Skip to content

आपल्यातल्या Neurotic Needs (अवास्तव गरजा) समजून घेऊ.

तुम्हाला neurotic needs विषयी माहिती आहे का? चला समजून घेऊ.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपण सर्व माणसं आहोत. आता माणूस म्हटलं की अडचणी या आल्या, हेवेदावे, नात्यातील रुसवे फुगवे, कोणतरी आपल्या प्रेम करावं, आपण काहीतरी करून दाखवाव हे सर्व आल. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी चिंता वाटणं, असुरक्षित वाटणं हे देखील आला. ही सर्व माणूसपणाची लक्षण आहेत. पण यामध्ये जेव्हा बिघाड होतो.याचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा व्यक्ती neurotic होते आणि अश्या व्यक्तींच्या स्वतःच्या काही गरजा निर्माण होतात.

प्रसिद्ध मनोविश्लेषक Karen horney यांनी neurosis वर सिद्धांत मांडला. त्यात त्यांनी अश्या neurotic व्यक्तीच्या १०गरजा मांडल्या आहेत ज्यांचे वर्गीकरण तीन भागात होते.

1. गरजा ज्या व्यक्तीला दुसऱ्यांकडे नेतात: या अशा गरजा आहेत ज्यामध्ये व्यक्ती दुसऱ्याकडून सतत खात्री व स्वीकार मागत असते. त्यांना समोरच्या व्यक्तीकडून संमती व प्रेम हवं असतं.

2. गरजा ज्या व्यक्तीला दुसऱ्यांपासून दूर नेतात: या गरजा मधून समाज विरोधी व आक्रमक वर्तन तयार होतं. अशा प्रकारच्या व्यक्ती बरेचदा भावनाशून्य, अलिप्त व उदासीन मानल्या जातात.

3. गरजा ज्या दुसऱ्याविरुद्ध जातात: या गरजा मधून आक्रमकता व दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची वृत्ती निर्माण होते. अशा व्यक्ती निर्दय हुकमी व तापदायक असतात.

Horney च्या मते, सामान्य व्यक्तीमध्ये या तिन्ही गोष्टी दिसतात ज्या बाह्य किंवा अंतर्गत गोष्टीवर अवलंबून असतात. मग यांना neurotic कसं म्हणायचं? तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यांचा अतिवापर व्यक्तीला neurotic ठरवतो.

1.
• प्रेम आणि संमतीची गरज: यामध्ये व्यक्तीला आपण सर्वांना आवडाव अशी इच्छा असते. लोकांना खूश करणे, त्यांच्या अपेक्षांवर उतरणे हे यात पाहायला मिळत. अशा प्रकारच्या व्यक्ती नकाराच्या व टीकेच्या बाबतीत अतिसंवेदनशील असतात. तसेच त्यांना इतरांच्या रागाची भीती वाटते.

• जोडीदाराच्या आयुष्यावर पूर्णपणे ताबा मिळवण्याची गरज: यामध्ये अशा गरजा असतात त्या पूर्णपणे आपल्या जोडीदारावर केंद्रीत असतात. अशा गरजा असलेल्या व्यक्तीला आपण जोडीदाराकडून एकटे पाडले जाऊ अशी भीती प्रचंड प्रमाणात असते. त्या व्यक्ती प्रेमाला खूप महत्त्व देतात व त्यांना असा विश्वास असतो की जोडीदार असल्याने आयुष्यातील समस्या सुटतील.

2.
• स्वतःच आयुष्य अरुंद सीमांमध्ये मर्यादित ठेवण्याची गरज: अशा व्यक्ती दुर्लक्षित व नजरेस न येणे पसंत करतात. अशा व्यक्ती अल्पसंतुष्ट व हट्ट न करणाऱ्या असतात. या व्यक्तींना स्वतःच्या गरजा क्षमता आवडीनिवडी यांना दुय्यम स्थानी ठेवण्याची सवय असते.

• आत्मनिर्भर व स्वतंत्रतेची गरज: या व्यक्तीची मानसिकता एकटे राहण्याची असते. दुसऱ्यांवर आपण अवलंबून राहू नये यासाठी या स्वतःला इतरांपासून दूर ठेवतात.

• परिपूर्ण असण्याची गरज: त्यांना सतत प्रत्येक गोष्टीत अचूकता हवी असते. या व्यक्ती स्वतःचे दोष शोधत असतात जेणेकरून त्यांना पटकन बदलता किंवा झाकून टाकता येईल. जरी यांना माहित असलं तुझ्या परिपूर्ण नाहीत तरी त्या स्वतःला इतरांहून उच्च समजतात.

3.
• सत्तेची गरज: यामध्ये व्यक्ती स्वतःसाठी सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असते. अशा व्यक्ती सहसा ताकदीची प्रशंसा करतात तसेच दुर्बलतेचा तिरस्कार करतात. या व्यक्ती दुसऱ्यांवर हुकुमत गाजवताना दिसतात. यांना स्वतःच्या मर्यादांची, असह्यातेची तसेच नियंत्रणाबाहेर असणाऱ्या परिस्थितीची भीती वाटत असते.

• दुसऱ्याचे शोषण करण्याची गरज: या व्यक्ती दुसर्‍यांकडून आपल्याला काय मिळवता येईल काय फायदा करून घेता येईल असा विचार करून संबंध तयार करतात. त्यांना दुसऱ्याचे शोषण केल्याबद्दल गर्व वाटत असतो. बरेचदा अशा व्यक्तींचे लक्ष हे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांना खेळवण्यामध्ये असते. इच्छा जसे की, सत्ता, पैसा, सेक्स.

• प्रतिष्ठेची गरज: या व्यक्ती समाजाकडून मिळणारी ओळख व कौतुकावर स्वतःचे मूल्य ठरवतात. या व्यक्तींना सामाजिक मान गमावण्याची तसेच सामाजिक लाजेची भीती असते.

• वैयक्तिक प्रशंसेची गरज: या प्रकारच्या व्यक्ती narcissistic असतात. त्यांना स्वतःची प्रशंसा ते खरे कसे आहेत यावर होणे अपेक्षित नसून ते स्वतःला काय समजतात यावर होणे अपेक्षित असते.

• वैयक्तिक यशाची गरज: या व्यक्ती स्वतःच्या असुरक्षिततेमुळे सतत काही ना काही मिळवण्यासाठी, संपादन करण्यासाठी धडपडतात. यांना अपयशाची भीती वाटते. तसेच दुसर्यांहून व त्यांनी आधी मिळवलेल्या यशाहून जास्त काहीतरी मिळवण्याची गरज वाटते.

आता या सर्व गोष्टी आपण का समजून घ्यायच्या? तर त्या अशासाठी यातून आपण आत्मपरीक्षण करू शकतो. आपण यातील कोणत्या वृत्ती किंवा गरजा बाळगत तर नाही ना? हे यातून समजू शकेल आणि ते जितके लवकर समजेल तितकं आपण त्यावर उपाय शोधू शकतो. समस्या सोडवू शकतो. संशोधकांना असे दिसून आले आहे की स्वतःच्या विचारांप्रती जागृत राहणे, mindfulness ही तंत्रे नकारात्मक विचार, सततचा घोर, चिंता, नात्यातील तणाव कमी करण्यासाठी मदत करतत. तसेच neurotic tendency वर उपयोगी ठरतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपल्यातल्या Neurotic Needs (अवास्तव गरजा) समजून घेऊ.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!