शारीरिक संबंध ठेवताना टेंशन सारखे विचार कराल तर दोघांनाही तृप्त आनंद घेता येणार नाही.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
पैशांपासून ते रोजच्या कामाच्या डेड-लाईन्स सांभाळण्यापर्यंत माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या टेन्शन ला सामोरे जावे लागत असते. त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तर होतच असतो. पण त्याच बरोबर आनंदाचे क्षण, ज्यातून प्लेजर मिळत,असे क्षण देखील उपभोगताना त्याची energy कमी पडू शकते.
अशा बऱ्याच चिंतांचा सामना केल्याने तुमच्या लैंगिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. लैंगिक संबंध हे आनंददायी असले पाहिजेत, पण रोजच्या टेन्शनने किंवा आपल्या sexual performance बद्दल सतत चिंता केल्याने आपण त्याची मजा घेऊ शकत नाही आणि आपला पार्टनर देखील यामुळे suffer करतो.
कारण या गोष्टीचा आनंद दोघांना ही घेता यायला हवा, पण एका व्यक्तीच्या जरी डोक्यात टेन्शनस किंवा कसल्याही प्रकारच्या चिंता चालू असतील तर त्या माणसाचं संपूर्ण लक्ष त्या क्रियेत नसल्याने त्याचा आनंद दोघेही घेऊ शकत नाही. आणि शारीरिक संबंधांत तृप्ती न मिळाल्याने देखील फ्रस्ट्रेशन अजून वाढण्यात त्याची भर पडते. वैवाहिक जीवनात शारीरिक आणि मानसिक असं दोन्ही प्रकारचं सुख मिळत असल्यास आयुष्याची गाडी नीट रुळावर चालत असते.
शारीरिक संबंध हे शरीरापुरते मर्यादित नसतात, तुमच्या भावनांचा देखील त्यात मोठा रोल असतो. जेव्हा तुमचा मेंदू खूप चिंतेत अडकलेला असतो तेव्हा तुमचे शरीर देखील उत्तेजित व्हायला अडथळे येतात. इथे आपण फक्त रोजच्या चिंतेबद्दल बोलत नसून शारीरिक सुख विषयीच्या सुद्धा ज्या चिंता असतात त्यादेखील आपल्या परफॉर्मन्स मध्ये अडथळे आणू शकतात.
टेन्शन किंवा चिंता या कॉर्टिसोल आणि एपिनेफ्रिन सारख्या हार्मोन्सच्या प्रकाशनास चालना देतात, ज्यामुळे उच्च पातळीमध्ये लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. जेव्हा तणाव दीर्घकाळ असतो, तेव्हा शरीर उच्च कोर्टिसोल उत्पादनाच्या वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी सेक्स हार्मोन्स वापरते, ज्यामुळे तुमच सेक्समधील स्वारस्य कमी होते.
तणावाचा जसा शरीरावर परिणाम होतो तसाच, एक मानसिक पैलू देखील आहे. तणावामुळे तुमचे मन व्यस्त, स्तब्ध होऊ शकते आणि शारीरिक सुखाची इच्छा किंवा दरम्यान present राहण्यापासून तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. हे तुमच्या मनःस्थितीवर देखील परिणाम करू शकते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्य येते, ज्यामुळे कामवासना कमी होऊ शकते.
या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता.
१. तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. तुमच्या चिंता त्यांच्यासोबत share करा, कदाचित ते तुम्हाला त्याचे उपाय देखील सांगू शकतील. आणि नुसतं share केल्याने देखील मन थोडं मोकळं होऊन थोडा डोक्यावरचा भार कमी होऊ शकतो. जेव्हा तुम्ही कपल म्हणून तोडगा काढता किंवा तसा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येत असता. आणि याचा फायदा तुमच्या शारीरिक संबंधात होतो.
२. स्वतःच लक्ष चिंतेपासून विचलित करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवताना तुम्ही रोमँटिक संगीत लावू शकता, रोमँटिक मूवी लावू शकता. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या गोष्टीचा विचार करू शकता. लैंगिक कार्यक्षमतेच्या चिंतेसाठी मदत मिळवा जेणेकरून तुम्ही निरोगी आणि आनंददायक लैंगिक जीवनात परत येऊ शकता.
३. थेरपिस्टशी बोला. लैंगिक समस्यांवर उपचार करण्याचा अनुभव असलेल्या समुपदेशक किंवा थेरपिस्टची भेट घ्या. थेरपी तुम्हाला समजून घेण्यास आणि नंतर तुमच्या लैंगिक कार्यक्षमतेची चिंता निर्माण करणाऱ्या समस्या कमी करण्यास किंवा त्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला अकाली उत्सर्गाबद्दल काळजी वाटत असेल, उदाहरणार्थ, तुम्ही काही तंत्रे वापरून पाहू शकता जे तुम्हाला अधिक नियंत्रण मिळविण्यात मदत करतात.
४. या परफॉर्मन्स च्या चिंतेवर मात करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. तुम्हाला या सुखाच्या कार्यक्षमतेची चिंता वाटत असल्यास, तुम्ही एखाद्या विश्वासू मित्राला किंवा डॉक्टरांना त्याबद्दल सांगू शकता. जेणेकरून डॉक्टर तुमची तपासणी करतील आणि आरोग्याची स्थिती किंवा तुम्ही घेणारी औषधे तुमच्या समस्यांचे कारण नाही याची खात्री करण्यासाठी काही चाचण्या करतील.औषधे आणि इतर थेरपी इरेक्टाइल डिसफंक्शन आणि शारीरिक कारणे असलेल्या इतर लैंगिक समस्यांवर उपचार करण्यात मदत करू शकतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


