Skip to content

एकमेकांशी भांडण होत नाही, म्हणून या गोष्टींवरून सुद्धा भांडणे केली जातात.

एकमेकांशी भांडण होत नाही, म्हणून या गोष्टींवरून सुद्धा भांडणे केली जातात.


सुधा पाटील

समुपदेशक


हे वाक्य खरंच पटतंय का वाचकांना? …..चला यावर बोलूच थोडंस! काहींना हे पटेल….तर काहींना अजिबातच पटणार नाही.कारण मुळातच घरात शांती रहावी यासाठी भा़डणं टाळली जातात.कधी कधी परस्परांमधील वादाचे मुद्दे शोधून ते जाणीवपूर्वक टाळले जातात.अशी जोडपी अस्थित्वात आहेत.पण तुम्हाला गंमत वाटेल…

या भूतलावर अशीही काही जोडपी आहेत ज्यांना असं वाटतं की, आमच्यात कधीच भांडणं होतं नाहीत.त्यामुळे जीवन कसं मिळमिळीत वाटतं. नवरा बायको यांच्या नात्यात कधीमधी भांडणं व्हायलाच हवीत.तरंच म्हणे प्रेम वाढत! पण भांडणाने प्रेम वाढत असतं तर या जगात सर्वात सुखी भांडणारी जोडपी दिसली असती.

“या जगात प्रेमाने प्रेम वाढतं” असा सर्वसाधारण समज आहे आणि तो खराही आहे.पण हेही दोन व्यक्तींच्या सामंजस्यावर अवलंबून असतं.जिथे दोन समजदार व्यक्ती एकत्र येतात तिथे नेहमी सामोपचाराने प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढला जातो.भांडणं तिथेच होतात जिथे एकमेकांचा अस्वीकार असतो.एकमेकांच्या ईच्छांचा अस्वीकार होतो!

पण जिथे दोघेही एकमेकांच्या मतांचा आदर करतात,एकमेकांचं वेगळेपण स्वीकारतात,एकमेकांची स्पेस एकमेकांना देतात तिथे खरंच भांडणाची गरज आहे का?मला वाटतं…नसावी….कारण भांडण ही गोष्ट दुरावा निर्माण करणारी,नावडणारी गोष्ट आहे.ते थोडक्यात असतं तोवर त्याचं गांभीर्य नसतं…पण भा़डण जेव्हा विकोपाला जातं तेव्हा त्या नात्यातील आपलेपणा संपत जातो.म्हणूनच एखाद्या नात्यात भांडण नाही म्हणून भांडण काढत बसणं हा शुद्ध मुर्खपणा ठरतो.हां! कधी कधी वैचारिक मतभेद असू शकतात.पण त्यांच रुपांतर भांडणात होऊ नये.

मी स्वत: काही नाती अशी पाहिली आहेत की,जिथे त्यांना एकमेका़त भांडणं होत नाहीत अशी तक्रार आहे.त्यामुळे मुद्दाम भांडणं उकरुन काढली जातात.खूपदा बऱ्याच बायकांची ही तक्रार असते की,माझा नवरा माझ्याशी कधीच भांडत नाही… किंवा मला कशालाच विरोध करत नाही.अरे कधीतरी भांडणं असावीत दोघात!….याउलट नवरेही असतात…..

अशा ठिकाणी मग उगाचच गरज नसताना दोघांपैकी एकजण मुद्दाम भांडणं उकरुन काढत बसतो.पण जिथे खरंच समजूतदार असतो तिथे… खरंच भांडणाची आवश्यकता असते का? किंवा असावी का?……जर उगाचंच इतरांच ऐकून भांडणं होत नाहीत म्हणजे नात्यांत काहीच थ्रील नाही…. किंवा असं नातं मिळमिळीत वाटतं असा फालतू विचार करून जर तुम्ही उगाचंच भा़डणं निर्माण करत बसलात तर नकळतच तुमच्यातील सामंजस्य हळूहळू कमी होत जाईल.

कारण सामंजस्य ही जशी एक मानसिकता आहे तशीच भांडणं करत राहणं ही देखील एक मानसिकता आहे.ज्याला तुम्ही जास्त खतपाणी घालता ती मानसिकता बळावत जाते.पटत नसेल तर प्रयोग करून पहा.एखादी कृती वारंवार करत राहिल्यास ती हळूहळू, आपल्या नकळतच ती सवय बनून जाते.आणि ही गोष्ट प्रत्येक गोष्टीत़च घडत असते….

काही जणांना पटणार नाही पण खूपदा असं काही जणांना वाटतं की,आमच्यात नेहमीचं समजूतदार असतो.पण कधीतरी भांडण असावं… त्याशिवाय मज्जा नाही…. जेवणात जसं नेहमीच गोड असेल तर कंटाळा येतो….. तेव्हा तिखट हे हवंच….असा विचार मांडला जातो.पण सारेच विचार साऱ्याच परिस्थितींना लागू पडतात असं नाही ना!

समजूतदार पणाने आयुष्य सुंदर सुरु असेल तर मग उगाचच भांडणे उकरायचीच कशाला? भांडणं नाही म्हणून भांडण करणं हा शहाणपणा असूच शकत नाही.कारण सतत भांडणारी माणसं आत्मपरिक्षण करुन भा़डणं कमी करण्याचा प्रयत्न करतात.मग जिथे मुळातंच शांती असते तिथे अशांती आणायचीच का?

असो शेवटी ज्याची त्याची एक ठराविक विचारसरणी असते.त्यानुसारच जो तो वागत असतो.जो वैचारिक मंथन करतो तो आपलं आयुष्य वैचारिक पातळीवर जगण्याचा प्रयत्न करतोच करतो.एखादा विचार पटायला किंवा आचरणात आणायला शेवटी ज्याचा त्याचा दृष्टीकोन बदलावा लागतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “एकमेकांशी भांडण होत नाही, म्हणून या गोष्टींवरून सुद्धा भांडणे केली जातात.”

  1. Bhagvan Chougule

    सुधा पाटील यांचा नंबर मिळेल का

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!