न मिरवणारा अभिनेता, मला खरच कौतुक वाटत ! लेख आवडल्यास प्रतिक्रिया द्या.


सौ. पाटील यांनी online counseling घेऊन दिलेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

8 thoughts on “अंतर्मन आणि बाह्यमन आपल्याला कसं कंट्रोल करतं ??? वाचा !”

  1. Narendra Bachchan Thatmurre

    अति उत्तम आपल्या जीवनात उपयोगी पडेल अशी

  2. खुप खुप सुंदर आहे हा लेख जीवन जगण्याची कला शिकवता सर तुम्ही खरंच खुप मोठे काम करत आहात सर तुम्ही. तुम्हाला मनापासून धन्यवाद

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!