“काय मैत्रीण होती ती किंवा काय मित्र होता तो”…हे असं अजूनही का आठवत राहतं?
टीम आपलं मानसशास्त्र
ये.. दोस्ती हम नहीं.. तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे ये.. दोस्ती हम नहीं.. तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे !
प्रत्येकाच्या आयुष्यात त्या त्या वयात , त्या त्या स्टेज मध्ये मैत्री ही होत असतेच. आणि ती मैत्री कायमच आठवत असते. शाळेत , कॉलेज मध्ये असताना खास मित्र मैत्रीण आपल्याकरिता डबा घेवून येत असतात. तर कधी आपला डबा आवडला नाही तर तो मित्र किंवा मैत्रीण त्यांचा डबा आपल्याला देत असतात.
अभ्यास राहिला तर तो पूर्ण करण्याकरिता मदत करत असतात. तर कधी आपण आपली secrets शेअर करत असतो. कधी कॅन्टीन मध्ये TTMM तर कधी आपले ही bill तो किंवा ती देते तर कधी आपण त्यांचे.
कधी class bunk करून movie बघायला एकत्र जात असतो. तर कधी मित्राला एखादी मुलगी आवडली तर तो शेअर करतो. दुसरा मित्र ही त्याला मदत करत असतो. त्या मुलीची माहिती देण्यास , तर तिच्या सोबत मैत्री वाढविण्यास.
रोज संध्याकाळी कट्ट्यावर भेटणारे हे मित्र ..एक शिट्टी मारली तरी धावत पळत आपण जाणारे. तो भेटण्यातला उत्साह , त्या विविध विषयांवरच्या गप्पा , माहिती ची देवाणघेवाण असेल किंवा मदतीची . सर्वार्थाने निरागस , आणि निःस्वार्थी मैत्री. बरेचवेळा मुलींच्या मध्ये मुलांच्या एवढी मैत्री होत नसे पूर्वी कारण बंधने , घरच्यांचा धाक , यातून मैत्री वर ही बंधने येत.
पण आजकाल मुलांची च केवळ मैत्री नाही तर मुले मुली एकत्र मैत्री होते . आणि निखळ आनंद मिळवत असतात . अगदी बिनधास्त , दिलखुलास मैत्री असते. मग लाँग ड्राईव्ह , पिकनिक , हॉटेलिंग , bdy पार्टीज . गाढ झोपेत असलेल्या मित्राकडे पहाटे पहाटे दुसरा मित्र जातो ..झोपेतून उठवून आता आपण पिकनिक ला निघालो आहे. मग आई बाबांना ही घरी पटवून ठेवून की मी त्याला घेवून जातो आहे पिकनिक . पुढच्या अर्ध्या तासात दोघे आपल्या प्रवासात. गाणी म्हणत , गाणी ऐकत , गप्पा गोष्टी धमाल करत. त्या अचानक ठरलेल्या पिकनिक ची आठवण आख्या आयुष्यभर राहते.
तर कधी कधी एखादी गोष्ट नव्याने करताना दिलेली साथ . जमेल रे अवघड नाही हा आधार .खात्री.
नेहमी आठवतात ते दिलं चाहता है , कल हो ना हो , ३ इडिएट्स , छिछोरे , शोले , जंजीर , student of the year , जिंदगी ना मिलेगी दोबारा , ABCD , कोई मिल गया या सगळ्या सिनेमात आणि अशा अनेक सिनेमातून मैत्री साठी काय पण .. सुंदर सुखद आठवणी , ..memories . आणि कोणी नसेल तरी आपला मित्र मैत्रीण कायम साथ आहे हा खंबीर आधार विश्वास , साथ याची खात्री असे. त्यामुळे बिनधास्त असतं .
वाटत असते ही मैत्री च कायम असणार आहे. घट्ट मैत्री . प्रत्येक सुख असेल तर दुःखात ही साथ देणारे. मग कधी ब्रेकअप , तर कधी मार्क्स कमी पडले असतील. तर कधी आजारपणे .घरात कोणाचे आजारपणं , निधन यात सगळ्यात साथ आणि सोबत असणारच.हा अनुभव घेतला असतो. रक्ताच्या नात्या पेक्षा घट्ट असते हे नाते.
पण जसजसे पुढचे शिक्षण , नोकरी , कधी दुसऱ्या गावात , परदेशात ही जावे लागते तेव्हा कधी कधी हे मित्र मैत्रिणी मागे पडत जातात. कामाच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. तर कधी संसरतल्या जबाबदाऱ्या वाढत जातात . इच्छा असून ही रोज भेटणे बोलणे शक्य होत नाही. तर कधी physically अंतर वाढते त्यामुळे पूर्वी सारखी मौज मस्ती , आनंद , दंगा मस्ती करता येत नाही.
आयुष्यात जबाबदाऱ्या वाढत जातात. कर्तव्य , आर्थिक गोष्टी यात खूप अडकून पडायला होते. काही वेळेस सततची टेन्शन , स्ट्रेस , आर्थिक जमवाजमव करताना खूप स्ट्रगल करावे लागते. आणि तेव्हा आपल्याला क्षणो क्षणी आठवण येते ती आपल्या मित्र मैत्रिणींची .
मस्त मैत्रीण होती किंवा मस्त मित्र होता…हे असं अजूनही का आठवत राहतं?
कारण आपण तेव्हा त्यांच्या सोबत खूप मनमोकळेपणाने बोलत असतो , संवाद साधत असतो. अडीअडचणीला ते मदत करत असतात. गाईड करत असतात. चुकले तरी परत हिम्मत देत असतात. आपल्या सावली सारखे सतत आपल्या सोबत असतात .. आणि त्या बदल्यात काहीच नको असते त्यांना केवळ मैत्री . आणि हे जास्त कधी जाणविते जेव्हा आपण व्यवहारी जगात वावरत असतो तेव्हा.
रोजची जगण्यासाठी ची धडपड , घराकरिता त्याग. आर्थिक भार , मानसिक दडपण , त्रास ,कधी येणारी निराशा , शारीरिक धावपळ , कष्ट , त्यातून वाढणारा ताण तणाव . यात इतके एकटे एकटे वाटत असते . सगळीकडे आपण एकट्याने लढायचे.
मग मुलींच्या बाबत लग्न , जबाबदाऱ्या ,स्वैपाक , नोकरी असेल तर ती, मुलांच्या जबाबदाऱ्या यात खूप अडकून पडायला होते आणि मनाचा , भावनांचा कोंडमारा होतो. कारण आपलेपणाने मोकळेपणे शेअर करता येणारे कोणी नसते. आणि हा एकटेपणा खायला उठतो.
आणि मग ते पूर्वीचे दिवस किती छान होते. मस्त मैत्रीण होती किंवा मस्त मित्र होता…ते असताना काही टेन्शन नसायचे. कारण तेव्हा जबाबदाऱ्या ही कमी होत्या. सगळे अनुभव नवे नवे होते. त्याला सुरुवातीला खंबीरपणे तोंड देण्याकरिता मी आहे असे आपलेपणाने म्हणणारे मित्र आणि मैत्रिणी होत्या.
वय लहान , जिद्द , ध्येय होती. पण अपयश , अडचणी , संकटे , नुकसान , तोटा ..नफा किंवा त्याही पेक्षा वय लहान होते आणि धडाडी होती. जी अनुभव , वया परत्वे , वारंवार येणाऱ्या अनुभवातून मानसिक थकवा येतो . आशा वेळी आपले जवळचे कोणी असावे असे वाटते. पण वय वाढेल तसें आणि जबाबदाऱ्या वाढतील तशा आपले लोक दुरावतात. आणि केवळ hi , hello , kase आहात , very nice to meet you असे तोंड देखले बोलणारे , नुसते चेहऱ्यावर मुखवटे परिधान केलेले आजू बाजूला दिसतात.
याउलट पूर्वी मित्र किंवा मैत्रीण एखादी अडचण असेल , संकट असेल तर आपले पणाने खांद्यावर हात ठेवणारा / ठेवणारी , घट्ट मिठी मारून मी आहे की बिनधास्त रहा असे आश्वासन देवून वेळोवेळी मनोबल वाढविणारी ही मित्र मंडळी नंतर पावलोपावली त्यांची उणीव भासू लागते.
आजही सोबत असते तर सगळे विसरून दिलखुलास श्वास घेतला असता याची जाणीव होते.
आयुष्य सुंदर आहे. मस्त मैत्रीण होती किंवा मस्त मित्र होता…हे असं अजूनही का आठवत राहतं? तर त्यात आपलेपणा असतो. ती मैत्रीची ओढ असते. साथ असते. सोबत असते. आणि मैत्री मधला दृढ विश्वास. खात्री असते की आपण आपली अडचण , गुपित सांगितले तरी ते गुप्त च राहणार. आणि तसे अनुभव ही असतात.
मैत्री ने अनेक चढ उतार बघितले असतात. अगदी काही ही कमावत नसताना ते भरपूर कमाई असेल किंवा एखादा खरेच आयुष्यात अपयशी ठरला असेल . तर त्याला नेहमीच वाटते की आपले मित्र मैत्रिणी आज सोबत असते तर नक्कीच खूप मोठा आधार असता त्यांचा. पण अपयश , निराशा , हे वाटून घेणारे ही कोणी नसते . तेव्हा ही एकाकी पणाची जाणीव त्यांना आपली मैत्री सतत आठवत असते.
आयुष्य सुंदर आहे. मस्त मैत्रीण होती किंवा मस्त मित्र होता…हे आठवत राहण्यापेक्षा त्यांना कायम आपल्या सोबत जोडून ठेवा. पुढे गेलात तरी त्यांना ही सोबत पुढे घेवून जा. मग सुख असेल दुःख , यश असेल अपयश , स्थैर्य असेल किंवा अस्थैर्य , कुटुंब असो तरी ही मैत्री करिता त्यात वेळ ठेवा. आणि ती मैत्री ..आपले मोकळे होण्याचे स्थान , आपला बालिशपणा , आपला त्यांच्यावरचा आणि त्यांचा आपल्यावरच हक्क कायम जिवंत ठेवा. तसाच ठेवा. आयुष्यात तीच खंबीर साथ लाभेल. पुढे जाताना मागचे मागे सोडू नका तर आहेत ते मित्र आणि नवीन होणारे ही सगळ्यांना सोबत असू द्या .त्याच हक्क आणि प्रेमाने त्यांनाही मोकळेपणाने वागू द्या आणि तुम्ही ही वागा.
३ idiots मधले हे गाणे नेहमी हे जाणवून देते की अगदी राजू आपल्या मित्रांना वाचविण्यासाठी जीव देण्याचा प्रयत्न करतो आणि जगतो का वाचतो अशा अवस्थेत असताना केवळ हे मित्र रांचो , फरहान , राजू ला मरणाच्या दारातून परत आणतात. त्याकरिता शर्थीचे प्रयत्न .
जाने नहीं देंगे तुझे
जाने तुझे देंगे नहीं
जाने नहीं देंगे तुझे
जाने तुझे देंगे नहीं
चाहे तुझको रब बुला ले
हम न रब से डरनेवाले
राहों में डटके खड़े है हम
यारों से नजरें चुरा ले
चाहे कितना दम लगा ले
जाने न तुझको ऐसे देंगे हम
जाने नहीं देंगे तुझे
आयुष्यात खरेच असा एकतरी मित्र / अशी एकतरी मैत्रीण जोडाच . जी या व्यवहारी जगात ही निःस्वार्थी , केवळ मैत्री टिकवून ठेवणारी अशी आपली असेल.
सुखदुःखाच्या सरीमध्ये भिजताना आपला एकटेपणा विसरायला समांतर स्वप्नांची हिरवी साद , मैत्रीची साद हवी तरच जगण्याचा ऋतू हवाहवासा वाटतो नाही का??
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


