विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना आपल्या बायकोची किंवा नवऱ्याची भिती नसते का?
टीम आपलं मानसशास्त्र
विवाहबाह्य संबंध यातच आले की , आपले लग्न बंधनातले जोडीदार सोडून इतर जोडीदार त्या सोबत / तिच्या सोबत ठेवलेले संबंध.
अर्थात हे विवाह बाह्य संबंध हे एकमेकांच्या इच्छेने होतात.त्यात कोणी कोणावर जबरदस्ती नक्कीच करत नाही.
विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना का ठेवावे वाटतात हे संबंध ?
१. आपापल्या जोडीदाराकडून सुख , शांती , समाधान मिळत नसेल. आणि मग अशी कोणी जवळची व्यक्ती जी कायम संपर्कात असेल , किंवा पूर्वी ची एखादी व्यक्ती जे प्रेम अपूर्ण राहिले असेल ती भेटली किंवा समजून घेवून आधार आणि सुख देणारी व्यक्ती भेटली तर.
२. आर्थिक गोष्टी मध्ये ही काही अडचण असेल किंवा आर्थिक गोष्टींची पूर्तता होत नसेल तर जी व्यक्ती तसा आधार देईल त्या व्यक्तीच्या सहवासात येते.
३. कधीं कधीं दोघांचे ही जोडीदार अरसिक असतात. आवडी निवडी , छंद , कला गुण यांची जाणीव ही नसते. आणि त्याची कदर ही नसते.
त्यामुळे अशी रसिक वृत्तीची जोडीदार मिळाली / मिळाला एकमेकांच्या गुणांची जाणीव असलेली व्यक्ती मग कायम साथ असावी वाटते त्यातून मग जवळीकता वाढते.
४. शारीरिक संबंध , मानसिक आणि भावनिक , वैचारिक गोष्टी हे जरी समाधानकारक नसतील ,तर त्याची उणीव बाहेर कुठून भरून निघत असेल तर.
अर्थात विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती मध्ये एक विवाहित दुसरी अविवाहित ही असू शकते. किंवा दोघेही विवाहित असू शकतात. तर कधी विधुर , विधवा हे सुधा असे संबंध ठेवू शकतात.
विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना आपल्या बायकोची किंवा नवऱ्याची भिती नसते का?
अर्थातच असणार ना !! केवळ नवऱ्याची / बायकोची च नव्हे तर मुले मुली , आई वडील , भाऊ , भावजय , नणंद , मेव्हणा , सासू सासरे , नातेवाईक , मित्र मंडळी , समाज , ऑफिस मधले सहकारी , जवळचे शेजारी या सगळ्यांची भीती ही नक्की असणारच.
परंतु एकमेकांच्या सहवसा ची ओढ , प्रेम , आपुलकी , आणि मिळणारा आनंद , सुख मग भावनिक , मानसिक , शारीरिक शांतता याची तीव्रता खूप जास्त असतें . आणि मनोवृत्ती खूप बिनधास्त होत जाते. आपल्या आयुष्यात आपल्या मनासारखे घडावे ही इच्छा असते. आजपर्यंत sacrifice करत आलेले असतात. पण त्यातून आपल्या खऱ्या जोडीदाराशी चर्चा करून , समजावून सांगून , वाद घालून ही त्यांच्यात बदल घडून येत नसतो. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न सोडून दिला जातो.
आणि इथूनच सुरुवात होते आपल्या इच्छा , मन कायम मारून का जगायचे ? आपल्याला आयुष्याचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. हे आयुष्य एकदाच मिळते म्हणून ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला जातो.
अशा वेळी इतर सर्व लोक , जोडीदार यांची भीती वाटत असली तरी मनोवृत्ती ही थोडी बेफिकीर होते. त्यात जेव्हा विवाहबाह्य संबंध ठेवले तरी ते ठेवणारे एकमेकांना कायम साथ देण्याचे आश्वासन आणि तशी खात्री देतात. त्यामुळे काही झाले , अगदी जग विरूद्ध गेले , आपले खरे नवरा बायको यांची भीती ही सुरुवातीला जास्त असते.
काय म्हणतील , काय होईल पण जेव्हा हळूहळू यांच्यातलं बदल बघून सुरुवातीला वाद घालणारे जोडीदार , किंवा प्रयत्न करून ही त्या आनंदी , सुखी गोष्टी देवू शकत नसतील . तर ते ही बोलणे सोडून देतात. आणि बाहेर काही आहे याची खात्री झाली तरी गप्प आणि शांत बसतात.
काही वेळेस कायद्याने आपणच अधिकारी आहोत. मुले मुली यांची जबाबदारी , आर्थिक भार स्वीकारतात ना , घरासाठी करतात ना सगळी कर्तव्य, आपल्याला कोणत्याही गोष्टीचा तसूभर त्रास होत नाही ना , आपले घर , पैसा , मुले , आर्थिक भार उचलतात हे समाधान असते. आणि काही कमी पडू देत नाहीत. कर्तव्य उत्कृष्ट पार पडत असतात .
काही वेळेस या दोघात खरेच शारीरिक संबंध ही चांगले असतात. तरी बाहेर ही संबंध ठेवले जातात. याचे कारण नाविन्याची आवड . किंवा जास्त गरज ही असते. ती पूर्ण करण्याकरिता बाहेरचे संबंध. पण अशा परिस्थिती मध्ये मग कायद्याने असलेला जोडीदार ही दुर्लक्ष करतो. त्या गोष्टींची सवय होवून जाते.
विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना आपल्या बायकोची किंवा नवऱ्याची भिती ही कायम असतेच. एकत्र बाहेर असताना कधी पाहिले तर, कोणाकडून समजले तर. , आणि त्याचे परिणाम काय होतील याची जास्त भीती , स्त्री असेल तर तिला मारहाण , किंवा पुरुष असेल तर त्याची बायको भावनिक दृष्ट्या torcher तर कधी आत्महत्येचे प्रयत्न करून धमकी देते. पुढे काही इलाज नसेल की हाच प्रयोग किंवा धमकी म्हणजे आपोआप जोडीदार कायदा समाज या भीतीने शांत राहतो.
याउलट विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना आपल्या बायकोची किंवा नवऱ्याची भिती ही कायम असतेच मात्र एकमेकांची साथ एवढी घट्ट असते की जे होईल त्याला एकत्र तोंड देण्याची ही तयारी असते. किंवा एक एकटे असतील तरी येईल त्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्याची तयारी असते.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे समाजात राहताना तिथले नियम , पद्धती या पाळव्या लागतात च. विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना त्यांचे वैयक्तिक आनंद जरी महत्वाचे असतील तर ते कायदा आणि समाज या चौकटीच्या बाहेर जावू शकत नाहीत.
म्हणजे थोडक्यात काय तर हे विवाह बाह्य संबंध हे चोरून , इतरांच्या पासून लपवून च ठेवले जातात. त्याला मर्यादा या असतातच. आणि किती ही समाधान, शांतता , आर्थिक, मानसिक आधार मिळत असेल तरी त्याला ही मर्यादा येतात.
आधी स्वतः कौटुंबिक कर्तव्य , जबाबदारी पार पाडणार त्या मुख्य प्रायोरिटी असतात. त्यातून वेळ , आवड , सवड , गरज , जागा या गोष्टींची जशी सोय होईल तसे ते ठेवले जातात. म्हणजे प्रायोरिटी कधीच नसते.
पुरुष हा त्यातल्या त्यात खंबीर असतो. तो कोणत्याही परिस्थिती मध्ये तोंड देवू शकतो. कोणाशी ही युक्तिवाद किंवा शक्ती सामर्थ्य दाखवू शकतो.
मात्र स्त्री ही भावनिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या ही कमकुवत असतें . त्यामुळे ती थोडी जास्त घाबरते.
विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना आपल्या बायकोची किंवा नवऱ्याची भिती असतेच.
१. एक तर आपल्या या विवाह बाह्य संबंधा ची माहिती कळली तर ची भीती.
२. त्यावरून आपले नवरा बायको काय आणि कसे react होतील याची .
३. आपल्या विवाहबाह्य संबंधाची माहिती नवरा / बायको ला समजल्यावर होणाऱ्या परिणामांची भीती असते. आणि त्यातून मुलांवर होणाऱ्या मानसिकता , संस्कार आणि परिणाम यांची ही भीती असते.
४. अगदी पुढे जावून घटस्फोट होईल का याची भीती .
पण घटस्फोट त्याला सामोरे जाण्याची ही काहींची तयारी असते. काहींची नसते म्हणून ही घाबरतात.
५. समाज , कायदा , नातेवाईक हे जोडीदाराच्या बाजूने असल्यामुळे ही भीती असते.
६. आणि सगळ्यात शेवटी विवाहबाह्य संबंध समजल्यावर आपली बायको किंवा नवरा हे आपल्या विवाहबाह्य संबंध असलेल्या पार्टनर ला काही करतील का ? त्रास देतील का ? कायदा असेल किंवा भावनिक , शारीरिक दृष्ट्या काही त्रास देतील का ? याची ही भीती असते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख आवडला
Nice
Mahiti khup chan ahe.
Purush kharch jr samjdar asel tr tya Parstrila sodun deun aaplya kutumba kde laksh deil… Pn ase hot nhi… Mi geli 5 varsh hya vedana anubhvtiy… Sgl gosthi krun pahilya… Kahich fark pdta nhi… Ani aayushyat etak khot bolt alelya mansavr ata vishwas tr ajibat theu skt nhi… Satat bhadane… Vatat divorce ghyava… Pn mulanch ky honar… Tynch future ky mg… Hya vicharan… Ajun shant bsn… Pn mi khup mentali week hot ahe… Swatala smjavn ani gapp basn…
Jr ekhadya strila aaplya paticha vivah bahya sambhandh aahet he smjl.aani tya nantr nvryane aapli chuk kabul krun magch sgl visrun punha nvyane jivan jgnyachi tayari dakhvli tr tya nvryala eccept krayla hav ki nko…
Mahila aaj ghrbrat nay kayda mahila kaun jagachi laj sodun kityk mahila thodese sukh ghetat anek mahila ya sukhchya bali padta koni kunache naste
Pan jya stri kiwa purushache vivah bahya sambandh astat tyani kay karawe pudhe . Samaj ,lok ya saglyapudhe aapke man Marat jagawe ka ?ni ya prashnach Uttar kay vivah bahya sambandh yogya ki ayogya.? Ni jya wyaktila tyachya partner wishai kahich watat nahi tar asha stri kiwa purusha ne kay karawe