Skip to content

कोणत्याही टेंशनचा परिणाम शरीर संबंध ठेवताना होऊ शकतो का??

कोणत्याही टेंशनचा परिणाम शरीर संबंध ठेवताना होऊ शकतो का??


टीम आपलं मानसशास्त्र


योग्य व्यक्तीकडे भावना व्यक्त केल्या की ताण-तणाव कमी होतो. भावना हा विषय emotional intelligence म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता याच्याशी निगडित आहे.

भावनिक बुध्यांक जेवढा जास्त तेवढे एकमेकांना समजून घेणे जास्त जमते.एकमेकांच्या भावना जास्त चांगल्याप्रकारे समजतात..खरे तर म्हणूनच जेव्हा मित्र मैत्रिणी असोत. प्रियकर प्रेयसी, दोन भावंडे असोत, किंवा नवरा बायको असोत किंवा जवळची नाती यात एक कोणी तरी कायम समजून घेणारी व्यक्ती असते म्हणजेच काय तर त्या व्यक्तीचा भावनिक बुध्याअंक जास्त असतो.emotional intelligence quotient जास्त असतो.

बरेचदा आयुष्यात अशी किंवा अशा काही मोजक्या व्यक्ती असतात की त्यांच्या बरोबर आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो.
आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपली मानसिक, भावनिक अवस्था कशी द्विधा आहे..किंवा बरेचदा आपल्याला जे म्हणायचे आहे ते इतर लोकांना समजतच नाही..

आणि तेव्हा हे भावनिक दृष्ट्या समजून घेणारे लोक शांतपणे आपले ऐकून घेतात..त्यांना आपल्या भावना जास्त चांगल्या प्रकारे समजतात .आणि त्यांच्या बरोबर बोलण्याने बरेचदा आपल्याला काही मार्ग सुचत असतात.पर्याय सुचत असतात. किंवा कोंडलेल्या भावनांची सुटका..

ताण तणाव म्हणजे काय तर ही एक नकारात्मक प्रतिक्रिया किंवा भावना आहे. एखादी गोष्ट आपल्या कंट्रोल मध्ये नसेल तर, किंवा बाह्य परिस्थिती मध्ये होणारा बदल आपण पटकन accept करत नाही त्यामुळे आपल्या मनाची होणारी अवस्था म्हणले तरी चालेल .

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला

रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी

अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती

छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला

जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली

खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला

कोणत्याही टेंशनचा परिणाम शरीर संबंध ठेवताना होऊ शकतो का??

याचे उत्तर नक्की हो आहे.

दोघापैकी कोणाही जोडीदाराला काही टेन्शन असेल . घरात कोणाला टेन्शन असेल , आर्थिक गोष्टींचे टेन्शन असेल , मानसिक ताण , तणाव असेल , आजारपणं मग कोणाचेही , ऑफिस चे टेन्शन असेल. तर कधी घराचे टेन्शन असेल , जागेचे असेल अनेक प्रकारची टेन्शन , अगदी वेळेत पोहचायचे टेन्शन ,

कोणत्याही प्रकारच्या टेन्शन चा परिणाम हा शरीर संबंध ठेवताना हा नक्कीच होतो.अशावेळी शरीरात अॅड्रीनलीन नावाचे हार्मोन्स तयार होतात. त्यानंतर शरीर त्याला प्रतिसाद देतं. यालाच स्ट्रेस किंवा ताण म्हणतात.

शारीरिक संबंधा मध्ये टेस्टेटोरोन या हार्मोन्स ची निर्मिती होत असते. पण ताण वाढला की त्याचा परिणाम यावर होतो. अर्थात टेन्शन हे आपल्या ब्रेन पर्यंत भावना पोहचतात . ब्रेन त्यानुसार react करतो. म्हणून त्याचा परिणाम शरीरावर ही होतो. आणि टेन्शन मध्ये असेल तर शरीर तेवढ्या मोकळेपणाने , रिलॅक्स होवून प्रतिसाद देत नाही. त्यामुळे भावनिक असो अथवा शारीरिक कोणतेच संबंध नीटपणाने होवू शकत नाहीत. त्यामध्ये अडथळे येतात.

मन दुसऱ्या गोष्टींचे विचार करत असते त्यामुळे शरीर तशी साथ देत नाही. आणि मग शरीर आणि मन एकरूप होवून त्यातला आनंद , सुख मिळवू शकत नाहीत.

जेव्हा आनंदी व्यक्ती असते. कोणतेच टेन्शन नसते. तणावमुक्त असते व्यक्ती तेव्हा भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप समाधान आणि शांतता असते.

आपण पाणी पिण्यासाठी glass उचलला आणि त्यात अगदी कोंथिबीर जरी चुकून पडली असेल तरी ते पाणी पिताना मनात अनेक विचार येतात.

एका हॉटेल चे ओपनिंग असते. सुंदर interior केले असते. एका वॉल वर सगळ्या टाइल्स लावल्या असतात. आणि त्यातली एकच tile वेगळी असते. त्याच tile कडे सतत सगळ्यांचे लक्ष जात असते. अख्ख्या हॉटेलचे interior एव्हढे अप्रतिम असते तरी सगळे त्या एका tile बद्दल चर्चा करत असतात. आणि त्याची खंत असते मनात.

तसेच आहे .शारीरिक असो , भावनिक , मानसिक संबंध अतिशय चांगले असतील , त्यात सुख , आनंद असेल तरी यात एखादी टेन्शन ची गोष्ट असेल तरी तो आनंद , सुख बाजूला राहते आणि जो त्रास आहे त्याकडे लक्ष जाते. आणि त्यातून बरेचदा ती गोष्ट तशी मनापासून केली जात नाही.

आयुष्य सुंदर आहे. प्रत्येकाला कुठे ना कुठे टेन्शन आहे. पण त्याचा परिणाम आपल्या नाते संबंध , भावनिक ,. शारीरिक संबंधांवर होवू देवू नका. ती गोष्ट त्या काळा पूर्ती तरी बाजूला ठेवा. आणि चांगल्या , आनंदी , सुख देणाऱ्या गोष्टी मनापासून आणि मोकळेपणाने करा. आपल्या जोडीदाराला आपले टेन्शन सांगा. त्यामुळे मन हलके होईल आणि आपल्याला साथ , सोबत , समजून घेतील , मार्गदर्शन ही मिळेल आणि सुरक्षितता . मग ती भावनिक मिळाली की शरीर ही तशी प्रतिक्रिया देईल. साथ देईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!