कठीण काळात पुढे सरकवणारी एक मैत्रीण,सखी, जोडीदार आयुष्यात नक्की असावी.
सौ. सुधा पाटील
(समुपदेशक)
निसर्गात नर आणि मादी हे दोन प्राणी आहेत.आणि या नर आणि मादी यांच्या रुपातूनच अनेक नाती जन्माला येत असतात.हीच नाती एकमेकांना जपतात, एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात.कधी कधी हीच नाती स्वार्थाने बरबटली जातात.पण जगताना स्त्री आणि पुरुष यांना एकमेकांची गरज असतेच.
एक स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या जीवनात वेगवेगळ्या नात्यांनी प्रवेश करतात.एकमेकांना साथ देऊन,प्रेम देऊन जगण्यास संजीवनी देत राहतात.मानवी आयुष्य तसं अनेक अपेक्षांनी भरलेलं आहे.तसंच ते अनेक कठीण प्रसंग, कठीण काळ, अपेक्षाभंग यांनी भरलेलं आहे.अशा वेळी एका पुरुषाला समजून घेऊ शकेल, कठीण काळात आधार देऊ शकेल अशी सखी, जोडीदार, मैत्रीण हवीच असते.
निसर्गत: मानसिक दृष्ट्या स्त्रिया मनाने खंबीर असतात.त्या खूपदा कठीण काळात धीराने पुढे जाऊ शकतात.म्हणूनच संसार करताना पुरुषांना एका खंबीर सखीची गरज असतेच.पण ही सखी मैत्रीण नेहमी त्याची बायकोचं असेल असं नाही.कधी कधी बायको एखाद्या पुरुषाला समजून घेणारी नसते पण त्याची एखादी मैत्रीण त्याला छान समजून चेऊ शकते.
मग कठीण काळात ती मैत्रीण हीच त्याचा आधार वाटते.पण काही जणांच्या आयुष्यात हीच मैत्रीण सखी त्याची बायको ही असू शकते.थोडक्यात काय तर आयुष्याची वाट ही स्त्री आणि पुरुष यांच्या साथीशिवाय अपुरी असते.कठीण काळात मन शांत ठेवणारी, खचलेल्या मनाला बळ देणारी एक मैत्रीण, सखी जोडीदार,प्रत्येक पुरुषाला हवीच असते.आणि ती असायलाच हवी.त्याशिवाय हे सुंदर आयुष्य, प्रेम, आधार, त्याग, काळजी या भावना याचं मोल समजणार नाही.
जेव्हा एखादा कठीण काळ समोर येतो तेव्हा एखादी खरीखुरी मैत्रीण एखाद्या पुरुषाला मानसिकरित्या सक्षम बनवू शकते.मानसिक आधार देऊन लढण्याचं बळ देते.म्हणूनच म्हणतात की, एखाद्या यशस्वी षुरुषामागे एखादी स्त्रीच असते.ती वेगवेगळ्या नात्यांनी त्यांच्या आयुष्यात आनंद उधळत राहते.एक स्त्री केवळ पुरुषांची भोगदासी नसते.तर ती आधाराचं,प्रेमाचं,आनंदाचं अफाट असं आगर असते.ती हक्काने ओरडते,काळ पिळते, मार्गदर्शन करते आणि प्रेमही करते.अशी ही हळवी, कणखर, खळखळून हसणारी आणि हसवणारी एक मैत्रीण प्रत्येकाला नक्कीच असावी.
आता ही मैत्रीण बायकोचं असेल तर आयुष्य म्हणजे जणू अमृतंच बनेल.पण प्रत्येक आयुष्याची एक वेगळीच कहाणी असते.पण पुरुषांचा आधारवड होणारी एक मैत्रीण, सखी, जोडीदार आयुष्यात नक्की असावी लागते.तेव्हा ते आयुष्य आनंदाने फुलून जातं.तसंही स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही एकाकी आयुष्य जगणं कठीणच! दोघांनाही दोघांची गरज असते.म्हणूनच एकमेकांना समजून घेणारी साथ जेव्हा मिळते तेव्हा जीवनातील सारे कठीण काळ धीराने घालवले जातात.
इतिहासात,साहित्यात, चित्रपटात अनेक गोष्टी आपण पाहतो की, एखाद्या स्त्रीच्या सहवासाने,प्रेमाने, मार्गदर्शनाने अनेक पुरुषांचे आयुष्य बदलून गेले.त्यांना चुकीच्या गोष्टींमधून तीच बाहेर काढते.हे केवळ काल्पनिक कथानक नाही.वास्तवातही तेच घडते.एक सखी, जोडीदार आयुष्याला वळण देते.
आयुष्यात आनंद पेरते.संकटात धीराने सोबत राहते.पुरुषांची ताकद बनते.तिच्या प्रेमाच्या स्पर्शाने ओठांवर हासू फुलवते.ती सखी नसेल तर आयुष्य कोरडे होते.म्हणूनच आयुष्याच्या वाळवंटात ओअॅसिस बनून आशेचा किरण देणारी एक मैत्रीण सखी जोडीदार आयुष्यात नक्की असावी.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Very difficult to find such friend and more difficult is to continue that friendship after both get married to different partners.