Skip to content

लग्न न झालेल्या तरुण-तरुणींना आकर्षण विषयी मार्गदर्शन पर लेख.

लग्न न झालेल्या तरुण-तरुणींना आकर्षण विषयी मार्गदर्शन पर लेख.


आकांक्षा किरणराव आळणे,

लातूर


आकर्षण एक सुंदर भावना…!!!

कोणाची तरी,कशाची तरी,भुरळ पडणे,भारावून जाणे,एखाद्याचा आपल्यावर असणारा प्रभाव म्हणजे आकर्षण..!! अनेक लेखकांनी या अनुसरून पुस्तक,नोवेल्स लिहिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे Rhonda Byrne लिखित ‘द सीक्रेट’ या पुस्तकामध्ये ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ चा सिद्धांत खूप चांगल्या प्रकारे समजून सांगण्यात आला आहे. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी ते निश्चित वाचले असेलच..!!

‘Law of attraction’ हा सर्वच बाबतीत उत्तम रित्या काम करतो. ही कन्सेप्ट scientifically खरंच work करते.आपण आपल्या ध्येयापासून ते आपला नातेसंबंध पर्यंत या सर्व गोष्टी या सिद्धांताने मिळवू शकतो.

आता चर्चा करूयात भावनाशील आकर्षणाची. म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाची. कॉलेजमध्ये सेम क्लास मध्ये असणारा मुलगा मुलगी किंवा ऑफिसमध्ये असलेल्या colleague मध्ये आकर्षणाची भावना ही जागृत होऊ शकते. आकर्षणाला असा काही specific नियम नसतो म्हणजे एखाद्याला समोरच्याची कोणतीही गोष्ट आवडू शकते आणि तो समोरच्या व्यक्तीकडे खेचला जाऊ शकतो.

कोणाला कोणाचा स्वभाव आवडतो म्हणून आकर्षण असतं,कोणी सौंदर्य पाहून आकर्षिला जातो,तर कोणाला समोरच्याच व्यक्तिमत्व खूप प्रभावी वाटतं म्हणून अनेक जण आकर्षित होतात. Attraction,सहवास हवाहवासा वाटणे ती व्यक्ती आवडायला लागणे आणि मग प्रेमात पडणे असे सर्व;ही एक प्रोसेस असते-

“From attraction to fall in love deeply”

आकर्षण खूप casual असत आणि ते temporary आणि permanent दोन्ही ही असू शकत. Permanant Attraction असेल तर आकर्षणाचे रुपांतर प्रेमात होते आणि अतोनात प्रेम आहे म्हणून प्रेमाचं रुपांतर लग्नात होते. पण क्षणिक आकर्षणाचं काय..?? ते तर फक्त त्या-त्या क्षणापुरत असत. पण आज समाजात कित्येक तरुण-तरुणी या विळख्यात अडकलेले दिसतात.

क्षणिक सुख क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करतात. फक्त आणि फक्त आकर्षण आणि ते शारीरिक आकर्षण असल्यास वासनेच्या आहारी जाणे कितपत योग्य आहे…??

खरंच physical attraction ला महत्त्व द्यावे काय एवढे…???
आजच्या सर्व तरुण पिढीला हे प्रश्न पडतात. पण मित्रांनो सावधान…!!!

शारीरीक आकर्षण हे फक्त त्या क्षणापुरता मर्यादित असतं. ही शारीरिक आकर्षणाची भावना मनात डोकावत जरी असली तरी या भावनेला हवा देऊ नका, यात अडकू नका. भावनेच्या आहारी जाऊन आपले आयुष्य खराब करून घेऊ नका. आकर्षण असावं ते काही वाईट नसते आकर्षण असावं ते आपल्या ध्येयाचे, रंग-बिरंगी निसर्गाचे आणि समजा एखाद्या व्यक्तीचे पण आकर्षण असले तरी स्वतःच्या भावना पडताळून पहा कि नेमक्या कुठल्या गोष्टीने तुम्ही समोरच्या कडे आकर्षित झाला आहात.

विशेषतः तरुण पिढीला सांगावेसे वाटते की सोसायटी किंवा तुमच्या ग्रुप मध्ये cool दिसावं म्हणून रिलेशनशिप मध्ये जाणे,सामाजिकरित्या अमान्य कृत्य करणे हे वागणे योग्य नाही कारण पुढे चालून या गोष्टी आयुष्य बरबादच करतात. कधीच क्षणिक आकर्षणाला बळी पडून असे वागणे योग्य नसते.

जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्ती बद्दल वाटतं की तुम्ही या व्यक्ती शिवाय राहूच शकत नाही याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेले आहात हे म्हणजे लाईफ लॉंग वाटणारे अट्रॅक्शन ज्याचे रुपांतर प्रेमात झालेले आहे.

उदाहरणार्थ-

एखादी व्यक्ती आवडली, तुम्ही प्रेमात पडला,तर त्या व्यक्तीच्या सहवासात राहा, त्या व्यक्तीला समजून घ्या,त्या व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्ये आवडी-निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा,difference of opinion असेल तरी त्यांच्या मतांचा आदर करा, इमोशनल अटॅचमेंट किती आहे हे बघा,पण हे सगळे करण्याआधी स्वतःला प्रामाणिक पणे विचारा की हे सर्व क्षणभंगुर आहे की खरंच आपले फक्त आकर्षण नसून समोरच्या व्यक्तीवर खरे प्रेम आहे. कारण फसवणे आणि फसवल्या जाणे हा आजकालचा trend बनत चालला आहे.कोणाला फसवू नका आणि कोणाकडून फसवल्या जाऊ पण नका…!!!

So guys be alert..!!
बचके रेहना रे बाबा बचके रेहना रे….तुझ पे नजर है…!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!