लग्न झालं की अनेक रात्री विचारांची घालमेल सुरूच असते,नेमकं काय होत असेल…?
हर्षदा पिंपळे
लग्न…आयुष्यातील एक महत्त्वाचा संस्कार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे लग्न…! कुणी त्याला बंधन म्हणून संबोधतं तर कुणी त्याला एक कमिटमेंट म्हणून पाहतं.प्रत्येकाचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगवेगळा आहे.आता कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी माणूस हा विचार करतोच.मग ते लग्न असो वा आयुष्यातील कोणतीही गोष्ट.
इतकच नाही तर माणूस हा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत असतो.कधी घडणाऱ्या तर कधी घडून गेलेल्या गोष्टींवरही. अगदी तसच लग्न करणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नसते.लग्न म्हणजे सारासार सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो.
लग्नाआधी आणि लग्नानंतर काही गोष्टी बदलतात. आणि लग्न म्हणजे केवळ दोन आत्म्यांच मिलन नाही तर दोन कुटुंब तेव्हा एकत्रितपणे जोडली जातात.त्यामुळे लग्न हे काही दोन जीवांपुरतं मर्यादित राहत नाही.त्यामुळे कदाचित काही गोष्टी प्रकर्षाने जाणवत असाव्यात. आता लग्न झालं की विचारांची घालमेल सुरू होते.पण ही घालमेल होणं अगदी स्वाभाविक आहे.
कारण एरवी कोणत्याही गोष्टीवरून माणसाच्या मनात विचारांची वादळं ही येतच असतात. अगदी तसच या लग्नाच्या बाबतीत ते तंतोतंत लागू होतं.लग्नाआधी आणि लग्नानंतरही विचारांची घालमेल ही सुरूच असते.आणि आता प्रत्येक जण काय विचार करत असेल ते आपण नेहमीच सांगू शकत नाही.कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत , क्षमता ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते.आता प्रत्येकाच्या मनात लग्न झालं की विचारांची वेगळीच घालमेल सुरू होते.
आता नेमकं काय होत असेल हे खरं तर जाणणाराच जाणतो. पण तरीही विचार करायचा झाला तर लग्न झाल्यावर मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार पिंगा घालत असतात. आता असं नाही की लग्न करून मुलगी सासरी आली , तिचं घर सगळं काही सोडून आली म्हणून केवळ एका मुलीच्याच मनात विचार घोळत असतील. तर केवळ मुलगीच नाही तर मुलाच्याही मनात विचारांची घालमेल ही सुरू असते.कारण लग्न काय एकट्याच होत नाही. ते दोन जीवांच होतं.त्यामुळे दोघांच्याही मनात विचार घोंघागवणं अगदी स्वाभाविक आहे.
आता सगळेच काय विचार करत असतील हे निश्चितपणे सांगू शकत नाही पण साधारणपणे एक अंदाजे आपण थोडफार समजू शकतो.
जस की……
*जबाबदारी – दोघांच्याही मनात आपल्यावर आता हळुहळू जबाबदारी वाढत आहे. ती आपल्याला व्यवस्थितपणे सांभाळता येईल की नाही असा विचार चालू असतो.
*सलोखेपण –
सगरी नवीन नाती असल्याने त्यांच्याशी जुळवून घेता येईल नं…? पूर्वीसारखं नात्यातील सलोखेपण जपता येईल नं…? की या लग्नामुळे त्यात काही अडथळा निर्माण होईल…. वगैरे वगैरे असा विचार करण्यात अनेकदा कित्येकजण हरवून जातात.
*काळजी – आयुष्यात नवीन माणसांची काळजी करण्यात मन गुंग झालं तर जुन्या माणसांकडे दुर्लक्ष तर होणार नाही नं या विचाराने मन खायला उठत असावं.
*शारीरिक-मानसिक मिलन,गरजा-
या दोन्ही गोष्टीसुद्धा मनात वेगळच काहूर माजवतात. काय नी कसं होईल , एकमेकांच्या शारीरिक- मानसिक गरजा समजून घेता येतील नं…? की आपण कुठे समजून घेण्यात कमी पडू…असा विचार क्षणभर का होईना मनात येऊन जातोच.
*स्वप्नांची पूर्ती- आता प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात. तर लग्नानंतर मनात एक भीती असते , काळजी असते.की आता स्वप्नांच काय…? माझ्या स्वप्नांना सपोर्ट असेल नं….असा विचार मनात घर करून राहतो.
थोडक्यात काय तर लग्नाआधी जशा असतात तशाच लग्नानंतर जबाबदाऱ्या ह्या वाढत जातात. मग लग्नानंतर झोप लागत नाही. कित्येक रात्री विचारांची घालमेल सातत्याने सुरूच असते.कुटूंबातील वाढत्या जबाबदाऱ्या , प्रत्येकाला समजून घेणं , आपण एका घरातील मुलगी घेऊन आलो आहोत , तिला व्यवस्थित सांभाळता येईल नं…? ती व्यवस्थित जुळवून घेईल नं…? प्रत्येक गोष्टीत एकमेकांची प्रामाणिक साथ असेल नं…? वगैरे वगैरे विचारांची रेलचेल लग्न झाल्यानंतर ही चालू राहते.
आयुष्यात वेगवेगळे बदल होणार असतात… आणि याचमुळे विचारांनी मन बैचेन होऊन जात असावं.त्यामुळे जास्त विचार करू नका.जगणं सुंदर आहे,मोकळा संवाद साधा.आणि आयुष्य जगण्याचे मार्ग मोकळे करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
